www.upkarmarathi.com

     |15 August Marathi speech ,प्रिय वाचक मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे भाषण लहान मुलांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत .हे भाषण लहान मुलांना सहज पाठ होतील अशा साध्या शब्दात दिलेल्या आहेत आणि भाषणांची लांबी देखील अत्यंत छोटी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतरास कोणतेही अडचण येणार नाही. धन्यवाद.

           मित्रांनो 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे यावर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन असणार आहे .त्यासाठी लहान मोठ्यांपासून सर्वच विद्यार्थी भाषणाची तयारी करत आहेत .

15 ऑगस्ट मराठी भाषण
 |15 August Marathi speech15 ऑगस्ट मराठी भाषण|15 August Marathi speech


|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे  भाषण क्रमांक १


      अध्यक्ष महाशय पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

      आजच्याच दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश खूप महान आहे . आपल्या देशात अनेक राज्य आहेत . अनेक भाषा बोलल्या जातात. गंगा, गोदावरी यांसारख्या नद्या आहेत. भारतात विविधता आहे. तरी माझ्या देशामध्ये एकता आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
           || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे भाषण क्रमांक २

या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो तुम्हाला माझा नमस्कार स्वातंत्र्य दिनानिमित्त मी जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
लाल बहादूर शास्त्री हे माझे आवडते नेते आहेत त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पण ते खूप शिकले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते देशाचे पंतप्रधान झाले तरीही ते अत्यंत साधे राहत व साधेपणाने वागत असत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.
  || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे भाषण क्रमांक ३

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जे भाषण सांगणार आहे त्या परशांतपणे ऐकावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.
माझ्या भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आहे पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते पण टिळक गांधीजी नेहरू बोस यांनी लढा दिला अनेकविरांनी बलिदान दिले व भारत स्वातंत्र्य झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो .

  || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे ,भाषण क्रमांक 4

      स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी ध्वजारोहणासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या बाल मित्रांनो .मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे अशी  मी नम्र विनंती करतो.
15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे तो आम्ही आनंदाने साजरा करतो आम्ही शाळेत येतो झेंडावंदन करतो शिक्षक मुले वीरांच्या गोष्टी सांगतात त्या आम्हाला खूप आवडतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

   || जय हिंद जय भारत||

|15 August Marathi speech
|15 August Marathi speech|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे ,भाषण क्रमांक ५

   आज या ध्वजारोहणासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त हे ध्वजारोहण करीत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त मोठ्या देशभक्तांनीच बलिदान दिले असे नाही ,तर माझ्यासारख्या छोट्या मुलांनी देखील बलिदान केले .त्यातीलच एक म्हणजे शिरीष कुमार.

    छोटा शिरीष घरी शाळेत सर्वांचा अत्यंत आवडता होता सर्वांना नेहमी मदत करायचा आपल्या देशावर शिरीष चे खूप प्रेम होते शिरीष कुमारने आपल्या मित्रांसोबत इंग्रज पोलिसांबरोबर लढा दिला पण एकदा मिरवणुकीत मुलांवर पोलिसांनी गोळीबार केला या गोळीबारामध्ये शिरीष ला गोळी लागली व देशासाठी शिरीष ने आपला प्राण गमावला शिरीष कुमार हे नंदुरबार जिल्ह्यातील होते त्यांच्यासाठी मला म्हणावेसे वाटते की ,
धन्य धन्य तो शिरीष कुमार 
धन्य धन्य तो शिरीष कुमार

 एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो .जय हिंद जय भारत

  || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे | भाषण क्रमांक ६

     या ठिकाणी उपस्थित सर्वांना माझा सविनय नमस्कार. ध्वजारोहणासाठी आपण आमच्या शाळेत आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत आणि मी आज तिरंग्या विषयी थोडेसे शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती.
तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे .आपल्या झेंड्यात तीन रंग आहेत वरच्या बाजूला केशरी मध्यभागी पांढरा रंग आहे तर खाली हिरवा रंग आहे असे तीन रंग आहेत पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.
  || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे ,भाषण क्रमांक ७


दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो शाळेमध्ये झेंड्याला सलामी देतो एक सुरात जनगणमन म्हटले जाते व भारताचा तिरंगा फडकावतो या दिवशी आपण सर्व खूप आनंदात असतो अनेक वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान केले एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत.
  || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे, भाषण क्रमांक ८

               आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो.
                      शाळेमध्ये आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो या दिवशी झेंडावंदन करतात. नंतर मुलांची भाषणे होतात .आपल्या देशाचा इतिहास सांगितला जातो. क्रांतिवीरांचे गुणगान केले जाते. मुलांचे देखील कौतुक केले जाते .
                समारंभ संपल्यावर सर्वांना खाऊ दिला जातो .एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो .
                                   जय हिंद जय भारत 
                                || जय हिंद जय भारत||

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे, भाषण क्रमांक ९


                         नमस्कार आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो.

           भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यात महात्मा गांधीजी सुद्धा होते आज मी तुम्हाला आपल्या सर्वांचे लाडके बापूजी यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे.


          बापूजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते.

        बालपणापासूनच गांधीजींना सत्य शाकाहार व अनुसयाचे संस्कार घरातूनच मिळाले त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदर व राजकोट येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी गांधीजी लंडनला गेले व वकिलीचे शिक्षण पूर्ण करून आफ्रिकेला गेले तेथे त्यांना एकदा वर्ण देशांमधून आगगाडीतून उतरविण्यात आले याचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला त्यांनी मोठा लढा उभरला.

    त्यानंतर ते मायदेशात आले भारतात इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढाई उभी केली गांधीजींनी सरकारने लावलेल्या मिठावरील कराविरुद्ध सत्याग्रह केला अनेक चळवळींच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले व सहकाऱ्यांना "करो या मरो" हा मंत्र दिला.

                  महात्मा गांधी हे भारताचे थोर सुपुत्र होते ते नेहमी खरे बोलत असत सर्वजण त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत गांधीजी खूप शिकले आणि देशासाठी इंग्रजांशी लढले देशासाठी .त्यांनी खूप मोठा त्याग केला देशाने त्यांचा महात्मा असे म्हणून गौरव केला. एवढे  बोलून मी माझे भाषण संपवितो,


 भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींचा वाटा खूप मोठा आहे म्हणून शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन.

    "   दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल
 साबरमती के संत तूने कर दिया कमाल 
आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल
 साबरमती के संत तूने कर दिया कमाल "

जय हिंद जय भारत

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे ,भाषण क्रमांक १०

 अध्यक्ष महाशय पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

                "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा"
          याप्रमाणे आपला भारत देश खूप श्रीमंत होता. म्हटले जायचे की लोक काठीला सोने बांधून फिरत होते. देशातून सोन्याचा धूर निघत होता .तेव्हा इंग्रज लोक व्यापारासाठी आले व राज्यकर्ते बनले .
         आपल्या देशातील संपत्तीची लूट केली लोकांवर खूप अन्याय अत्याचार केला यातून सोडविण्याचे काम भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव ,सुभाष चंद्र बोस ,गांधीजी, लोकमान्य टिळक या क्रांतिकारकांनी केले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले .या क्रांतिकारकांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद जय भारत 

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे, भाषण क्रमांक ११

 अध्यक्ष महाशय पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.


                 स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान देशभक्त होते भारत देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले म्हणून त्यांना लोक स्वातंत्र्यवीर म्हणत त्यांचा जन्म नाशिक मधील भगूर येथे झाला ते बुद्धिमान होते त्यांनी इंग्रजांची नोकरी केली नाही इंग्रजांविरुद्ध लढा उभारला म्हणून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली त्यांचे खूप हाल झाले पण ते डगमगले नाही त्यांनी देशभक्तीच्या कविता आणि पुस्तके लिहिली देशाची सेवा केली अशा या महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीरांना माझे कोटी कोटी नमन करून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत.

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे, भाषण क्रमांक १२

 अध्यक्ष महाशय पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

                        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाज सुधारक होते त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला अतोनात कष्ट घेऊन ते शिकले ते खूप हुशार होते त्यांनी उच्च शिक्षण घेतले बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप कळकळ होती दलितांची सुधारणा व्हावी म्हणून ते झटले लोकांनी खूप शिकले पाहिजे असे त्यांना वाटे यासाठी शाळा महाविद्यालय काढल्या अशा या भारताच्या थोर सुपुत्राला सरकारने भारतरत्न ही पदवी बहाल केली अशा महान व्यक्तिमत्वास कोटी कोटी नमन करून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत

|15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे ,भाषण क्रमांक १३

 अध्यक्ष महाशय पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

झाशीची राणी ही एक थोर विरांगणा होती तिने इंग्रजांना जबरदस्त आव्हान दिले होते झाशीच्या राणीचे बालपणीचे नाव मनो होते लहानपणापासून तिचा स्वभाव तडफदार होता म्हणून तिच्या वडिलांनी तिला युद्ध कला शिकवली लग्नानंतर ती झाशीची राणी झाली काही काळातच राणीचा मुलगा व पती ही मरण पावले तिने एका मुलाला दत्तक घेतले पण इंग्रजांनी ते मंजूर केले नाही तिचे राज्य खालसा केले तिने विरोध केला मेरी झाशी नही दूंगी अशी घोषणा केली इंग्रजांशी लढा दिला यातच तिला वीरमरनारे या विरांगणेला नमन करून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने