www.upkarmarathi.com

    सध्याच्या काळामध्ये अनेक नवनवीन आजारांनी थैमान घातलेला आहे. या मधीलच मधूमेह (diabetes) या आजाराविषयी आपण माहिती बघू या.. 


   
Diabetes information in Marathi
Diabetes information in Marathi

|Diabetes information
|डायबिटीज विषयी माहिती.


         Diabetes information in Marathi, हल्लीच्या धावपळीच्या काळात माणसाचे राहणीमान आणि दिनचर्या अत्यंत बदलून गेलेले आहे. ही बदललेली दिनचर्या अनेक आजारांचे कारण ठरत आहे. त्यातील सध्या मोठ्या मनात आढळून येत असलेल्या आजारांमध्ये मधुमेह हा एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार आहे.. अर्थात  मधुमेह हा आजार काही संसर्गजन्य नाही.

   नक्की का होतो ?कशामुळे होतो? त्याच्यावर उपाय काय ?  असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या लेखामध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

 मधुमेह या आजाराने आता वयाची आणि जातील समाजाची बंधने ओलांडली आहेत .पूर्वीच्या काळी मधुमेहाला श्रीमंतांचा आजार म्हटला जात असे कारण की अति गोड खाल्ल्याने मधुमेह होते असा एक समज होता. परंतु आता सर्रास कोणालाही मधुमेह झाल्याचे निदर्शनात येते. फक्त म्हाताऱ्यानाच नाही तर तरुण लोकांमध्ये , मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण वाढलेले दिसते.

  आपले रक्त अनेक घटक मिळून बनलेले असते त्यातीलच एक घटक म्हणजे रक्तातील साखर  . यालाच आपण ग्लुकोज असे म्हणतो. डायबिटीज झाला की आपल्या शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण वाढते.

   आता हे ग्लुकोजचे प्रमाण रक्तामध्ये वाढते तरी कसे..

  आपण खात असलेल्या अन्नामधून आपल्या शरीराला ग्लुकोज मिळते आणि ग्लूकोज आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. हे ग्लुकोज पेशींमध्ये ऊर्जेसाठी वापरले जाते. ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्शुलिन हे हार्मोन अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी असते.
    ज्यावेळी शरीरामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होत नाही, इन्शुलिन पुरेसे तयार न झाल्यामुळे ग्लुकोज पेशींमध्ये पुरेशा प्रमाणात वापरले जात नाही व ते रक्ता मध्येच मोठ्या प्रमाणात मिसळले जाते. त्यामुळेच रक्तातील ग्लुकोज वाढते. रक्तामध्ये असे ग्लुकोज वाढल्यामुळे आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण होतात जसे की मज्जातंतू चे नुकसान, डोळ्यांच्या समस्या ,हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी.

    मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये आणि आहारामध्ये देखील काही महत्त्वाचे बदल करावे लागतात.

Types of diabetes (मधुमेहाचे प्रकार)

 1. टाइप 1 मधुमेह 
 2. टाइप 2 मधुमेह 
 3. गर्भधारणेतील मधुमेह

टाइप 1 मधुमेह


 •   थोडक्यात सांगायचे झाले तर या प्रकारच्या मधुमेहामध्ये आपले शरीर स्वतःच स्वतःचे नुकसान करते. सोप्या भाषेत आपल्या शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा आपल्या स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करते. यामुळे इन्शुलिनची निर्मिती होण्यात अडचण निर्माण होऊन डायबेटिस होतो .
 • या डायबिटीज मध्ये होणारे नुकसान कायम स्वरूपाचे असते.  
 •    मधुमेह का होतो याची कारणे स्पष्ट नसले तरीदेखील पर्यावरणातील किंवा अनुवंशिक अशा दोन्ही पद्धतीमुळे हा होऊ शकतो. काही अंशी आपली जीवनशैली देखील याला कारणीभूत असू शकते.
 • टाइप 1 डायबिटीज पेशंट पूर्णपणे इन्शुलिनच्या इंजेक्शन वर अवलंबून असतात.
 • या पेशंटसना  डिपेंडंट डायबिटीज मेलीट्स असेही म्हणतात.
 • लहान मुलांमध्ये या डायबिटीस चे प्रमाण अधिक दिसून येते.
 • यामध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती न झाल्याने बाहेरून इंजेक्शन द्वारा  इन्शुलीन दिले जाते.

टाइप 2 मधुमेह
 1. टाईप टू डायबिटीस पेशंटची संख्या जास्त असते.
 2. टाईप टू डायबिटीज वयस्क लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
 3. ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे अशांना टाईप टू डायबिटीस होऊ शकतो.
 4. स्थूलतेमुळे इन्शुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो व डायबिटीस टू हा आजार होतो.
 5. डायबिटीजला आजार म्हणण्यापेक्षा शरीरातील बिघाड किंवा विकृती असे म्हटले तर अयोग्य नाही.
हा मधुमेह होण्याची कारणे नक्की माहीत नाहीत परंतु खालील बाबी त्यासाठी जबाबदार असू शकतात..

 • व्यायामाचा अभाव
 • जास्त वजन म्हणजेच स्थूलपणा 
 • अनुवंशिकता

 गर्भधारणेतील मधुमेह (gestational  diabetes)

 1. एखादी स्त्री गरोदर असताना तिच्या शरीरातील म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर तिला गर्भावस्थेतील मधुमेह होण्याची शक्यता निर्माण होते.
 2. डायबिटीज चा हा प्रकार स्त्री गरोदर असतानाच होतो.
 3. गर्भवती महिलांना जे अनेक त्रास होतात त्यामध्ये या मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.
 4. साधारणपणे 24 ते 28 आठवडे यादरम्यान या आजाराचा त्रास अधिक होतो.
 5. इन्शुलिनच्या इंजेक्शनद्वारे  या आजारावर नियंत्रण ठेवले जाते.
 6. साधारणपणे 80 टक्के गरोदर स्त्रियांची बाळाच्या जन्मासोबतच नॉर्मल येते.
 7. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध करून घेऊ नका.

टाइप 1 मधुमेह मधील रिस्क फॅक्टर


   टाइप 1 मधुमेह होण्याचे नेमके कारण कोणते हे पूर्णपणे स्पष्ट नसले तरीदेखील खालील कारणे असू शकतात..
 1. कौटुंबिक पार्श्वभूमी - कुटुंबातील  जर कोणाला आजार असेल तर आपल्यालाही असू शकतो. असेलच असे नाही.
 2. पर्यावरणातील काही घटक अथवा व्हायरल आजारांमुळे देखील याचा धोका उद्भवू शकतो.
 3. कमी  प्रमाणात विटामिन डी मिळणे.

टाइप 2 मधुमेह मधील रिस्क फॅक्टर


 1. बऱ्याच वेळा हा मधुमेह अनुवंशिक असतो.
 2. योग्य जीवनशैली तसेच शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे देखील होऊ शकतो.
 3. वेळीच चाचणी करून निदान करून घेणे फायद्याचे असते.

  मधुमेहामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

  मधुमेह एका दिवसातून होत नाही, तर त्यासाठी अनेक दिवस लागतात. म्हणजेच मधुमेह शरीरामध्ये हळूहळू विकसित होतो.
  वेळीच काही सवयी बदलल्या नाही किंवा उपचार घेतला नाही तर मधुमेह जीवघेणा ठरू शकतो.
  मधुमेहामुळे खालील आजार होऊ शकतात
  हृदय रोग (cardiovascular disease)
  वारंवार छातीमध्ये दुखणे 
  हृदय विकाराचा झटका येणे 
  रक्तवाहिन्या अरुंद होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
  मज्जातंतू चा आजार(nerve damage)
  शरीरातील साखर वाढल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या अरुंद होतात. यामुळे रक्तप्रवाहात अडचण निर्माण होते अशावेळी हातापायांना मुंग्या येणे जळजळ होणे बधिरता येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. बोटांच्या टोकावर अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात.
   किडनीचे आजार
   डोळ्यांचे आजार 
   पायांचे विकार 
   त्वचा रोग
   ऐकण्यामध्ये दोष 
   अल्जाइमर 

faqs

डायबिटीज ला मराठीत काय म्हणतात?

डायबिटीज ला मराठीत मधुमेह म्हणतात.

डायबिटीज मेलिटस (what is diabetes mellitus)

डायबिटीज मिलिटस मेटाबोलिजम संबंधित अनेक आजारांच्या समूहाचे नाव आहे. यालाच डीएम(DM) असेही म्हटले जाते.


   प्रिय वाचक मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुम्हाला डायबिटीज विषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला .तुम्हाला माहिती कशी वाटली ते सांगा .तसेच अजून कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने