www.upkarmarathi.com

|पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी  

| पावसाळा आणि आरोग्य

| पावसाळा आणि आरोग्य

      How do Will you take care of your health in rainy season in Marathi?    
           पावसाळा ऋतु हा अनेकांच्या आवडीचा जरी असला तरी देखील  या ऋतू  मध्ये आपण आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी असते. पाण्यात खेळायला लहानांबरोबरच मोठ्यांनाही खुप आवडते. पाण्याला जीवन म्हटले जात, पण तेच जर शुद्ध नसेल तर जीवघेण ठरत.

       मग  आपल्या आवडत्या  पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? अशी समस्या आपल्यासमोर निर्माण होते. चला मग आजच्जाया या लेखामध्णूये न घेऊया की ,पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी 
पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोके वर काढत असतात जसे की सर्दी खोकला पित्ताचे विकार डायरिया कॉलरा वाताचे विकार.
पावसाळ्यामध्ये पचन क्रिया मंदावलेली असते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती देखील कमी होते. अशावेळी सर्दी ,खोकला याबरोबरच कावीळ , लेप्टोस्पायरोसिस  यांसारखे इतर विकारही जडतात.

|पावसाळ्यात आहार कसा असावा ?

  1. पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आपल्या गरजेपेक्षा कमी आहार घेतला पाहिजे.
  2. फळ भाज्या खाण्यावर भर द्यावा दुसरी की दुधी भोपळा
  3. मुगाची डाळ मका खिचडी हे पदार्थ देखील आरोग्यासाठी हितकारक ठरतात .
  4. खारट आणि आंबट खाणे टाळावे.
  5. उघड्यावरचे पदार्थ जसे भेळपुरी, पाणीपुरी हे जाणीवपूर्वक खाण्यास टाळावे.
  6. दही लोणचे अतितिखट पदार्थ चटणी यांचा आहारातील समावेश कमी करावा.
  7. मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करावा.
  8. पावसाळ्यामध्ये मिरी हिंग हळद जिरे लसूण आलं कोथिंबीर या पदार्थांचा आहारामध्ये समावेश केलेल्या फायदेशीर ठरते.
  9. दुपारच्या झोपेमुळे शरीरात पित्त वाढते म्हणून दुपारची झोप टाळावी .
  10. पाणी गरम करूनच प्यावे.
  •    पावसाळ्यातील वातावरणात आद्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते त्यामुळे पटकन जिवाणूंची वाढ होते. पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये घाण घाण घाण पाणी जमीनीवरील कचरा मिसळतो . तो सर्व नदीमध्ये जातो. मग असे दूषित पाणी पोटात गेल्यानंतर हागवन अतिसार कावीळ या सारखे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गरम करूनच प्यावे.

  • साचलेल्या पाण्यामध्ये डासांची वाढ देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते. साचलेल्या दूषित पाण्यातच डासांची वाढ होते असे अजिबात नाही डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या माद्या शुद्ध पाण्यात देखील अंडी घालतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणतेही पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.

  •    आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्याने डासांपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव आपल्याला करता येऊ शकतो. मच्छरदाणी वापरणे अधिक श्रेयस्कर आहे. मच्छर पळवण्यासाठी किंवा मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अगरबत्त्या अथवा केमिकल्स यांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा संभव असतो.

  •     पावसात भिजण्याची परिस्थिती निर्माण झाली तर भिजल्यानंतर घरी पोहोचताच पटकन संपूर्ण अंग कोरडे करा. एखाद गरम पेय प्या. पावसात भिजलेले कपडे लगेच बदलून घ्या.    
  •     आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रकारचा आजार किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

      प्रिय वाचक मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यापद्धतीने तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने