www.upkarmarathi.com


गुरु महिमा मराठी निबंध
|Guru Mahima essay in Marathi


Guru Mahima essay in Marathi
guruche mahatv


      Essay on importance of guru in Marathi,
     
    प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशस्वी होण्यामागे त्यांच्या गुरुचा हात असतो. गुरूंची स्थान छान भगवंताच्या  वरचे मानले जाते. गुरुच आपल्याला भगवंतापर्यंत किंवा यशापर्यंत घेऊन जातात. गुरु म्हणजे अंधारात वाट दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे आहेत. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये गुरु नाही तो व्यक्ती आयुष्यात कधीही पूर्णपणे प्रगती करू शकत नाही.
    जर आपण स्वतः संताजवळ गेलो तर समजून घ्यावे की आपले पुण्य आपल्याला संताजवळ घेऊन आलेले आहेत. तू जर संत स्वतःला आपल्याला शोधत आपल्याजवळ आले तर समजून घ्या की भगवंताच्या कृपेमुळे स्वतः संत आपला शोध घेत आले आहेत.
    
     गुरूंविषयी आपल्या मनात श्रद्धा असेल तर आपोआपच त्यांच्याविषयी असलेले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीमधून दिसून येईल. गुरुशिवाय ज्ञान नाही. असे म्हटले जाते परंतु हे ज्ञान मिळते कुणाला? याचे उत्तर आहे  श्रद्धावान माणसालाच ज्ञान मिळते.
     
     प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवनामध्ये प्रगती होण्यात गुरुचे अनन्य साधारण महत्व असते. शीश यामधील दुर्गुणांना दूर करून त्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करतात. काळोख्या रात्रीत एखाद्या वाटसरूला ज्याप्रमाणे छोटीशी पणती देखील मार्ग दाखवते त्याप्रमाणेच गुरूदेखील अज्ञान आणि अंधकाराच्या घोर तिमिरातून शिष्याला ज्ञानप्रकाशाने बाहेर काढतात. योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग गुरु दाखवतात.

| importance of teacher in marathi |

      गुरु आपल्या जीवनातून दुर्गुणांना दूर करतात. ज्या रस्त्यावर चालून आपण आपले आयुष्य सुखमय करू शकतो आणि यशाच्या नवनवीन प्रांतात प्रवेश करू शकतो. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी गुरु शिवाय पर्याय नाही. जीवन जगण्याचा खरा रस्ता गुरु दाखवतात.

     तेच गुरू श्रेष्ठ असतात की ज्यांच्या प्रेरणेमुळे आपले चरित्र बदलून जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रच बदलून जाते. असा सर्वश्रेष्ठ चारित्र्यसंपन्न गुरु मिळणे देखील नशिबाचाच एक भाग आहे. गुरु आपल्याला केवळ ज्ञान देऊन संपन्न करत नाही तर आपल्यामध्ये शिस्त, स्वावलंबन या गुणांचा देखील परिपोष करतात.

    एखाद्या व्यक्तीच्या मनात जीवन जगण्याचे ध्येय गुरुच देऊ शकतात.  त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा मार्गदेखील गुरू आपल्याला दाखवत असतात.जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये गुरुद्वारा मिळालेले शिक्षण आपल्यासाठी उपयोगी सिद्ध होते. जो व्यक्ती गुरूंनी सांगितलेल्या नियमांचे पालन करतो त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

     आपल्या देशामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते व त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते. अशी ही श्रेष्ठ संत परंपरा भारतामध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे.

     प्रत्येक शिष्याचं हे कर्तव्य आहे की त्याने गुरुद्वारा मिळालेले ज्ञान योग्य रीतीने आत्मसात करून घ्यावे. आपले जीवन जगत असताना त्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी करावा.

     अध्यात्माच्या बाबतीत सांगायचे झाले तर परमेश्वर हा निर्गुण निराकार स्वरूप असल्यामुळे त्याचा अनुभव स्वतःहून घेणे अशक्य आहे. अशा निर्गुण-निराकार परमेश्वराला पाहण्याचे व प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य गुरुच शिष्याला देतात.

    म्हणून सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु गुरु आपला त्याग करतील असे कोणतेही कर्म करू नये.



        प्रिय वाचक मित्रांनो आपल्या लेखामध्ये  importance of teacher in marathi | गुरुचे महत्व निबंध मराठी बघितला. निबंध कसा वाटला हे तुमचे मत व्यक्त करून नक्की कळवा धन्यवाद.

या निबंधाचे खालील प्रमाणेही नावे असू शकतात.


  1. | गुरुचे महत्व मराठी निबंध
  2. | गुरूंचे महत्त्व
  3. | गुरूंचे उपकार
  4. | जीवनात गुरूंचे महत्त्व
  5. | आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा

हेही नक्की वाचा


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने