www.upkarmarathi.com

    Peacock information in Marathi, प्रिय वाचक मित्रांनो आजच्या आपल्या लेखात आहात आपण अत्यंत सुंदर मोर पक्षाची माहिती जाणून घेणार आहोत. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे हे आपण जाणतोच. असे असले तरी मोरा विषयी अनेक लोकांना फार थोडीच माहिती आहे.

|peacock information in Marathi
मोराची संपूर्ण माहिती

Information in Marathi peacock

      त्यामुळेच इतक्या सुंदर पक्षाविषयी सर्वांना माहिती मिळावी म्हणून आज आपण मोराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्या मनात मोरा विषयी अनेक प्रश्न येत असतील परंतु आजचा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील ,पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल. चला तर बघूया मोर मराठी निबंध.

मोराची संपूर्ण माहिती -
|peacock information in Marathi

       मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. सौंदर्य आणि गुण या दोन्ही बाबतीत मोर केवळ अतुलनीय आहे. अत्यंत सुंदर पक्षी आहे. मोराच्या पंखांमध्ये इंद्रधनुष्याचे रंग पसरलेले असतात. पावसाच्या दिवसांमध्ये आकाशातील ढगांकडे बघून पक्ष्यांचा राजा मोर आनंदाने नाचू लागतो. आपले पंख पसरून जेव्हा मोर नाचू लागतो त्यावेळी फक्त लांडोरच नाही तर भले भले देखील या नृत्याच्या प्रेमात पडतात.

         मोराची उंची सुमारे दीड ते दोन फुटांपर्यंत असते परंतु मोराचे शरीर थोडे मोठे असते. मोराला असलेल्या सुंदर लांब लांब पंखांमुळे मोर अधिकच मोठा वाटतो आणि आकर्षक देखील. नृत्य करताना ज्यावेळी मोर आपले पंख गोलाकार पसरवून घेतो. मुलाच्या डोक्यात वर एक सुंदर चकाकणारा रंगीबिरंगी तुरा असतो.

         मोराची चोच थोडी लांब आणि फारच टोकदार  असते. मोरे का सुंदर पक्षी असला तरी देखील त्याचे दिसत नाहीत. अनेक काल्पनिक कथांमध्ये असे म्हटले जाते की मोर स्वतःचे पाय बघून रडतो. मोर जितका सुंदर असतो तितके लांडोर सुंदर नसते.


         मोर सापांना सुद्धा खाऊन टाकतो. मोर नेहमी हिरव्यागार जंगलांत  आणि शेतांच्या जवळपासच राहतो. मोराचे आवडते भोजन म्हणजे कीटक आणि धान्याचे दाणे हे होय. मोराचा समावेश कुकुट वर्गीय पक्षांमध्ये केला जातो. नर मोराला पिसे असतात. मादी मोराला म्हणजेच लांडोराला पिसे नसतात. ज्यावेळी विणीचा हंगाम संपतो त्यावेळी नर मोराची पिसे गळून पडतात.

        पक्ष्यांचा राजा गरुड असला तरी देखील मला मोर गरुडापेक्षाही जास्त सुंदर वाटतो. आपल्या धर्मशास्त्रानुसार मोराला पवित्र पक्षी मानले जाते. भगवान कार्तिकेय यांचे वाहन म्हणून मोराची पूजा केली जाते. चक्रधर भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या मुकुटा मध्ये मोरपंखाला स्थान दिलेले आहे. विद्येची देवी सरस्वतीला देखील मोर प्रिय पक्षी आहे.

          मोर नाचू लागतो त्यावेळेस त्याची पिसे खाली पडतात. लहान मुले मोराची पिसे आपल्या वही पुस्तकामध्ये ठेवतात. अनेक सुंदर वस्तू बनवताना देखील मोराच्या पिसांचा उपयोग केला जातो. मोरपिसं पासून सुंदर पंखे देखील बनवले जातात. मंदिर तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी मोरांची पिसे ठेवली जातात.

        मोराच्या शरीराच्या मानाने त्याचे पाय बारीक असतात त्यामुळे मोर जास्त उंच उडू शकत नाहीत. असे असले तरीदेखील गरज असते त्यावेळी मोर वेगाने धावू शकतो.

        आयुर्वेदामध्ये मोराच्या पंखांचा औषधासाठी उपयोग केला गेलेला आढळतो. मोर पावसात नाचतो याचे अनुकरण करून अनेक समाजामध्ये नृत्य देखील केले जाते त्यालाच मोरनृत्य असं सुद्धा म्हणतात. यामध्ये मोरासारखे दिसणार खोटे खोटे मोरपंख लावून नृत्य केले जाते.

        खेड्यांमध्ये आजही शेतात त् मोर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात शहरांमध्ये मात्र मोर बघण्यासाठी संग्रहालयामध्ये जावे लागते. इतक्या सुंदर पक्षाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.

FAQ 


आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?

आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

मोर काय खातो? मोराचे अन्न कोणते?

मोर बरे गहू मका बाजरी ज्वारी इत्यादी धान्याचे दाणे देखील खातो. त्याबरोबरच किडे सरडे आणि साप यांनादेखील मोर खातो.

मोराच्या आवाजाला काय म्हणतात?

मोराच्या आवाजाला केकारव म्हणतात.


मोर का नाचतात? किंवा मोर का नाचतो?

आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी मोर नाचतात.

मादी मोराला काय म्हणतात?(peahen)

मादी मोराला लांडोर म्हणतात.

भारतात मोर मारणे गुन्हा आहे का?

हो भारतात मोर मारणे गुन्हा आहे आहे आपला राष्ट्रीय पक्षी असून प्रतिबंधित पक्षी आहे. भारतीय वन अधिनियम 1972 नुसार मोराला मारणे प्रतिबंधित आहे. मोरांची शिकार करणे दंडनीय गुन्हा आहे.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी का आहे?

मोराला 1963 मध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आले. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये हे मोराचे  महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्याबरोबरच त्याची सुंदरता आणि विविध गुणवैशिष्ट्ये देखील आहेतच.

 निष्कर्ष (conclusion)


    मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण peacock information in Marathi पहिली. यामध्ये मोराची  संपूर्ण माहिती तसेच निबंध  याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. हा लेख  वाचल्यानंतर तुम्हाला मोराविषयी अनेक गोष्टी नक्कीच माहीत झाल्या असतील.
   
    इंटरनेटवर वर माहिती विविध स्वरूपामध्ये दिलेली असते परंतु तुमचा वेळ वाचावा म्हणून सर्व माहिती एकाच लेखामध्ये देण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करत असतो.
  
    काही चुकल्यास सांगा आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याबरोबरच
Peacock in Marathi या लेखाविषयी तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही peacock विषयी अजून काही माहिती  असेल तर मला नक्की सांगा म्हणजे ती माहिती या लेखामध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल.

     सरते शेवटी पुन्हा सांगावेसे वाटते की वरील मोराची माहिती या लेखामध्ये आता आपल्याला काही शिकायला मिळाले असेल तर तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडियावर ही माहिती नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद.

     


     


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने