www.upkarmarathi.com
| vachniy lekh |

वाचनीय मराठी लेख - आप बीती





 |वाचनीय मराठी लेख - आप बीती

लेखन 
श्री.राहुल आनंदा शेलार 
मालेगाव जि. नाशिक
7588278540

*आप बिती*



      नेहमी प्रमाणे मी माझ्या मुलाला(राजवीर) ट्यूशन संपली म्हणून घेण्यासाठी गेलो.राजवीर वर्गातून बाहेर आला.. पण ट्यूशन संपल्यावर घरी जाण्याचा त्याचा रोजचा जो आनंद आणि उत्साह होता तो मात्र आज दिसत नव्हता.काहीतरी बिनसलय हे माझ्या लक्षात आलं.अगदी कोमेजलेल्या फुलासारखा एवढासा चेहरा करून प्रचंड तणावात असल्यासारखा तो बाहेर आला.मला वाटल त्याला विचारवं की काय झालं?? पण मी काहीही विचारले नाही. तो जेव्हा गाडीवर बसला तेव्हा त्यानेच अगदी रडक्या आवाजात मला सांगितले की *पप्पा आज वर्गात टीचर ने सगळ्यांना चॉकलेट दिल्या पण मला नाही दिली.*
     अच्छा त्याच्या नाराजीचे कारण माझ्या लक्षात आले आणि मी घरी आल्यावर त्याला दुकानात घेऊन गेलो आणि 4 चॉकलेट घेऊन दिल्या.मला वाटल आता प्रकरण संपले आहे कारण त्याला 1 ऐवजी मी 4 चॉकलेट घेऊन दिल्या होत्या. मी माझ्या जबाबदारितून मुक्त झालो असे मला वाटले.त्याने त्या चॉकलेट खाल्ल्या पण त्याच्या मनावरचं मळभ काही दूर झालेले नव्हते.ट्यूशन सुटली की त्याचा कार्यक्रम ठरलेला असायचा.एक तर tv पहायची किवा मोबाइल पहायचा नाहीतर बाहेर मुलांसोबत खेळायला जायचे.पण त्या सायंकाळी त्याने यातल काहीही केलं नाही.त्याच्यातला हा बदल माझ्या लक्षात आला होता पण मी दुर्लक्ष करत होतो.काही वेळाने तो माझ्या अभ्यासाच्या रूम मधे आला आणि मला घट्ट मीठी मारत त्याचा प्रश्न आला की पप्पा मला टीचरने चॉकलेट का बर नाही दिली हो ?
     आता मात्र मला त्या टीचर आणि माझ्या मूलाचा दोघांचा प्रचंड राग आला. कारण एकतर मुलाला मी 1 ऐवजी 4 चॉकलेट घेऊन दिल्या म्हणून त्याचा,आणि त्या टीचर ने 1 रूपयाची चॉकलेट माझ्या मुलाला का दिली नसावी म्हणून त्या टीचरचापण. तरीही त्याची मी कशीबशी समजूत काढून विषय बदलला.रात्री झोपताना त्याने पुन्हा मला तोच प्रश्न केला की फक्त मला चॉकलेट नही दिली पप्पा टीचर ने अस का ?
      आता ही तिसरी वेळ होती. त्याची हा प्रश्न मला विचारण्याची.आता त्याच्यापेक्षा मी प्रचंड अस्वस्थ झालो कारण ज्या मुलाला घरात पाहिजेल ती वस्तु खायला मिळते, हवी तेवढ्या प्रमाणात मिळते, आणि विशेष म्हणजे मागितली तेव्हा मिळते त्या मुलाने फक्त टीचर ने 1 चॉकलेट दिली नाही म्हणून एवढं खचून का जावे?एवढं हिरमुसुन का जावे???
मी राजवीर ला काहीही उत्तर न देता कसंतरी झोपवलं.पण माझ्या मनाच्या रणांगनावर विचारांचे घोड़े एवढ्या वेगाने धावत होते की मला काही केल्या झोप येत नव्हती.अस वाटत होतं की आत्ताच्या आता त्या टीचर ला विचाराव की माझ्या मुलाला 1 रूपयाची चॉकलेट तुम्ही का दिली नाही??आणि उरली गोष्ट त्याच्या अभ्यासाची तर तो निश्चितच इतर मुलांसारखा हुशार आहे यात काही शंका तर नव्हतीच.शेवटी विचारांच्या दुनियेतुन मी उशीराने का होईना झोपेच्या दुनियेत शिरलो.
दूसरा दिवस उजाडला.रविवार होता म्हणून आज राजवीर च्या ट्यूशन ला सुट्टी होती आणि माझ्याकड़ेही मित्र येणार असल्याने मी त्या तयारीत लागलो.कालचे प्रकरण बऱ्यापैकी अनपेक्षित आणि प्रचंड त्रासदायक होते माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठीही.पण अस म्हणतात की *काळ प्रत्येक दुःखावरच औषध असतं* तस त्याच्या आणि माझ्या मनावरचा ताण एका रात्रीत बऱ्यापैकी कमी झाल्यासारखा मला वाटला.
माझे मित्र आले त्यांनी माझ्या मुलासाठी चॉकलेट आणल्या होत्या त्या त्यांनी आल्या आल्या माझ्या मुलाच्या हातात दिल्या.माझ्या मुलाने त्या चॉकलेट घेतल्या आणि त्याच्या तोंडून पुढील वाक्य निघाले *थैंक यू अंकल.टीचर ने नाही दिल्या पण तुम्ही दिल्या.*
      मी हे वाक्य स्पष्ट ऐकलं आणि मी आता मात्र भयानक हादरलो.कारण माझ्या मुलाने आजपर्यन्त एखादी गोष्ट एवढी मनाला लाऊन घेतलेली मला या 5 वर्षात कधीही आठवत नही.मला मात्र आता स्पष्ट जाणीव झाली की या घटनेचा माझ्या मुलाच्या मनावर प्रचंड खोलवर आघात झाला आहे.
मी शांत राहत पूर्ण दिवस मित्रांसोबत घालवला पण माझं मन मात्र आतून खुप अस्वस्थ झालं होतं.(जस प्रत्येक बापाचं आपल्या लेकरासाठी होतं तसं).
आता मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन गेली होती की प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नक्कीच नाहीये.आलेले मित्र निघुन गेले आणि सोमवार उजेडला..आज आपण या प्रकारणाचा निकाल लावायला हवा असा निश्चय मनाशी करत माझ्या दिवसाची सुरुवात झाली.आजही सकाळपासुन राजवीर चा तोच प्रश्न 3 वेळा मला विचारला गेला होता पण मी त्याला म्हटलो की बेटा आज सायंकाळी आपण टीचर ला विचारुया की तुला चॉक्लेट का नाही दिली म्हणून?.
      झालं आमचं दोघांचं ठरलं की सायंकाळी टीचर ला विचारायच. चार वाजेला मी राजवीर ला ट्यूशन ला सोडायला गेलो पण तोपर्यंत वर्गात सगळी मुले येऊन बसली होती म्हणून मी त्यावेळी टीचर शी बोलणे योग्य नाही असं मला वाटलं म्हणून जेव्हा ट्यूशन सूटेल तेव्हा विचारुयात असं ठरवून मी निघुन आलो.
       4 ते 6 या दोन तासात मी टीचर ला कोणते प्रश्न विचारायचे?कसे विचारायचे?याचं गणित मांडत बसलो होतो.शेवटी 6 वाजले आणि मी ट्यूशन समोर गेलो. राजवीर प्रचंड उत्साहात आणि अगदी ऐन पहाटे नव्याने उमललेल्या फुलासारखा प्रसन्न चेहरा घेऊन बाहेर आला आणि दुरुनच हातातली चॉकलेट दाखवत ओरडला *पप्पा टीचर ने चॉकलेट दिली.त्याचा तो चेहरा पाहुन आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो अप्रतिम आणि अतिउत्साह पाहुन मी मांडलेली सर्व गणितं मला चुकल्यासरखी वाटली.माझा निश्चय डगमगला आणि मी टीचर शी काहीही न बोलता राजवीर च्या आनंदात सहभागी होत घरी निघुन आलो. त्याच्या हातात 1 रूपयाला भेटणारी चॉकलेट होती पण त्याच्या चेहऱ्यावर किम्मत न करता येण्यासारखा आनंद ओसांडून वाहत होता.
पण प्रकरण अर्ध्यावर राहिले आहे याची खंत माझ्या मनाला वाटत होती.म्हणून मी पुन्हा टीचर कड़े गेलो आणि त्यांनी तेव्हा मला सांगितले की *मी शुक्रवारी सर्व मुलांची टेस्ट घेतली.त्या सर्व मुलांचे पेपर शनिवार पर्यन्त तपासून झाले नाही.पण ज्या 15 मुलांचे पेपर तपासले गेले होते त्यां सर्व मुलांना मी शनिवारी चॉकलेट दिल्या आणि राजवीर आणि त्याच्या सोबत अजुन 4 मुलांचे पेपर तपासायचे राहिले होते. त्यांचे पेपर मी आज(सोमवारी)दिले आणि त्यांना सगळ्यांना चॉकलेट दिल्या.
      मी टीचरला थैंक्स म्हणत बाहेर पडलो.मेंदुवर असंख्य विंचुनी डंख मारावा आणि त्याच्या वेदना नसानसातून व्हाव्या एवढ्या भयानक मनस्थितित घरी आलो.राजवीर ने अजूनही ती चॉकलेट खाल्लेली नव्हती.त्याच्या आईला,मित्रांना तो ती चॉकलेट दाखवत एवढंच म्हणत होता टीचर ने मला चॉकलेट दिली.
     मी अजूनही सुन्न होतो की या मुलाला आजपर्यन्त अनेक महागड़या चॉकलेट घेऊन दिल्या,महागड़या खेळणी घेऊन दिल्या पण त्याला एवढा आनंद कधी झाला नव्हता.. कारण *वस्तुची खरी किम्मत तिच्यावर छापलेली MRP नसून ती वस्तु तुम्हाला कोण देत आहे यावर ठरत असते* हा धड़ा मला शिकायला मिळाला.

मुलाचे प्रकरण इथे संपले पण........

      पण काही प्रश्न माझ्या मनात उठले.कारण मी स्वताही एक शिक्षक आहे म्हणून मी माझ्या 11 वर्षाच्या कामगिरिचा उहापोह करण्याचा प्रयत्न सुरु केला पण सुदैवाने मी माझ्या या 11 वर्षात एक चूक केली नव्हती ती म्हणजे मी वर्गात अनेक स्पर्धा घेतल्या वर्गाबाहेर ही घेतल्या पण बक्षीस मात्र मी सर्व मुलांना दिली होती(अनावधानाने म्हणा किवा सुज्ञपनाने म्हणा) ..भले ही प्रथम द्वितीय तृतीय आलेल्याना मोठे दिले असेल पण वर्गातल्या प्रत्येक लेकराला त्याचवेळी मी काही ना काही दिले आहे याचं मला समाधान वाटलं.कारण आज स्वताच्या मुलावर जी गोष्ट जो प्रसंग ओढावला होता तो प्रसंग माझ्या हातून माझ्या 11 वर्षात माझ्या शाळेतल्या मुलांवर ओढावला नाही याचे प्रचंड समाधान मला लाभले.असं म्हणतात की... स्वताचं घर जळाल्याशिवाय इतरांच्या मनातल्या ज्वालांचा दाह त्यांच्या वेदना समजत नसतात* अगदी तसंच काहीस आज घडलं होतं.माझ्या हाताखाली माझी 45 लेकरं शाळेत असतात आणि दरवर्षी ती येतात आणि जातात.पण माझ्या मुलाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा स्वताच्या कर्तुत्वाची जाणीव झाली आणि आपण आजपर्यन्त आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर घाव घातला नाही याचं समाधान देखील लाभले.

      सरते शेवटी माझ्या प्रत्येक शिक्षक वर्गास एवढंच सांगेल की *प्रलय और निर्माण हमारी गोद मे खेलते है* म्हणून या लहान लेकरांच्या भावविश्वाला जाणून घेऊयात.कारण ज्या वयात ही आपल्याकडे येतात ते वय किती हळवं आहे याची कदाचित प्रत्येकाला जाणीव नसेल (मलाही तेवढ़ी नव्हती) या वयात आपली एक चूक आपल्या विद्यार्थ्यांच उभं आयुष्य खराब करु शकते आणि आपली त्यांच्याबद्दलची जागरूकता त्यांच्या आयुष्याचं आणि भविष्याचं सोनं करू शकते. म्हणून एक बाप म्हणून आणि एक शिक्षक म्हणून एकच विनंती असेल *वर्गातल्या प्रत्येक मुलाला पोटाच्या पोराप्रमाणे पाहुयात म्हणजे आपल्याला त्यांचा बाप/आई होता येईल.तसे पाहिले तर माझा सर्व शिक्षक परिवार प्रामानिकपणे आपलं ज्ञानदानाचन कार्य अविरत करत असतो पण *जसे काही अपघात अनपेक्षित घडतात आणि आयुष्य उध्वस्त करतात तसेच अनपेक्षित, अनावधानाने अपघात आपल्या हातून घडू नये म्हणून सतर्क राहुयात आणि उद्याच्या उज्वल भारताचे स्वप्न आपल्या वर्गातून पूर्ण करुयात.

         शेवटची विनंती सर्व पालकाना👇🏻
         आपल्या मुलाच्या वर्तनात अचानक प्रचंड बदल जाणवला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा.मी 4 चॉकलेट घेऊन दिल्या म्हणून मलाही माझी जबाबदारी संपली असे वाटले होते.पण तसं नसतं.म्हणून त्यांचे भावविश्व समजून घ्या.आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या मुलाच्या शाळेतील आणि ट्यूशन च्या शिक्षकांच्या नियमित संपर्कात राहा.

    ये बच्चे है सहाब , अच्छे संस्कार और प्यार दिया तो आपका नाम रोशन कर देंगे और अगर नही दिया तो आपका नाम मिट्टी में मिला देंगे |

finally heartly thanks to my son RAJVEER and heartly thanks to his teacher.


  (सदर घटना वास्तविक माझ्या मुलाच्या आयुष्यातली आहे.)

      यकीन नही होता सहाब की 1 रुपये की चॉकलेट बच्चे की हंसी छीन सकती है और वही चॉकलेट उसे दुनिया की सबसे बड़ी खुशी भी दे सकती है.







*

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने