www.upkarmarathi.com

   बहुतेक जगामध्ये दिसणाऱ्या सर्व वस्तू या कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्य संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून तयार झालेले असतात.
     महत्प्रयासानंतर शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे धातू ,अधातू आणि धातुसदृश्य असे वर्गीकरण केल.

धातू अधातू | metal and nonmetals
धातू अधातू | metal and nonmetals



धातु म्हणजे काय?|metal and nonmetal

    ज्यावेळी एखादा मूलद्रव्य स्वतःमधील इलेक्ट्रोन गमावून धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करत असेल ,तर अशा मूलद्रव्यांना धातू असे म्हणतात.
  लोखंड, तांबे, चांदी ,सोने ,कॅल्शियम, सोडियम, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम हे धातू आहेत.
   म्हणजेच हे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून कॅटायन निर्माण करतात.

धातूंचे भौतिक गुणधर्म physical properties of metals


  1. अवस्था ( physical state)
  2. तन्यता( ductility)
  3.  वर्धनीयता(  malleability)
  4.  उष्णतेचे वहन ( Conduction of heat)
  5. विद्युत वहन(  conduction of electricity)
  6.  तेज चकाकी ( lustre)
  7. कठीणपणा(  hardness)
  8. नादमयता sonority)
  9.  द्रवणांक व उत्कलनांक ( melting and boiling point)
  10.  घनता ( density)

1)अवस्थाPhysical state)

    सर्वसामान्यपणे धातू सहजपणे आपली अवस्था बदलत नाहीत सामान्य तापमानाला धातु आपल्या अवस्था बदलत नाहीत.
   पारा व गॅलियम हे अपवाद आहेत. हे दोन्ही सर्वसाधारण म्हणजेच कक्ष तापमानाला सुद्धा द्रव अवस्थेमध्ये असतात.

  1. तन्यता( ductility)

      धातूंवर दाब देऊन किंवा अन्य प्रक्रियेने त्यांच्यापासून तार तयार करता येते . या गुणधर्माला तन्यता म्हणजेच डक्टीलिटी असे म्हटले जाते.

  1.  वर्धनीयता(  malleability)

  धातूंना ठोकून त्यांच्यापासून पत्रा तयार करता येतो धातूंचे या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हटले जाते यालाच इंग्लिशमध्ये malleability असे म्हणतात.
   एखाद्या खिळा घेतल्यानंतर तो हातोडीने ठोकत राहिल्यास काही वेळाने त्या खिळ्याचे छोट्या पत्र्यामध्ये रूपांतर होते. हा वर्धनीयता गुणधर्मच आहे.
ॲल्युमिनियम चांदी आणि सोने हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सोन्याचे 1/10,000 मिलिमीटर जाडीची पातळ पत्रे आणि 1/5000 मिलिमीटर व्यासाची तार सुद्धा तयार करता येते.

 तेज चकाकी ( lustre)

  धातूंना चकाकी असते म्हणजेच धातू चमकतात. आपल्या घरातील तांब्याची भांडी जर आपण घातली तर ती चमकू लागतात. याचे कारण म्हणजे धातूंमध्ये असलेला चकाकी हा गुणधर्म.

कठीणपणा(  hardness)

धातू अत्यंत कठीण असतात याला अपवाद फक्त सोडियम आणि पोटॅशियम आहेत हे धातू चाकूच्या सहाय्याने  सहज कापता येतात.

 उष्णतेचे वहन ( Conduction of heat) 


   जर आपण एखादा खिळा घेतला आणि तो मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या ज्योतीवर धरला तर काही वेळानंतर आपण ठरलेल्या जागी सुद्धा खिळा गरम होतो. याचा अर्थ धातू मधून उष्णतेचे वहन होते. म्हणूनच उष्णतेचे वाहन हा धातूचा एक गुणधर्म आहे.
सोने ,चांदी , ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम सुवाहक धातू आहेत.

 द्रवणांक व उत्कलनांक ( melting and boiling point)


द्रवणांक म्हणजे काय?


ज्या तापमानाला धातूचे द्रवात रूपांतर होते त्या तापमानाला धातूचा द्रवणांक असे म्हणतात.

उत्कलनांक म्हणजे काय?


 ज्या तापमानाला धातु कळू लागतात त्या तापमानाला त्या धातूचा उत्कलनांक असं म्हणतात.
धातूंचे  द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात.
अपवाद-Ga,Ha,Na,K

विद्युत वहन

   धातु मधून विजेचे देखील वहन होते म्हणजेच धातू विजेचे सुवाहक असतात .
याला अपवाद म्हणजे शिसे हा धातू आहे.

शिसे हा एकमेव धातू असा आहे की जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही.

नादमयता sonority)


      आपण जर दोन लोखंडी पाईप घेतले आणि ते एकमेकांवर आपटले तरी एक विशिष्ट ध्वनी तयार होतो. तसेच मंदिरातील घंटा वाजल्यानंतर विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. असा विशिष्ट ध्वनी निर्माण होण्याची धातूंची विशेषता आहे त्यालाच नादमयता असे म्हणतात.
  थोडक्यात म्हणजे धातू एकमेकावर आपटले तर त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो.

अधातूंचे भौतिक गुणधर्म (physical properties of nonmetals)


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने