www.upkarmarathi.com

      |biodiversity information in Marathi आपल्या पृथ्वीवर जर फक्त मनुष्यप्राणी राहिला असता व इतर कोणत्याही प्रकारचे सजीव जर राहिले नसते तर माणसाचे जीवन आजच्यासारखे आनंदी, सुखी व विविधतापूर्ण राहिले असते का ? किंवा जंगलामध्ये फक्त वाघाच राहिले असते तर ही सजीव सृष्टी टिकली असती का? असे जर तुम्हाला विचारले तर याचे उत्तर तुम्ही निश्चितच नाही असे द्याल. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव-निर्जीव वस्तू व प्राणी-पक्ष्यांची एकमेकांशी असणारे संबंध याविषयी छान माहिती देणारा जैवविविधता म्हणजे काय हा लेख आपण बघूया.

| जैवविविधता म्हणजे काय ?


     दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती बघायला मिळतात. हे सर्व पक्षी एकच प्रकारचे आहेत का ? किंवा प्राणी हे एक सारखेच दिसतात का? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर त्याचे उत्तर अर्थातच नाही असे तुम्ही देणार.

     पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीवांमधील असणारी विविधता म्हणजेच जैवविविधता होय. यालाच जैविक विविधता असेदेखील म्हणतात.

     आपल्या पृथ्वीवर जे जे सजीव अस्तित्वात आहेत त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी या दोघांचाही समावेश होतो. या सर्वांमध्ये हजारो प्रकारच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. सर्व प्राणी आणि वनस्पती यांचा आकार त्यांच्या कृती या सर्वांचे अवयव या सर्व बाबतीमध्ये वेगळेपणा आढळतो.

      एकंदरीत विचार केला तर पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांमध्ये रंग ,आकार ,आकृती इत्यादी सर्व विविधता आढळून येते .त्यालाच जैविक विविधता किंवा जैवविविधता असे म्हणतात.

जैवविविधता म्हणजे काय ?
biodiversity information in Marathi



    | जैवविविधता कोणकोणत्या बाबतीत आढळून येते.

  1. शरीर रचना
  2. आकार
  3. अवयव
  4. प्रजनन
  5. आहार
  6. गुणसूत्र 
  7. अधिवास. इत्यादी ...

       |जैविक विविधतेचे प्रकार कोणते ?

 |जैवविविधता प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात.
  1. जनुकीय विविधता (अनुवांशिक विविधता )
  2. जाती विविधता (प्रजाती  विविधता)
  3. परिसंस्था विविधता


|जनुकीय विविधता(अनुवांशिक विविधता )


      जनुकीय विविधतेचे मध्ये एखाद्या जातीच्या सजीवांमधील जनुकांमध्ये असणारे विविधता याचा अभ्यास केला जातो. गुणसूत्रांमधील विविधता यामध्ये अभ्यासली जाते.उदाहरण : एकाच घरातील माणसे सारखी नसतात .

|जाती विविधता (प्रजाती  विविधता)


      एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये आढळून येणाऱ्या किंवा सजीवांच्या विशिष्ट गटांमध्ये जी जैवविविधता आढळून येते .तिचा अभ्यास जाती  विविधतेमध्ये केला जातो. ध्रुवीय म्हणजेच थंड  प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या सजीवांच्या जातीमध्ये उष्ण प्रदेशातील सजीवांच्या मानाने कमी विविधता आढळून येते.

|परिसंस्था विविधता


         विशिष्ट सजीव ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राहतात तिला परिसंस्था असे म्हटले जाते. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत यामध्ये प्राणी व वनस्पती या दोघांचा आपल्याला समावेश करता येईल. ज्या परिसंस्थेमध्ये प्राणी किंवा वनस्पती राहत असतात त्या सर्व प्राणी आणि वनस्पतींना आवश्यक घटकांचा परिसंस्थेमध्ये समावेश केलेला असतो. प्रत्येक परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारच्या या जातींचे मिश्रण असते आणि हे मिश्रण इतर परिसंस्थेत पेक्षा वेगळे असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्राचा समान अक्षर वृत्तीय विस्तार आहे तरीदेखील पश्चिम घाटात जैवविविधता जास्त आढळून येते तर पूर्व भागामध्ये ती कमी आहे.

|आपला परिसर कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे ?

      आपला परिसर प्राणी, पक्षी ,वनस्पती यामुळे सजलेला आहे त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला आपल्याला जे नदी, नाले, डोंगर, ओढे, ओहोळ दिसतात या सर्वांचा समावेश परिसरामध्ये होतो. सूक्ष्मजीव तसेच एकपेशीय  प्राणी, वनस्पतीं पासून तर देवमासा, हत्ती अशा महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांचा आपल्या परिसरामध्ये समावेश होतो.



|जैवविविधतेचा ऱ्हास|जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे


जैवविविधता नष्ट होण्याची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.

१) आपल्या देशाची अगदी वेगाने वाढणारी लोकसंख्या ही जैवविविधता नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढली अन्नधान्य वाढवण्यासाठी शेतकरी एक पीक पद्धतीने शेती करू लागला. एक पीक पद्धतीमध्ये ज्या उत्पादन मधून शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील त्याच पिकाची लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली. यामुळे वेगवेगळी पिके घेण्याची पारंपारिक शेतीची पद्धती खंडित झाली एक पीक पद्धतीचे प्रमाण वाढले. परंतु या एक पीक पद्धतीमुळे वनस्पतींमधील विविधता धोक्यात आली.

२) मुलांच्या बाबतीत देखील असेच झाले गुरांच्या स्थानिक जातींची जागा संकरित अशा परकीय जातीने घेतली त्यामुळे स्थानिक प्रजाती धोक्यात आल्या.

३) मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक प्रजातींच्या वनस्पतींची तोड केली. जसे की चंदनाचे झाडांची चोरी, सागाच्या झाडांची चोरी.

४) अवैध मार्गाने प्राण्यांची शिकार केली जाते आहे त्यामुळे प्राण्यांच्या जाती आणि त्यांची संख्या देखील कमी होत आहे. मानवाच्या अशा बेजबाबदार वागण्याने अनेक जाती संकटग्रस्त तर काही जाती दुर्मिळ झालेल्या आहेत. काही प्राणी तर नामशेष झाले आहेत.

५) वाढत्या लोकसंख्येमुळे एवढ्या लोकांना राहण्यासाठी जागेची गरज हसत आहे ही जागा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून मोकळी केली जात आहे. यामुळे अनेक वनस्पती नष्ट झाली झाल्या व त्या ठिकाणी माणसांच्या वसाहती वाढत आहेत.

६) मोठ मोठ्या धरणांचे काम करणे रस्त्यांचे काम करणे उद्योगधंद्यांसाठी बांधकाम करणे खाली खोदणे यामुळे खनिजांचा आणि नैसर्गिक स्त्रोत यांचा बेसुमार वापर होतो आहे अशा प्रकारच्या बांधकामांमुळे जैवविविधतेने समृद्ध असलेल्या अधिवासांचा नाश होतो आहे.

७) ध्वनीप्रदूषण ,जलप्रदूषण ,वायूप्रदूषण या प्रकारच्या प्रदूषणामुळे अनेक जलचर नष्ट झाले. वायू प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या या प्रजाती नष्ट होऊ लागलेल्या आहेत. प्रदूषण वाढल्यामुळे हवामानात बदल झाले व नैसर्गिक अधिवासामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आलेली आहे.

   अशी अनेक कारणे आपल्याला जैवविविधतेच्या कशाला जबाबदार धरता येतील. जैवविविधता जपायची असेल अशा ऱ्हास पावणार्‍या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आतााा निर्माण झालेली आहे.

| दुर्मिळ जातीच्या सजीवांच्या संरक्षणाचे उपाय, जैवविविधता टिकवण्याचे उपाय


  1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे रक्षण व जैवविविधता टिकवण्यासाठी शासनाने अनेक कायदेही केलेले आहेत व विविध उपायदेखील योजले आहेत.
  2. अभयारण्य  निर्माण करणे.
  3. राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करणे.
  4. काही विशिष्ट क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करायला हवे.
  5. दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरु करणे.
  6. प्राणिसंग्रहालयांमध्ये काही प्राण्यांच्या प्रजातींचे संवर्धन करणे.
  7. वनस्पतीशास्त्रीय बागांमध्ये वनस्पतींचे संवर्धन करणे.
  8. पारंपारिक ज्ञान साठवणे व त्याची नोंद करणे.

faq's

 |परिसंस्था शब्द प्रथम कोणी वापरला ?


     परिसंस्था यालाच इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम असे म्हटले जाते. परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम सर आर्थर जी .टांसली (sir Arthur G. tansley) यांनी 1935 साली वापरला.
    

   |जागतिक जैवविविधता दिन

       आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22मे या रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे सन 2000 पासून संपूर्ण जगभरात 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो.

|जैवविविधतेचे समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम कोणी मांडली ?

      ज्या ठिकाणी स्थानिक जाती मोठ्या संख्येने अशा वस्तीस्थान आला जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते. यालाच इंग्रजीमध्ये हॉटस्पॉट म्हणू शकतो. जैवविविधतेचे समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम डॉक्टर सबिना विर्क यांनी 1988 मध्ये मांडली.
 

|भारतामध्ये किती जैवविविधता क्षेत्र आहे ?

|भारतात किती जैव  भौगोलिक परिसर आहे?
       भारतामध्ये एकूण तीन जैवविविधता क्षेत्र आहेत. हिमालय ,पश्चिमघाट ,इंडोम्यानमार (अंदमान आणि निकोबार बेटा सहीत)

औद्योगिकीकरण किंवा औद्योगिक प्रदूषण या विषयी माहिती वाचा.

    प्रिय वाचक मित्रांनो तुम्हालाही जैवविविधते विषयी मराठी माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने