www.upkarmarathi.com

आनंदी राहण्यासाठी उपाय |anandi rahnyache upay |आनंदी राहण्याचे मार्ग
 |anandi rahnyache upay |


नेहमी आनंदी कसे रहावे?


      मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ,आनंदी राहण्याचे उपाय.
          या जगामध्ये मला " सुख किंवा आनंद नको" असे सांगणारी एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे आनंद मिळवण्याचेेेेेे साधन आणि कारणे वेगवेगळी असतात कुणाला भरपूर गप्पा मारायलाा आवडतं. तर कुणाला शांत राहायला आवडत . कुणाला गर्दी मध्ये जाऊन नव-नवीन मित्र-मैत्रीण बनवणेेेेे आवडते ,तर कुणाला एकांत प्रिय वाटतो .सबके अपने अपने फंडे है भाई साहब 


       आनंद मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. पण त्या प्रयत्नांमधून आनंद मिळेलच असे अजिबात नाही .याठिकाणी मात्र मी तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहे ,की त्यातून कोणत्यातरी एका मार्गाने तुम्हाला नक्कीच आनंद मिळवता येईल .चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या लेखामध्ये |आनंद मिळवण्याचे उपाय.


योग्य संगत निवडा

       हिंदीमध्ये एक फारच सुंदर म्हण आहे जैसी संगत वैसी रंगत. अशा प्रकारच्या संगतीच्या लोकांमध्ये तुम्ही राहणार तसेच तुम्ही होऊन जाणार. हिंदी सांगत किंवा तुमचे सवंगडी जर सतत नवनवीन विचारांचा ध्यास धरणारे असतील इतरांना मदत करणारे असतील आनंदी राहणारे असतील तर तुम्ही देखील आनंदी रहाल एखाद्या वेळी तुमच्याबरोबर एखादा दुःखद प्रसंग घडला तरी देखील अशा संगतीमुळे तुम्हाला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी चांगली साथ मिळेल व तुम्हाला आनंद नक्की मिळेल.

सकारात्मक विचार करत जा

    या जगात अडचणी नाहीत असा व्यक्ती सापडणे अशक्य आहे माणसाचा जन्मच मुळात प्रचंड मोठ्या अडचणीत न होतो त्यामुळे आपल्याला जीवनात अडचणी या येथीलच त्यांचा सामना आपल्याला करावाच लागेल असा सकारात्मक दृष्टिकोन सतत असू द्या आणि कितीही अडचणी आल्या तरी देखील त्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहेच असा सकारात्मक विचार सतत करत रहा.

नकारात्मक लोकांपासून दूर

    नकारात्मक मनस्थिती असणारे लोक दुसऱ्यांची मनस्थिती देखील बिघडवून टाकतात त्यामुळे अशा नकारात्मक माणसांना आपल्या अवतीभवती देखील फिरू देऊ नका आणि तुम्ही देखील त्यांची संगत अजिबात करू नका तुम्ही कधी त्यांच्या सारखे होऊन जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. सावध राहा.

एखादा छंद जोपासा 
        एखादा छंद किंवा कला माणसाला जगायला शिकवते हे सर्व मान्य आहे. ज्या गोष्टीचा आपल्याला छंद असतो तिच्या मधून आपल्याला आनंद नक्कीच मिळतो त्यामुळे जावे तुम्हाला कधी करमत नसेल किंवा काही दुःख झाले असेल तर तुमच्या छंदाला तुमच्याजवळ करा म्हणजे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रेरणा सतत मिळत राहील.

स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा
     जो व्यक्ती स्वतःचाच आदर करू शकत नाही त्याचा हजार इतर व्यक्ती कसे करणारी अगदी साधी सहज गोष्ट आहे. तुम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कितीही कठीण परिस्थिती आली तर देखील मी हार मानणार नाही मी यातून मार्ग काढे नाच असा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा यातून तुम्हाला अत्यंत सुखद अनुभव येतील.


इतरांची निंदा-नालस्ती करण्यात वेळ वाया घालवू नका
    आपण इतरांची निंदा ज्यावेळी करतो त्यावेळी सुरुवातीला तर आपण फार चांगले फील करतो परंतु हळूहळू आपल्याला ती सवयच लागून जाते.


आपण जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे
          संत कबीर जींचा फार सुंदर दोहा आहे ." बोए बीज बबूल का तो आम कहां से होय।"
   याचा अर्थ असा कि , की जर  तुम्ही  कडू लिंबाचे झाड लावले तर त्याला मधुर आणि गोड आंब्याची फळे कशी लागणार? . त्यामुळे जर तुम्ही इतरांना प्रेम दिलं आनंद दिला तर तुम्हाला देखील प्रेम आणि आनंद मिळेलच यात अजिबात शंका नाही.

इतरांना मदत करत जा

      खरा आनंद देण्यात आहे हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एखाद्याला मदत करत नाही तोपर्यंत अजिबात खरे वाटणार नाही परंतु एखाद्याला मनापासून थोडीशी का असेना मदत करून बघा ती छोटीशी मदत तुम्हाला फार मोठा आनंद देऊन जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो .

FAQ {लोक हे देखील विचारतात }

  1.  | तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा 
        माझे जीवन आनंदी होण्यासाठी मी सतत आनंदी राहणाऱ्या लोकांमध्येच राहील नकरात्मक बोल ना लोकांमध्ये राहणे मी प्रकर्षाने टाळेल. कोणत्या कृती केल्याने मला आनंद मिळतो याचा नीट विचार करून एक  छान छंद जोपासता येईल.

या लेखाचा लोक खालील प्रमाणे ही शोध घेतात.
  1. |आनंद मिळवण्याचे मार्ग
  2. |आनंदी कसे व्हावे
  3. |आनंदी होण्याचे उपाय कोणते
  4. |तुम्हाला आनंदी व्हायचे आहे का
  5. |मी कसा आनंदी होईल
  6. |मला कसे आनंदी होता येईल
  7. |जीवन आरोग्यपूर्ण आनंदी व उत्साही राहण्यासाठी काय आवश्यक आहे
  8. | तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा 
  9. |आनंदी राहण्यासाठी काय करावे 
  10. |तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्ही काय कराल

तुम्हाला हे  खालील लेख नक्की आवडतील

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने