www.upkarmarathi.com

| माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना|


        कोरोना काळामुळे शाळेला सुमारे दोन वर्षांपासून सुट्ट्या आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. आमचे छोटेसे किराणा मालाचे दुकान आहे. त्यामुळे आमच्या दुकानांमध्ये सतत कोणीतरी काहीतरी घेण्यासाठी येत असते. मध्यंतरी काही काळ येथील झालेला होता त्यामुळे किराणा मालाचा दुकानाचा माल घेण्यासाठी मी व पप्पा निघालेलो होतो.

      नाशिकला माल घेण्यासाठी जात होतो. परत येताना आम्हाला गाडीत मिळत नव्हती त्यावेळी एका चार चाकीला आम्ही  हात दिला चार चाकी थांबली. गाडी रिकामीच होती कार चालकाने देखील आम्हाला बसण्यास सांगितले व कुठे जात आहात असे विचारले कार चालक आमच्या गावाच्या ही पुण जाणार होता म्हणून त्याने आम्हाला बसण्यास सांगितले आम्ही घेतलेला माल दुसऱ्या गाडीने येणार  होता.

        पप्पांची व कार चालकाची प्राथमिक काही चर्चा झाल्यानंतर कार चालक असे म्हणाला की आता जगामध्ये हा कोरोनाव्हायरस पसरलेला आहे त्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्यामध्ये भारतातील व भारताबाहेरील देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली हे सर्व मृत्यूचे झालेले आहेत या सर्वांचे पाप मी माझ्या माथ्यावर घेतलेले आहे. चालकाचे बोलणे ऐकून मी व पप्पा एकमेकांकडे बघू लागलो. मला तर कारचालक थोडासा वेडाच वाटत होता. पण करणार काय तो आम्हाला गावी घेऊन जात होता म्हणून त्याचे बोलणे ऐकणे क्रमप्राप्तच होते.

        पप्पा नही त्याला विचारायला सुरुवात केली पण इतके पाप तुम्ही स्वतःवर का घेत आहात त्यावर तो म्हणाला अहो मग देवाने इतके पाप त्याच्या डोक्यावर घेतले तर देवाला रात्री झोप कशी लागेल. देवाला काहीही त्रास होऊ नये म्हणून मी हे सर्व पातक माझ्या डोक्यावर घेतले आहे कारण मी देवाचा निस्सीम भक्त आहे आणि देवाने मला इतकी शक्ती दिलेली आहे की या संपूर्ण जगावर येत्या अकरा महिन्यांमध्ये माझे राज्य असेल.

       मग मीही मध्येच म्हटलं तुमच्या राज्यांमध्ये आम्हाला राहू देणार की नाही. कार चालक पुन्हा तावातावाने बोलू लागला माझ्या राज्यांमध्ये सर्व बालकांना मुभा असेल. परंतु वडिलधार्‍या माणसांना मात्र कडक शिस्तीचे पालन करावे लागेल. त्याचे हे बोलणे ऐकून मला फारच मस्त वाटले मी त्यांना म्हटले की मग मी तुमच्या राज्यांमध्ये आनंदाने राहील माझ्या पप्पांचा काही खरं नाही कारण ते मला फार रागवतात.

       कार चालकाच्या बोलण्याला आता काही सीमाच राहिली नव्हती तो सरळ म्हणाला की या संपूर्ण विश्वाचा विश्व संचालक मी होणार आहे. हे ऐकून मला व पप्पांना हसू अनावर झाले परंतु आम्ही आमचे हसू आवरले. पप्पा हळूच  म्हणाले,
   तुमचे राज्य सुरू झाले हे आम्हाला कसे कळणार?

     यावर कळस म्हणजे कार चालक म्हणाला की या देशाच्या संरक्षण यंत्रणे मधला  सर्वात मोठा अधिकारी आणि राजकीय यंत्रणे  मधला देखील सर्वात मोठा नेता मला घेण्यासाठी येणार आहे त्यावेळी तुम्हाला ती बातमी टीव्ही मध्ये बघायला मिळेल. आता मात्र मला कार चालकाच्या बोलण्याचे अधिकच हसू येऊ लागले.
      कार चालकाचे कपडे बघून तर तो चांगला सुशिक्षित घरातील वाटत होता . मग हा असा का बोलतो याचेच मला आश्चर्य वाटत होते . त्याला मी म्हटले की तुमचे नाव काय?

यावरही तो अजुन गमतीदार उत्तर देत म्हणाला माझे आत्ताचे नाव गोपीनाथ आहे. पंजाबी माझ्या हातामध्ये या संपूर्ण विश्वाचे संचालन करण्याची जबाबदारी येईल त्यावेळी माझे नाव आर्यावर्त विजेता गोपीनाथ असे राहील.

         मला मनातल्या मनात वाटत होते की याच्या डोक्याचे पेच  ढीले झालेले आहेत की काय?

      त्याच्या गप्पांना काही अंतच दिसत नव्हता बोलण्याच्या ओघात आमचे गाव आले . गाव आल्याचे बघताच पप्पा म्हणाले आर्यावर्त विजेते गोपीनाथ दादा कृपया आपले वाहन थांबवा आम्हाला या ठिकाणी उतरावयाचे आहे.

     कार चालकाने गाडी थांबवली आम्ही खाली उतरलो पप्पा कार चालकांना पैसे देत म्हणाले साहेब ज्यावेळी तुम्ही विश्व संचालक म्हणाल त्यावेळी माझ्या दुकानाचे संचलन कसे चालू आहे याकडेही लक्ष ठेवा.

     कार चालकांनी पप्पांकडे बघितले पप्पांनी देऊ केलेले पैसे त्याने घेतले कपाळाला लावले स्वतःच्या खिशात ठेवले आणि पुन्हा परत पप्पांकडे दिले आणि सांगितले हे पैसे माझा प्रसाद म्हणून तुम्हाला मी देत आहे याची काळजी घ्या. पप्पांनी आदरपूर्वक दोन्ही हाताने ते पैसे परत घेतले खिशात ठेवले. रिक्षा चालक कार चालकाला म्हटले आपण जेव्हा हा विश्वास संचालक बनवून आमच्या गरिबाच्या झोपडीकडे या त्यावेळी याच पैशाने आपल्यासाठी आम्ही सरबत बनवून तोपर्यंत या पैशांना आम्ही अजिबात हात लावणार नाही.

   ठीक आहे तर चालेल आता येतो मी, असे म्हणून कार चालक  निघून गेला.

     मी त्याच्याकडे बघतच होतो तितक्यात पप्पा म्हणाले चला आर्यवर्त विजेते घराकडे जाण्याची वेळ झाली. मी आणि पप्पा मोठमोठ्याने हसतच घराकडे निघालो.

    असा  माणूस आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलेला नव्हता आणि पुढे ही बघायला मिळेल असे काही वाटत नाही ,कारण विश्व संचालक बनवण्याचा त्यांचा मुहूर्त कधीच टळून गेलेला आहे.

या निबंधाचा लोक खालीलप्रमाणे शोध घेतात .
  1. | majhya jivanatil avismarniy ghatna
  2. |माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग
  3. | अविस्मरणीय प्रसंग 
  4. ||माझ्या जीवनातील आनंददायी प्रसंग
  5. |मराठी प्रसंग लेखन

   प्रिय मित्रांनो तुम्हाला " घराचे मनोगत " निबंध कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा.

हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  19. लॉक डाऊन चे फायदे लेख वाचा.



     मित्रांनो, तुम्हाला हा माझ्या |जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग| कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा .
    तसेच तुमच्या जीवनातही काही अविस्मरणीय प्रसंग घडले असतील, तर ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा .  जर ते तुम्हाला या साईटवर प्रदर्शित करायची असतील तर तसेही आम्हाला कमेंट करुन सांगा .
     खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने