1001marathiessay.blogspot.com

संतवाणी- संतांची शिकवण | santvani| santanchi shikvan marathi mahiti

       महाराष्ट्राच्या पावन भूमीवर सद्वर्तनाची , परोपकाराची, मित्रत्वाची, दया क्षमा शांती इत्यादी मूल्यांची शिकवण देण्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा म्हणजेच महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांचा फार मोठा हातभार आहे.
      संत परंपरा सांगायची झाली तर यामध्ये निवृत्तीनाथ ,माऊली ज्ञानदेव ,सोपान , मुक्ताबाई , संत एकनाथ , संत नामदेव,  जगद्गुरु तुकाराम महाराज , संत सावता महाराज, संत चोखामेळा , संत शेख महंमद , जनाबाई, गोरा कुंभार ,संत रोहिदास अशी अनेक नावे घेता येतील.
 
    यातीलच काही संतांनी लिहिलेल्या अभंगाचा अर्थ आणि त्यातून मिळणारी शिकवण  समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया.

  # जगद्गुरु सतश्रेष्ठ तुकाराम महाराज #


    अर्थेविन पाठांतर कासया करावे|
 व्यर्थची मरावे घोकूनिया||
घोकूनिया   काय वेगी अर्थ पाहे|
 अर्थ रूप राहे होऊनिया ||
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी
 नाही तरी गोष्टी बोलू नका
                    .............. संत तुकाराम

      या अभंगातून संत तुकाराम महाराज असे सांगतात की, अर्थ समजल्याविना पाठांतर करून काय फायदा ? त्यामुळे फक्त त्रास होईल. कष्ट पडतील परंतु त्याचा उपयोग मात्र काही होणार नाही.
      घोकंपट्टी करून फक्त पाठांतर होऊ शकते परंतु नुसत्या पाठांतरावर ज्ञान मिळेलच असे अजिबात नाही. कोणतीही व्यक्ती अथवा गोष्ट समजून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थ समजल्यानंतर त्यानुसार आपले ज्ञान वाढवणे आणि आचरणात बदल करणे हे देखील अपेक्षित आहे.
     अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज स्वतःचे उदाहरण घेऊन असे समजवतात की, जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण ज्ञान झालेले नाही तोपर्यंत तुम्ही मला काहीही सांगू नका तुम्हाला जर त्यातील पूर्ण अनुभव सह आले असतील आणि त्यातील सगळे बारकावे जर तुम्हाला ठाऊक असतील तरच माझ्याशी बोला. नाहीतर तुम्हाला मला उपदेश करण्याचा काहीही अधिकार नाही.
      या मधून तुकाराम महाराज दैनंदिन जीवन जगताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन करतात. ज्या व्यक्तीला पूर्ण ज्ञान नाही अशा व्यक्तीचे अजिबात ऐकू नका.
      ज्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही तो इतरांना मार्गदर्शन कशा पद्धतीने करू शकतो. असे मार्गदर्शन म्हणजे केवळ फसवाफसवीच होय. नपुंसक व्यक्तीला मदनाचे डोहाळे कसे बरे लागणार ? हे अगदी त्याप्रमाणेच आहे.




           प्रिय वाचक मित्रांनो ,तुम्हाला अभंगाचा थोडक्यात सांगितलेला हा भावार्थ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच अजूनही तुम्हाला असे भावार्थ वाचायला आवडतील का?  हेदेखील सांगा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने