|Essay on Imagine that you are shopkeeper how will you manage


|Essay on Imagine that you are shopkeeper how will you manage
 |मी दुकानदार झालो तर मराठी निबंध


मी दुकानदार झालो तर...
If I become a shopkeeper 

       आमच्या गावामध्ये खूप सारे दुकान आहेत. त्यातील काही दुकान खूप प्रसिद्ध आहेत, तर काही दुकान लोकांना माहित देखील नाहीत. काही दुकाने खूपच जुनी आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.
       त्यातील काही दुकाने माझ्या आजोबांच्या बालपणापासून देखील अस्तित्वात आहेत , असे माझे आजोबा सांगतात. प्रत्येक दुकानातील दुकानदाराची वागण्याची आणि बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते. आजोबांबरोबर किंवा आई बरोबर मी बऱ्याच वेळा दुकानांमध्ये गेलेलो आहे. काही दुकानदारांनी मला सहजच चॉकलेट देखील दिली होती. एकदोनदा मला चॉकलेट मिळाली पण त्यानंतर परत कधी कोणी मला चॉकलेट दिले नाही.
         दुकानदारांची बोलण्याची पद्धत फारच आपुलकीची आहे. असे मला बऱ्याच वेळा दिसले. अशा दुकानदारांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची फार गर्दी आढळून आली. जे दुकानदार ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नव्हते त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी देखील कमी होती.

|Essay on Imagine that you are shopkeeper how will you manage

          मी दुकानदार झालो तर ग्राहकांशी फारच प्रेमाने आणि आपुलकीने बोलेल. ग्राहक माझ्या दुकानातून नेहमी संतुष्ट होऊन आणि  आनंदाने बाहेर जाईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. दुकानात आलेला प्रत्येक ग्राहक म्हणजे माझ्यासाठी देव याच भावनेने मी वागेन.
         माझ्या दुकानात आलेला प्रत्येक ग्राहक कधीही निराश होऊन जाणार नाही याची मी मी काळजी घेईन. माझा व्यवसाय मी अगदी इमानदारीने करीन. कुणालाही मी कधीही फसवणार नाही. वस्तूचे वजन करताना काटेकोरपणे वजन करेन. कुणाची वस्तू माझ्या दुकानात चुकून राहून गेली तर मी ते सांभाळून ठेवेल आणि त्या व्यक्तीला परत करेन.
        आमच्या गावा मध्ये चार ते पाच मोठे मंदिर आहेत त्या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम होतात व भंडारा आणि सप्ताह देखील बसलेले असतात त्या प्रत्येक ठिकाणी मी दानधर्म करण्यास अजिबात मागे पडणार नाही.
           माझ्या दुकानातील प्रत्येक वस्तू गुणवत्ता पूर्णच असेल. अधिक आर्थिक नफ्यासाठी मी खराब आणि गुणवत्ता नसलेल्या वस्तू अजिबात विकणार नाही. ग्राहकांशी संबंध अधिकाधिक प्रेमाचे कसे राहतील यावर मी कटाक्षाने लक्ष देईन.
        मी दुकानदार झालो तर मात्र उधारीचे व्यवहार अजिबात करणार नाही. व्यक्ती बघून उधार देण्यास हरकत नाही. माझ्या दुकानात कामाला असणाऱ्या कामगारांच्या मदतीला  मी सतत तयार असेन. कुणाकडून एखादी वस्तू सांडली किंवा काही हिशोब चुकला तर लगेच त्यांना रागवणार नाही प्रेमाने समजावून सांगेन. काहीही झाले तरी माझे दुकान मी नावारूपाला  आणल्याशिवाय राहणार नाही.


       प्रिय मित्रांनो तुम्हाला हा मी दुकानदार झालो तर(|Essay on Imagine that you are shopkeeper how will you manage) निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही दुकानदार झाले तर तुम्ही काय करणार हे देखील आम्हाला नक्की कळवा.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने