संत तुकाराम महाराजांचे अभंग व अर्थ
|Abhang of sant Tukaram|

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |Sundar te Dhyan ubhe vitevari | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग अर्थ
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |Sundar te Dhyan ubhe vitevari |  अभंग अर्थ 



सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
 कर कटावरी ठेवोनिया      ||१||
तुळशीहार गळा कासे पितांबर |
आवडे निरंतर हेचि ध्यान.  ||२||
 मकर कुंडले तळपती श्रवणी |
कंठी कौस्तुभमणी विराजित||३||
 तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख |
पाहिन श्रीमुख आवडीने.    ||४||

  -- संत तुकाराम महाराज 

      परमपूज्य वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी भगवान विठ्ठलाच्या रूपाविषयी या अभंगांमध्ये वर्णन केलेले आहे. संत तुकाराम महाराज हे महान विठ्ठल भक्त म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. भगवंताच्या सौंदर्याचे वर्णन करताना त्यांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत . त्यातील सर्वांच्या परिचयाचा व आवडीचा अतिशय सुप्रसिद्ध असलेला हा एक अभंग आहे.

        पंढरपूरच्या विठ्ठलाने कशा पद्धतीचा पोषाख परिधान केलेला आहे , भक्तांच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी धावून येणारा भगवंत किती सुंदर आहे ? हे शब्दात सांगणे अशक्य आहे.

       सध्याच्या काळामध्ये अनेक कवींनी सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आपल्याला  वाचायला मिळतात. सध्याच्या चित्रपटांमध्ये देखील विविध वाद्यवृंद , त्यांच्या तालावर आणि अनेक सुंदर आवाजाच्या गायक गायिका द्वारे गायलेली गाणी आपण नेहमीच ऐकतो. ही गाणी कितीही सुंदर आणि संगीतमय असली तरीदेखील काही काळापुरताच ओठावर रेंगाळतात नंतर ते गाणे आठवत देखील नाहीत.

     शेकडो वर्षांपूर्वी  लिहिलेले हे अभंग मात्र आजही तितकेच आकर्षक आणि तरुण वाटतात. बालवयातील मुले- मुली , तरुण तसेच वयोवृद्ध माणसे देखील त्याच तन्मयतेने हा अभंग गाताना दिसतात. ही आहे संत साहित्याची ताकद.
       भगवंताच्या रूपाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात की परम परमात्मा भगवान विठ्ठल अतिशय सुंदर आहेत त्यांच्या सुंदर त्याला कशाचीही उपमा देता येणे शक्य नाही. ते वीटेवर उभे आहेत त्यांनी आपले दोन्ही कर कमरेवर ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या सुंदर रूपाचा रुबाब अजूनच शोभून दिसतो आहे.
     पांडुरंगाच्या   गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घातलेली आहे. कमरेभोवती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. सुवर्ण रंगाचे पितांबर आणि गळ्यामध्ये तुळशीच्या माळ  व पुष्पहार अगदी शोभून दिसत आहेत.
      पांडुरंगाच्या कानांमध्ये मत्स्याच्या म्हणजे माशाच्या आकाराचे कुंडल डुलत आहेत. व कौस्तुभमन्याने  सुशोभित असा कंठा देवाचे सौंदर्य अधिकच खुलवत आहे. भगवंताच्या कंठाजवळ हा कौस्तुभमणी विराजमान झालेला आहे.
        या सर्व अलंकारांनी पांडुरंगाच्या साधेपणाचे देखील दर्शन होते. साधेपणा तील श्रीमंती आणि सौंदर्य विठ्ठलाच्या दर्शनाने अनुभवायला भेटते. त्यामुळे शेवटी शेवटी तुकाराम महाराज असे म्हणतात, की भगवंताचे हे श्रीमुख माझ्या डोळ्यांनी मला बघायला मिळाले हे माझ्यासाठी परमसुख आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा कोणतेही अधिक सुख देणारी वस्तू या जगात माझ्यासाठी नाही.
        या अभंगातून तुकाराम महाराजांची भगवान विठ्ठला प्रती असलेली निष्ठा भक्ती सहज गतीने व्यक्त होऊन जाते. कुठेही शब्दांची गुंतागुंत किंवा गुह्यपणा नाही. अशी साधी सरळ खरी भक्ती आपल्याला देवापर्यंत घेऊन जाऊ शकते.



..... प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा अभंग | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया| याचे थोडक्यात केलेले विवेचन कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.



       
          
        
       

1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. I can understand Marathi on reading but I can not write. The explanation is so beautiful. I wonder at simple deep exemplary devotion of Sant Tukaram. Tukaram movie must be shown to all young children, so that their devotion to God increases.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने