1001marathiessay.blogspot.com




किशोर वयातील मुलांमध्ये संयम कमी होतो आहे.
|Essay on lack of patience in teenagers 

     झपाट्याने बदलणाऱ्या जगामध्ये माणसाच्या वर्तनामध्ये व स्वभावामध्ये देखील फारच वेगाने बदल होत आहे. जीवनमूल्यांचा बऱ्याच अंशी ऱ्हास होताना विविध घटनांमधून निदर्शनात येत आहे. प्रसार माध्यमातून दररोज कानावर पडणाऱ्या किंवा वाचनात येणाऱ्या अप्रिय घटनांचे प्रमाण सतत वाढत आहे. या सर्वांमधून एकच लक्षात येत आहे की जरी सर्वच क्षेत्रांमध्ये आज मनुष्य नवनवीन क्षितिजे शोधत आहे, तरीदेखील मूल्यशिक्षणामध्ये व जीवन कौशल यांच्या शिक्षणामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत.
           हल्लीच्या काळामध्ये विज्ञानाने केलेली प्रचंड प्रगती माणसाचे डोळे दिपवून टाकते. प्रगती मुळे माणसाला भौतिक सुविधा व शारीरिक आराम मोठ्या प्रमाणात मिळू शकतो परंतु,या प्रगतीमुळे माणसाच्या मनावरील ताण देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे.
          किशोर वयातील मुलांच्या शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. हे बदल होत असताना त्यांना मानसिक आधाराची आणि मार्गदर्शनाची फारच मोठ्या प्रमाणात गरज असते. अशा मोक्याच्या वेळी जर त्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले नाही तर त्यांची मानसिक कोंडी होते. भावभावनांचे योग्यरितीने दमन न झाल्यास मुले चिडचिडी होतात.

1.
     किशोर वयातील मुले इतकी असंयमी का असतात? (why are teenager so impatient?)     
उत्तर: 
 किशोर अवस्थेतील मुलेेेेे उत्साहाने व ऊर्जेने भरलेली असतात. असे असले तरीहीी मात्र कोणत्याही परिस्थितीची साधक-बाधक किंवा सर्व बाजू हे विचार करण्याची समज त्यांच्यामध्ये निर्माण झालेली नसते.

2.
 किशोर वयातील मुलांना संयम कसा शिकवावा? (How to teach patience to teenagers)



      
           

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने