1001marathiessay.blogspot.com

True friend essay in Marathi 
खरा मित्र मराठी निबंध



        प्रिय वाचक मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रिय मित्र (उंदराचे मनोगत) हा निबंध.
       मित्रांनो निबंध लेखन एक उत्कृष्ट कला आहे.  तुम्हाला तर माहीतच आहे, कोणतीही कला शिकण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतातच. आम्ही तुमच्यासाठी जे विविध निबंध घेऊन आलेलो आहोत त्या निबंधांचा तुम्ही चांगला अभ्यास करा. वारंवार वाचन करा.
       हा निबंध वाचून तुम्ही देखील याच विषयावर आधारित निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा.काय अडचणी आल्या ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा आम्ही तुम्हाला आमच्या परीने मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण मलाही तुमचा "खरा मित्र " बनायचे आहे.
.

खरा मित्र निबंध मराठी 
(उंदराचे आत्मकथन मराठी निबंध)
True friend Marathi essay


        नमस्कार प्रिय मित्रांनो. मी आहे एक छोटासा पिटुकला उंदीर. तुम्ही लहानपणापासून माझ्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील.  त्यातीलच सिंह आणि उंदीर ही गोष्ट  तुम्ही ऐकली असेलच. त्याच गोष्टीतला छोटासा खोडकर उंदीर आहे मी.
               त्या गोष्टीमध्ये जंगलाचे महाराज सिंह राजे यांनी माझ्यावर दया करून मला सोडून दिले होते. त्यांचे ते उपकार मी कधीही विसरणार नाही.
         तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की सिंह महाराज शांतपणे झोपले होते . परंतु माझा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे. मी किती खोडकर आहे. महाराज शांतपणे झोपलेले असताना टुणटुण उड्या मारत आलो आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला लागलो .त्यांच्या शेपटी वरून त्यांच्या पाठीवरून तोंडावरून, कानावरून फिरू लागलो. माझ्या खेळण्याच्या धुंदीत मी महाराजांची झोप मोड करतो आहे हे विसरूनच गेलो . मी स्वतःच्याच मस्तीत उड्या मारत होतो त्यांचे दिवसभराचे कष्ट किंवा त्रास याचा विचारच मी केलेला नव्हता.
        मग काय व्हायचे तेच झाले . महाराजांना जाग आली महाराज खूप रागात होते महाराज मला म्हणाले तुझी हिंमत झालीच कशी माझ्या अंगावर उड्या मारण्याची? तुला एका घासात मटकावतो.
         महाराजांचे ते उग्र रूप पाहून तर माझे अंग थरथरायला लागले होते. आता माझी काही धडगत होणार नाही असे मला वाटू लागले. तेव्हा मी शेवटचा प्रयत्न म्हणून महाराजांना विनंती केली की ,"महाराज माझ्यावर दया करा. मी छोटा असलो तरी देखील कधीतरी तुम्हाला नक्की मदत करीन. मला जाऊ द्या .मला मारू नका मला सोडा.
          माझ्या अशा बोलण्याने महाराजांना हसू अनावर झाले त्यांची मनस्थिती एका क्षणात बदलणे ते म्हणू लागले एवढासा तू माझ्या पंजाच्या एका दणक्याने तुझा जीव जाईल आणि तू काय मला मदत करणार पण तुझ्या अशा बोलण्याने मला खूप हसू आलेले आहे त्यामुळे मी तुला आता जीवन दान देतो परत पुन्हा अशी चूक केलीस तर मात्र तुला मी सोडणार नाही ही गोष्ट पक्की लक्षात ठेव.
        आज जीव वाचला ते आनंदाने मी तिथून पळालो परंतु महाराजांचे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि विसरलो नाही त्यानंतर काही दिवसांनी गंमत घडली.
        जंगलात शिकारी आल्याची बातमी मला समजलेली होती. त्यावेळी माझ्या मनात पुसटशी कल्पना आली की आपल्या महाराजांना या शिकार यांपासून नक्कीच काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मी शिकाऱ्यांच्या पाळतीवर होतो. शिकार्‍यांनी अगदी सावधानतेने सापळा रचलेला होता तो सापळा महाराजांसाठी होता हे मला समजले.
          सापळा लावून शिकारी दुसरीकडे निघून गेले मग मीही त्या ठिकाणाहून निघून गेलो मला भूक लागलेली होती म्हणून कुठे जेवणाचा बंदोबस्त होतो का ते बघत होतो तेवढ्यातच महाराजांच्या मोठ्याने गर्जना मला ऐकू येऊ लागल्या. मी जीवाच्या आकांताने आवाजाच्या दिशेने पळू लागलो आपल्याला जीवनाचे दान देणाऱ्या महाराजांना अडचणीत सोडून कसे चालेल असा एकच विचार माझ्या डोक्यामध्ये होता.
          महाराज होते त्या ठिकाणी पोहोचल्यावर बघतो तर काय महाराज जाळ्यामध्ये अडकलेले होते व सुटण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे सर्व सामर्थ्य विफल जात होते.मी पुढे होऊन महाराजांना विनंती केली की महाराज कृपया गर्जना करू नका तुमच्या आवाजाने शिकारी लवकरच या ठिकाणी पोहोचतील तुम्ही शांत राहा आणि एका क्षणातच हे सर्व जाळे माझ्या अध्यक्ष दातांनी कुरतडून टाकतो आणि तुम्हाला या जाळ्यातून मुक्त करतो.
        सिंह महाराज शांत झाले आणि बघताबघता काही क्षणातच मी जाये कुरतडू लागलो महाराज शांतपणे माझ्याकडे बघत होते माझी इवल्याशा जिवाची धडपड ते अगदी मनापासून न्याहाळत होते त्यांच्या नजरेत मला आज वेगळाच भाव दिसत होता.
         शिकारी धावत येत असताना चे आम्हाला  दिसले. महाराजांनी मला पटकन त्यांच्या अंगावर चढण्यास सांगितले मी पटकन त्यांच्या पाठीवर बसलो व महाराज पूर्ण वेगाने दाट जंगलाच्या दिशेने निघाले. काही वेळ धावल्यानंतर आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचलो मी महाराजांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या समोर उभा राहिलो.
        महाराज मला आता आज्ञा द्यावी असे म्हणताच, महाराजांनी मला सांगितले आज पासून तू माझा मित्र आहेस कारण अडचणीच्या काळात जो कामाला येतो तोच खरा मित्र असतो आज पासून मी तुला माझ्या अंगावर कधीही मनमुराद खेळण्याची परवानगी देत आहे तुला हवे त्या वेळेला तू माझ्याजवळ येऊन माझ्या अंगावर खेळू शकतोस उड्या मारू शकतोस मी तुला काहीही करणार नाही आज पासून आपण चांगले मित्र आहोत.
         प्रिय मित्रांनो त्या दिवसापासून आम्ही खूपच चांगले मित्र आहोत राजांनी त्यानंतर मला एकदा सापाच्या तावडीतून नही वाचवले होते आमची मैत्री अशीच आजन्म टिकून राहो हीच मी या निसर्ग देवतेकडे प्रार्थना करतो.



.....................समाप्त ....................
          
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात
१.  |मी उंदीर बोलतो आहे मराठी निबंध|
२.  | उंदराचे मनोगत मराठी निबंध |
३.| उंदीर बोलू लागला तर|
४. |उंदराचे आत्मकथन|
५. |उंदराचे आत्मवृत्त |



  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.




        प्रिय मित्रांनो तुम्हाला हा खरा मित्र किंवा उंदराचे मनोगत मराठी निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा .तसेच तुम्हीही अशी कल्पना करून जर तुमचे घर तुमच्याशी बोलू लागले तर ते काय बोलेल असा विचार करा आणि आम्हाला तुमच्या कल्पना क्या तुमचे विचार कळवा ते ऐकण्यासाठी आम्हाला खूपच आनंद होईल.

     तुम्हालाही आपल्या या साइटवर तुमचे लेखन प्रकाशित करायचे असेल तर "कॉन्टॅक्ट अस " वर जाऊन आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमचे लेखन तुमच्या नावासह किंवा तुम्ही फोटो पाठवला तर फोटोसह या साइटवर आपण प्रकाशित करू. 
      तुमच्याकडून कडून मिळालेल्या माहितीचा आम्ही कोणत्याही स्वरूपात गैरवापर करत नाही किंवा ती इतर कोणालाही पुरवत नाही. या साइटवर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे लेखन पाठवलेले आहे.





       
 


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने