1001marathiessay.blogspot.com


ओळख स्वतःची | olakh swatachi 


     प्रिय मित्रांनो ,आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा लेख घेऊन आलेलो आहे. याला  लेख म्हणता येणार नाही. पण याला काय म्हणावे हे मला कळत नाही आत्ता. तुम्हीच यातील काही प्रश्न वाचल्यानंतर मला काय म्हणावे हे मला सांगा आणि अजून एक जबाबदारी मी तुमच्यावर सोपवणार आहे.

      या ठिकाणी मी काही प्रश्न दिलेले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सवडीनुसार देण्याचा नक्की प्रयत्न करा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार तो प्रश्न क्रमांक कमेंट मध्ये टाकून त्याच्यापुढे तुमचे उत्तर तुम्ही टाईप करून पाठवा.

   जसे की तुम्ही जर १ नंबरच्या प्रश्नाचे उत्तर दिले तर उत्तरांमध्ये.

१,.... तुमच उत्तर लिहा .


     ठीक आहे तुम्हाला सगळं समजला असेल असं गृहीत धरतो आणि खाली काही प्रश्न देत आहे.

  1. तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ माहित आहे का?
  2.  तुमच्या स्वतःच्या घरातील माणसे तुमचा आदर करतात का? तो आदर भीतीमुळे,  तुमच्या वयामुळे करतात की तुमचे वागणे खरोखरच आदरणीय आहे?
  3. तुम्ही जर एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीला असाल तर ते तुमच्या आवडीचे काम आहे की नाही?
  4. तुम्ही दुसऱ्याबद्दल आपुलकी आणि सहानुभूती दाखवता का?
  5. जी तुमच्यापेक्षा लहान आणि दुर्बल आहेत त्यांची मदत आणि रक्षण करता का?
  6. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही  मदत करता का?
  7. तुमच्या जीवनात तुम्ही अशी कुणाला मदत केलेला प्रसंग सांगा कमेंटमध्ये.
  8. तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला होता?
  9. तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख कधी झाले होते?
  10. तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग सांगा.
  11. तुमच्या जीवनातील असा प्रसंग सांगा की एवढे तुम्ही सर्वात जास्त हसले होते.

    प्रिय मित्रांनो मला जे प्रश्न आवश्यक वाटले ते याठिकाणी मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यात अजून काही प्रश्न टाकावेसे वाटतात का तेही मला कमेंट मध्ये सांगा ते प्रश्न आपण यामध्ये वाढवूया.
       जे लोक हा लेख पूर्ण वाचतील त्यांना त्याचे महत्त्व पूर्णपणे समजेल . जे फक्त नजर फिरवून सोडून देतील त्यांना स्वतःचे हरवलेले खरे मीपण शोधण्यासाठी शुभेच्छा देतो.
       त्यामुळे यापैकी एका तरी प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. स्वतःच्या  आठवणी मध्ये डोकावण्याची एक सुवर्णसंधी या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा नक्की फायदा घ्या.
     अजून महत्त्वाचे सांगायचे राहिले तुम्ही उत्तर देताना स्वतःचे खरे नाव बदलून उत्तर देऊ शकता. कारण येथे आम्हाला तुमची माहिती जाणून घेण्यापेक्षा तुम्हाला तुमची स्वतःची आठवण करून देण्यावर आमचा भर आहे.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने