1001marathiessay.blogspot.com

        " सत्यमेव जयते "हे आपल्या स्वतंत्र भारत देशाचे ब्रीदवाक्य आहे. या वाक्याद्वारे भारतीय विचार संपूर्ण जगाला ठणकावून सांगतो की ,कितीही अडचणी आल्या संकटे आलेत तरीदेखील शेवटी सत्याचाच विजय होतो.
    असे म्हणतात कि सत्य हे विचलित होऊ शकते परंतु पराजित होऊ शकत नाही.
      भारतात होऊन गेलेल्या अनेक संत महंत यांनी देखील हे अगदी ठासून सांगितले आहे की ,सत्य म्हणजे ईश्वर आणि त्याचा पराभव होणे अशक्य आहे. जय मिळण्यासाठी उशीर लागू शकतो , परंतु सत्याचा पराजय कधीही होऊ शकत नाही.
       भारतीय संस्कृती आपणाला हे शिकवते की कधीही खोटे बोलू नये खोटे बोलल्यामुळे काही काळापुरता तुमची समस्या दूर होईल परंतु तीच समस्या काही वेळेनंतर मोठी होऊन तुमच्या समोर उभी राहिल.
        जो व्यक्ती नेहमी सत्य बोलतो त्या व्यक्तीला काही वेळा प्रचंड त्रास सहन करावा लागतो .अशी व्यक्ति पराजित होते आहे असे देखील बऱ्याचदा वाटते, परंतु अंतिम विजय मात्र सत्यनिष्ठ व्यक्तीचाच होतो. भारतीय पुराणातील प्रचंड ग्रंथ म्हणजे महाभारत होय .यामध्ये देखील पांडवांचा थोरला भाऊ युधिष्ठीर युद्धाच्या शेवटी "नरो वा कुंजरो वा " असे खोटा बोलला. त्यामुळे स्वर्गात जाताना त्याला शिक्षा सहन करावी लागली.
       माणसाला सत्य बोलण्याची सवय असली की कुणाला काय वचन दिले आहे किंवा कोणाशी काय बोललो आहे हे लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नसते. या बोलत असते बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. एक लबाडी लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते तर एकदा सत्य बोलून दिले तर मनुष्य सरळ मुक्तपणे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी मोकळा होतो.
      ज्यावेळी माणसांमध्ये सत्य बोलण्याचे धाडस नसते त्या वेळी मनुष्य खोटे बोलण्याचे धाडस करतो. यावेळी मात्र मनुष्य एक गोष्ट सर्रास विसरतो सत्य बोलल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला त्रास सहन करावा लागेल किंवा अडचणींना सामोरे जावे लागेल परंतु तो त्रास किंवा अडचणी यांचा सामना करण्यासाठी धैर्यही सत्या मधूनच मिळत.
      आपली भारतीय संस्कृती , " सत्यम वद धर्मम चर " याचा अर्थ सत्य बोलावे आणि धर्माचे आचरण करावे अशी शिकवण देते.अनेक थोर व्यक्तींना सत्य बोलल्यामुळे त्रास सहन करावा लागला तरी देखील त्यांनी सत्याची कास सोडले नाही आणि आज ती व्यक्ती पूजनीय आहेत. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर गांधीजी यांनी संपूर्ण आयुष्यात फक्त सत्याचा जेजेकार केला सत्याचाच आग्रह धरला त्यांच्या हातून झालेली प्रत्येक चूक अगदी मोठ्या मनाने व धाडसाने त्यांनी कबूल केली. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाने प्रसिद्ध आहे. कितीही आणि अडचणी आल्या तरीदेखील सत्याचा ध्यास न सोडणारे गांधीजी आज जगात वंदनीय आहेत.
      थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यालाच देव मानले सत्य सोडून बाकी सर्व पाप आहे समाजातील याच पापाचा आणि अन्यायाचा बंदोबस्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
      आत्ताचे राजकारण असो किंवा पूर्वीचे विजय सत्याचाच होणार याची मला पुर्ण खात्री आहे.

...........समाप्त........

१)  | सत्यमेव जयते ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे?
सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य राज येथील अशोक स्तंभावरील घेतले आहे. हे वाक्य मुण्डकोपनिषद यामधील आहे. 
२)  | सत्यमेव जयते याचा अर्थ काय?
कितीही अडचणी आल्या तरी शेवटी सत्याचाच विजय होतो असा याचा सरळ सरळ अर्थ आहे.
३) | सत्यमेव जयते हे कोणत्या देशाचे ब्रीदवाक्य आहे?
सत्यमेव जयते हे भारत देशाचे ब्रीदवाक्य आहे.



     खालील सत्यमेव जयते कल्पनाविस्तार आत्मक निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. हे निबंध वाचण्यासाठी तुमच्या मैत्र मैत्रिणींना नक्की पाठवा.
   वाचन म्हणजे मनाचे अन्न होय.


  1. माझी आई - माझा छोटासा निबंध
  2. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  3. बैल 
  4. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  5. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  6. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  7. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  8. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  9. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  10. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने