1001marathiessay.blogspot.com


        ज्ञानाचा सागर आणि योग्यांची माऊली असे संबोधले जाणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सुंदर अभंगातील या पहिल्या चरणाच्या ओळी आहे त .
       ज्ञानेश्वर माऊली या ओळींमधून सांगतात की, दुःख दारिद्र्याने पिडलेल्या या सर्व जनसमुदायाला मी सुखी करेल. हे अवघे विश्व सुखाने भरून टाकेन तिन्ही लोकांमध्ये आनंद भरून देईन.
      आनंदी जीवनाचे सूत्र सांगताना ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्‍वरांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. आनंदी व्हायचे असेल तर सर्वप्रथम मनुष्य मनातून आनंदी असला पाहिजे.
     मनातून आनंदी असणे हे बघितले तर फार अवघड नाही आणि फार सोपेही नाही. अवघड यासाठी म्हणतो ,की मनाचं समाधान करण ही काही सोपी गोष्ट नाही .सर्वप्रथम मन माणसाला समजणे अत्यंत गरजेचे आहे. 
       मनासारखी चंचल बाब या संपूर्ण विश्वामध्ये शोधूनही सापडणार नाही.  एका ठिकाणी असणारे मन काही क्षणातच दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. मनाला ताब्यात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो.
      मनाला त्याचे कार्य पूर्ण करून घेण्यासाठी मानवाच्या इंद्रियांची आवश्यकता आहे. मन स्वतः कोणतेही कार्य एकट्याने पूर्ण करू शकत नाही. याच गोष्टीचा फायदा मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण करून घेऊ शकतो.म्हणजे बघा मन जिकडे जाईल तिकडे त्याला जाऊ द्या परंतु त्याच्या मागे आपली इंद्रिय जाणार नाहीत , या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे.
      उदाहरणच सांगायचे झाले तर एखाद्याच्या मनात चोरी करण्याचा विचार आला,परंतु हात-पाय यांनी जर मनाला साथ दिली नाही तर नुसत्या विचारांमुळे मन चोरी करू शकत नाही.
      
        ज्ञानेश्वर महाराज असे सांगतात की या संपूर्ण जगातील माणसे आनंदाचा अनुभव घेतील असे सुंदर विश्व मी निर्माण करेल. पंढरपूरला जाऊन माझ्या विठूरायाचं दर्शन घेऊन अगणित आनंदाने माझं मन भरून जाईल तोच आनंद या संपूर्ण विश्वात वाटून हे सगळे विश्व आनंदमय करून टाकण्याचा ज्ञानेश्वरांचा विश्वास आहे.


      अवघाची संसार सुखाचा करीन |
      आनंदे भरीन तिन्ही लोक||
 हा कल्पना विस्तार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे आम्हाला अजून लिखाण करण्यासाठी सतत प्रेरणा मिळत जाते.
       


  1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  10. बालपण /रम्य ते बालपण
  11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  12. माझी आई - माझा छोटासा निबंध



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने