1001marathiessay.blogspot.com

प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी. - माधव पटवर्धन
प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी. - माधव पटवर्धन



  प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी !!
                                              कवी- माधव पटवर्धन
उर्फ
 माधव जूलियन


        या काव्यपंक्ती मध्ये कवी माधव पटवर्धन असे सांगतात की , या जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे म्हणतात ,मला प्रेम मिळाले नाही, जगातील प्रेम संपले आहे ,जगात प्रेमाचा बाजार मांडलेला आहे वगैरे वगैरे. अशी बोलणारी माणसे एक गोष्ट मात्र विसरतात की हे जग देवाणघेवाणीच्या विशिष्ट व्यवहारावर चालते.
            असे म्हटले जाते की तू जे तुम्हाला हवे आहे ते आधी तुम्ही इतरांना देत जा मग आपोआपच तुम्हालाही ते इतरांकडून मिळेल. निसर्गाचा ही तोच सिद्धांत आहे. आपण जमिनीत बियाणे म्हणून एक दाणा टाकला की जमीन आपल्याला शेकडो पाण्याने भरलेले कणीस परत करते. मग हे अगदी तसेच आहे.
             तुम्हाला इतरांकडून प्रेम हवे असेल तर तुम्ही आधी इतरांना प्रेम दिले पाहिजे. तुम्ही दिलेले प्रेम त्यांच्या मनामध्ये आपुलकी माया निर्माण करेल व तेच तुम्हाला प्रेम म्हणून परत मिळेल.
           आपण आपल्या स्वार्थापोटी इतरांना प्रेम द्यायचं नाही. मग इतरांनी आपल्याला प्रेम दिलं नाही अशी खोटी वल्गना का करायची? अरे इतरांना प्रेम देऊन तर बघ मग तुलाही भरभरून प्रेम मिळाल्याशिवाय राहणारच नाही असे कवी माधव पटवर्धन सांगतात.
            आपण प्रथम स्वतःचा स्वार्थ आणि देहभान विसरून इतर कुणावर प्रेम करून तर बघा, अगदी भक्तिभावाने कुणाला शरण तर जाऊन बघा .मग या जगात किती प्रेम भरलेले आहे हे तुम्हाला दिसून येईल.
            स्वतःचा स्वार्थाचा त्याग करण्यासाठी फार मोठे धैर्य लागते. हे देखील त्यागातूनच निर्माण होते. आणि अशा त्यागातूनच प्रेम निर्माण होते. त्यामुळे तर असे म्हटले जाते की,  प्रेम लाभे प्रेमळाला , त्याग ही त्याची कसोटी.



हे वाचायला अजिबात विसरू नका 

  1. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  2. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  3. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  4. सुंदर मराठी सुविचार
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  7. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 

3 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. ही कविता पूर्ण पोस्ट करा. विनंती आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कविवर्य माधव ज्युलियन यांच्या कवितेतील ही काव्यपंक्ती आहे. तुमच्या आग्रहाखातर लवकरच ही कविता पूर्ण या निबंधाच्या खाली देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत ब्लॉगला सतत भेट द्या व इतर लेख वाचण्याचा आनंद घ्या व इतरांनाही घेऊ द्या.
      खूप खूप धन्यवाद. ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका.

      हटवा
    2. ही कविता कवी माधव ज्युलियन म्हणजेच माधव त्र्यंबक पटवर्धन यांची असून अत्यंत सार गर्भित आहे. लवकरच हे पूर्ण कविता आपल्यासाठी प्रदर्शित करू, धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने