1001marathiessay.blogspot.com

          मला शेपूट आली तर ही कल्पना किती भन्नाट आहे. या कल्पनेवर आधारित निबंध बघूया .मला शेपूट आली तर.




मला शेपूट आली तर ..
      मला शेपूट आली तर माझा खर्च अचानक वाढून जाईल. तुम्ही म्हणाल शेपूट आणि खर्च याचा काय संबंध आहो पण शेपूट आली तर मला माझ्या सर्व पॅन्ट नवीन घ्याव्या लागतील ना!त्यात अजून एक गम्मत व्हायला हवी. माझी शेपटी मला हवी तेवढी लहान-मोठी करता यायला पाहिजे. मग तर मज्जाच मज्जा.
      कुठेही फिरायला गेलो आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी काही खुर्ची वगैरे ची व्यवस्था नसली, तर रावणाच्या दरबारात जसे हनुमंताने शेपटीची खुर्ची तयार केली. तसेच मीही मोठी खुर्ची तयार करून आरामात बसेन. म्हणजे बघा ना आपल्या बसण्याची व्यवस्था आपल्याबरोबरच घेऊन फिरण्याची संधी आपल्याला मिळेल.
       उन्हाळ्यामध्ये तर डोक्यावर छत्री धरण्यासाठी शेपटीचा फारच चांगला उपयोग होईल. उन्हाची काही चिंताच राहणार नाही. झाडांवर चढण्यासाठी माकडा सारखाच मीही शेपटीचा चांगला उपयोग करीन. झाडावर कोण वेगात चढतो या स्पर्धेत तर माझा पहिला नंबर ठरलेलाच असणार.
      मला शेपटी असती तर मी खूपच प्रसिद्ध होऊन जाईल. शक्ती असणारा मी एकटाच असल्यामुळे सगळे लोक मला ओळखू लागतील. मला बघण्यासाठी  खूप दूरवरून लोक येतील. मला बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी एक तिकीट ठेवीन, म्हणजे मला खूप पैसे कमवण्याची संधी मिळेल.
      ज्याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी भारतीय लोक परदेशात जातात आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी परदेशी लोक भारतात येतात. अगदी तसेच शेपटी वाला माणूस बघण्यासाठी देशातून आणि परदेशातून लोक आमच्या गावात येतील.आमचे गाव सुद्धा संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध होऊन जाईल . याचे कारण असेल फक्त माझी शेपटी.
        आंघोळ करताना मला दररोज शेपटी धुवावी लागणार. मी फार प्रेमाने माझ्या शेपटीचे काळजी घेणार. लोक काहीही म्हटले तरी मी माझ्या शेपटीवर जीवापाड प्रेम करेन.

या निबंधांचे खालील प्रमाणे नावे असू शकतात.
  1. |मी आणि माझी  शेपूट
  2. |मला शेपूट असेल तर
  3. |मला शेपूट आले तर कल्पनात्मक निबंध.
  4. |मला शेपूट उगवली तर मराठी निबंध.



  1. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  2. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  3. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  4. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  5. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  6. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  7. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  8. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  9. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  10. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  11. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  12. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  13. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  14. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने