1001marathiessay.blogspot.com


             पाऊस पडला नाही तर ही कल्पनाच मुळात विचित्र आहे पण समजा असे घडलेच तर काय होईल हे  आपल्याला पाऊस पडला नाही तर या निबंधामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.. 

         हिरवे डोंगर, हिरवी झाडे, झाडांवर राहणारे सुंदर सुंदर पक्षी, प्राणी त्यांचा किलबिलाट  आपल्याला खूपच आवडतो आणि हे सर्व कुणामुळे तर केवळ पावसामुळे , आणि समजा हा पाऊसच पडला नाही तर ..... हे आपण या एका छानशा निबंधामध्ये बघूया.

पाऊस पडला नाही तर |

          पावसाचे महत्व व संपूर्ण सजीवांच्या दृष्टीने अनन्य साधारण आहे. पावसाळा सुरू झालेला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून खूपच पाऊस पडलेला होता. सगळीकडे चिखल झालेला होता. त्यामुळे आम्हाला कुठेही खेळायला बाहेर पडता येत नव्हते . मला पावसाचा खूप राग आलेला होता . वाटले हा पाऊसच पडायला नको. म्हणजे सगळीकडे किती स्वच्छता राहील. चिखल होणार नाही व मला खूप खेळायला मिळेल.
         माझ्या मनात असा विचार चालू असतानाच, वाटले अरे पण पाऊस पडला नाही तर आपल्याला प्यायला पाणीच मिळणार नाही . सगळे सजीव पाण्याविना कसे राहू शकणार ? आपल्याला आपल्या दररोजच्या कित्येक कामांसाठी पाण्याची गरज असते ,आणि शाळेत कालच सरांनी शिकवलं होतं ना ी की मानवाने नदीच्या काठावर वस्ती करून राहायला सुरुवात केली. कारण पाण्याविना जगणे अशक्‍य आहे.
पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh

          पाऊस पडला नाही तर पावसामध्ये भिजण्याची मजा घेता येणार नाही . अंगणामध्ये आणि गल्ल्यांमध्ये पावसाचे छोटी छोटी डबकी साचणार नाहीत .नदी-नाले तुडुंब भरून वाहू शकणार नाही.अंगणात साचलेल्या डबक्यात  उड्या मारण्याचा आनंद अजिबात घेता येणार नाही . पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये कागदाच्या होड्या सोडताना जी मजा येते ती मजा देखील घेता  येणार नाही.
       पाऊस पडला नाही तर वेगवेगळ्या रंगाचे रेनकोट घालून शाळेमध्ये जाताना येणारी मजा मिळणार नाही. पावसाच्या पाण्याने पुस्तके ओली होऊ नयेत खूप काळजी घेत आम्ही शाळेतून घरी आणि घरातून शाळेत जातो. त्यामुळे आपल्या वस्तूंची काळजी घेण्याची सवयच पाऊस आम्हाला लावतो.
        पाऊस म्हणजे संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे . पाऊस येतो त्या वेळी होणाऱ्या चिखलामुळे किंवा पूर यासारख्या परिस्थितीमुळे पावसाचे महत्व कमी होत नाही. पाऊस आहे तर सर्व जनजीवन आहे . पाऊस पडला नाही तर संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल.
      ज्या झाडांमुळे आपल्याला सावली मिळते . फळ खायला मिळतात . औषधे मिळते, लाकूड मिळते ती संपूर्ण झाडेच पाऊस पडला नाही तर मरून जातील . मे महिन्याच्या शुष्क उन्हाळ्यामध्ये कोकिळेचा मंजुळ स्वर ऐकायला येणार नाही . करवंदाच्या जाळ्या करपून जातील . शहाळयांमधील पाणीदेखील आटून जाईल. गोड गोड आंब्याचा आस्वाद घेता येणार नाही. जांभळे, बोरी , चिंचा, फणस , पेरू, केळी हे सारे फळे फक्त चित्रांमध्ये बघावी लागतील. आपल्या सर्वांच्या आवडीचा इंद्रधनुष्य आपल्याला बघता येणार नाही.
      धनधान्याची हजारो मापे भरून आपल्या पदरात प्रेमाचं आंदन टाकणारी धरणीमाता  वांझ होऊन जाईल.
पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणामध्ये नुकसान होते हे जरी खरे असले , तरी देखील पावसामुळेच सगळे फायदे देखील होतात . कारण बघा ज्यावर्षी पाऊस समाधानकारक होतो, ते संपूर्ण वर्ष सर्वांसाठी आनंददायक जाते. म्हणून  पावसाच्या नुकसानापेक्षा पावसामुळे होणारे फायदे अधिक आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी देखील पाऊस हा पडलाच पाहिजे .पाऊस आहे तर आपण आहोत ,जर पाऊस पडला नाही तर आपणही नाही. हे विसरून चालणार नाही.
     सध्या पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी गल्ल्या मध्ये पाणी भरून वाहू लागल्याचे चित्र दिसू लागतात . याला कारणही आपणच आहोत . सिमेंटच्या जंगलांमध्ये पाण्याला वाहण्यासाठी जागा तर आहे पण पाणी मुरण्यासाठी अनेक अडचणी आहेत. सर्व रस्ते गल्ल्या सिमेंटच्या झाल्यामुळे पाणी जमिनीत मुरू शकत नाही , मग तेच पाणी साठते आणि गल्ल्यांमधून मोठे रूप घेऊन वाहू लागते. यात माणसाचीच चूक आहे. पावसाची काहीही चूक नाही. निसर्गाचा समतोल बिघडला आहे याला माणूसच जबाबदार आहे.
    त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी .आणि काही असले तरी पाऊस पडलाच पाहिजे हे विसरून चालणार नाही.




निबंध कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही नक्की तो निबंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

वरचा काल्पनिक निबंध पाऊस पडला नाही तर ,तुम्हाला class 1 ,2, 3 ,4 ,5 ,6,7,8,9,10 साठी उपयोगी पडू शकतो.

या निबंधाची खालील प्रमाणे नावे हि असू शकतात .
  1. | पावसाचे महत्व
  2. |  पावसाचे उपकार
  3. | आषाढघन बरसले नाही तर
  4. | वरुणराजाचे महत्त्व , वरुणराजाचे चे उपकार
  5. | पाऊस आणि मानवी जीवन यांचा संबंध
  6. | मेघ बरसले नाही तर
  7. | पावसाळा का नकोसा वाटतो
  8. | पाऊस नसता तर
  9. | पावसाळा नसता तर
  10. | जर पाऊस आला नाही तर
पाऊस पडला नाही तर काय होईल या विषयी तुम्हाला काय वाटते, तुमच्या कल्पना आम्हाला सांगा..

धन्यवाद.

  1. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
  2. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay 
  3. आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
  4. मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
  5. निसर्गाचा प्रकोप - भूकंप
  6. यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
  7. माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
  8. प्रलयंकारी पाऊस
  9. मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची  कैफियत 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने