1001marathiessay.blogspot.com                           
         
                                            माझे गाव         
    majhe gav nibandh in marathi/ majhe gav in marathi essay

                           आपण लहानाचे मोठे होतो तिथल्या मातीत आपण खेळतो हसतो, रडतो, पडतो आणि  वाढतो, ज्या गावच्या मातीमध्ये वाढलेले अन्नधान्य खाऊन आपल्या शरीराचे पोषण करतो. त्या गावाविषयी अभिमान बाळगणे हे आपले कर्तव्यच आहे. व गावासाठी पोषक व विकासात्मक गोष्टी करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
      मला माझ्या गावाविषयी पूर्वी नव्हता परंतु आता मात्र फार अभिमान वाटतो. कारण राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी माझ्या गावाने झेप घेतलेली आहे . प्रगतीच्या दिशेने ते अग्रेसर आहे. चला तर मग आजच्या माझा गाव या निबंधात आपण बघूया माझ्या गावा विषयी माहिती.

 या निबंधाच्या लेखनासाठी खालील मुद्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो .
महत्वाचे मुद्दे:
  •  गावाचे स्थळ 
  • भौगोलिक परिस्थिती
  •  गावाचे मूळ स्वरूप 
  • गावाची मनोवृत्ती 
  • गावातील भांडण तंटे
  •  गावाला मिळालेले योग्य नेतृत्व 
  • नेतृत्वाचा परिणाम 
  • गावाच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न
  •  गावाच्या विकासाचा मार्ग 
  • विकासाचे परिणाम 
  • गावात झालेले बदल

                                  माझा गाव   maza gav
                                  माझे गाव  maze gav
                              माझा  आदर्श गाव maza adarsh gav
             मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गावाची माहिती सांगणार आहे. माझ्या गावाची हकीकत तुम्हाला सांगणे महत्त्वाचे आहे ,कारण नुकताच आमच्या गावाला " निर्मलग्राम " हा गौरव पुरस्कार मिळाला. मला तर आजही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. परंतु हे सत्य आहे. निर्मल ग्राम पुरस्काराच्या अंतर्गत गावाला दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. निर्मल ग्राम योजनेमध्ये हजारो गावाने भाग घेतलेला होता, परंतु या हजारो गावांमध्ये निर्मल ग्राम मिळवण्याचा मान आमच्या गावाने पटकावला. या विचाराने माझी छाती अभिमानाने फुलून जाते .
                 सातपुड्याच्या कुशीतील पिंपळपाडा हे एक छोटेसे खेडे. दोन हजार वस्तीचे छोटसं गाव.
                  भौगोलिक दृष्ट्या निसर्ग तसा गावावर रुसलेलाच आहे. खडकाळ जमीन फारशी सुपीक नाही .पाण्याच्या बाबतीत तर नेहमीच वानवा जाणवते .गावात शिक्षितांपेक्षा अशिक्षित यांचे प्रमाण फारच जास्त आहे. या अशिक्षितपणामुळे बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क आलेला नाही. त्यामुळे सहकार्याची भावना तर जवळजवळ गावांमध्ये उरलेलीच नाही. स्वच्छतेचे महत्व कितीही प्रभातफेऱ्या काढल्या तरीदेखील गावातल्या लोकांच्या पचनी पडलेले नाही .प्रभातफेरी निघाली की प्रभातफेरीकडे बघायचे आणि प्रभातफेरी निघून गेल्यावर पुन्हा अंगणात कचरा करायचा .अशी ही आडमुठेपणाची वागणूक सर्व लोक एकमेकांना देत असत .                           एकंदरीत अशा परिस्थितीमुळे गावाचे वातावरण अगदी दूषित व बकाल झालेले होते .गावासाठी शोभेल असा शब्द जर म्हणाल तर तो फक्त गलिच्छ असाच होता .

        असे असूनही आमच्या गावाने निर्मलग्राम पुरस्कार कसा? मिळवला गावांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन कसे झाले? ह्या परिवर्तनाचा जनक कोण?
      गावातील या परिवर्तनाचा जनक गावातील तडफदार तरुण व पहिला गावाबाहेर शिकणारा विजू दादा होय. शिक्षण पूर्ण झाल्यावर विजू दादा गावामध्ये परत आला .मुळातच त्याचा स्वभाव शांत व संयमी असल्यामुळेे गावातील कोणाशीही त्याचे वाईट संबंध नव्हते. आणि त्याच्या  स्वभावाचा त्याच्या या कामी त्याला खूप उपयोग झाला. 
             गावातील मोठ्या माणसांना एकत्र केले व गावाचा कायापालट कसा करता येईल याविषयी चर्चा केली. नेहमीच्याा स्वभावाप्रमाणे गावातील लोकांनी सुरुवातीला विजू दादाची टिंगल टवाळी केली .विजूदादाने  त्यांच्याकडे लक्ष न देता कामाला सुरुवात केली. प्रथम गावातील प्रत्येक घरामध्ये संडास असावाा अशी कल्पना त्याने मांडली. गावातील लोकांचेेे मन वळवले. गावातील कामगारांनीही संडास बांधणेकामी पुढाकार घेतला. इतर लोक या कामासाठी मदत करत असत. विजूूदादा सर्वांच्या पुढे राहून कामात हातभार लावत असे .
         शौचालयांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व सहाय्याने गावांमध्ये विहिरी करण्यात आल्या .तसेच काही हात पंप देखील बसवण्यात आले. त्यामुळे पाणी आणण्यासाठी स्त्रियांची होणारी ससेहोलपट थांबली. व स्त्रिया सुखावल्या . म्हणतात ना "ज्या घरात आणि गावात स्त्रिया सुखी असतात त्या गावात आणि घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते "आणि झाले अगदी तसेच. बघता बघता गावातील लोकांचे मन परिवर्तन होऊ लागले. गोबर गॅस, ओल्या कचर्‍यापासून खत असे प्रकल्प यशस्वी होऊ लागले. लोक करत असलेल्या पारंपारिक शेतीला वन शेतीची जोड दिली गेली. तसेच पशुपालन देखील सुरू करण्यात आले .
                बघता बघता गावाची आर्थिक परिस्थिती खूपच सुधारली . आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे लोक समाधानी  दिसू लागलेत. एकत्रित काम केल्यामुळे लोकांमध्ये मदतीची भावना वाढली .लोक एकमेकांना सहकार्य करू लागले .गावातील भांडणे संपली व भांडण-तंटे यांची जागा आता मजा मस्करीने घेतली होती .गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले होते. गावातील शिक्षणाचा प्रश्न ही लवकरच सोडण्यात आला. ग्रामपंचायत व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने गावांमध्ये दहावीपर्यंत शाळा सुरु झाली .विविध प्रकारचे लघु उद्योग देखील सुरू करण्यात आले .गावातील तरुणांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले .त्यामुळे इतर उचापती न करता तरुण वर्ग हा कुशल वर्ग म्हणून तयार झाला . बघता बघता माझं हे गाव अगदी निर्मळ झालं.
       विजू दादा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला . सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाला. विजूदादा सारखाच आमच्या गावा वरही कौतुकाचा वर्षाव झाला .  आम्हाला निर्मलग्राम हा पुरस्कार मिळाला. आमच्या या गावाचा आदर्श ठेवत आजूबाजूच्या गावाने ही आमच्या पावलावर पाऊल टाकून विकासाची कास धरलेली आहे. अशी आहे आमच्या या आदर्श गावाची कथा.


  1. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  2. सुंदर विचार
  3. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  4. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  5. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  6. पर्यावरणाचे महत्व..  environment
  7. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  8. पैंजण

 तुम्हाला निबंध कसा वाटला हे नक्की सांगा

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने