corona,covid-19, Marathi essay on Corona
कोरोना व्हायरस

        ज्याप्रमाणे एकाच गावात किंवा चौकात लोकांचे अनेक प्रकारचे गट असतात तसेच सूक्ष्मजीवांचेही विषाणू, जिवाणू इत्यादी प्रकारचे गट असतात . प्रत्येक गटाची लक्षणे व आजार वेगवेगळे असतात .

         सध्या वेगाने पसरत असणारा कोरोना हा विषाणू गटातील आहे. तसे पाहता कोणताच विषाणू माणसांसाठी चांगला नाही .


        😢😢  लक्षणे 😢😢


      कोरोणाची लागण झाल्यास ताप, सर्दी, घसा दुखणे, नाक वाहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात .हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती मध्ये असतो म्हणून लोकं विशेष काळजी घेताना दिसतात . प्रथम ताप येतो. कोरोनाव्हायरस चे नाव covid19 आहे .यामध्ये प्रथम ताप येतो. मग कोरडा खोकला येतो .मग सुमारे एका हप्त्यात श्वास घ्यायला अडचण निर्माण होते .पण तरीही अशी लक्षणे दिसली म्हणजे लगेच कोरोना झाला असा विचार करून घाबरून  जाऊ नये. माहिती लपवू नये .डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित निदान करून घ्यावे.


 खालीलप्रमाणे काळजी घ्यावी


  1.        वयस्क माणसे किंवा ज्या माणसांना मधुमेह संबंधित आजार आहे त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे ,कारण अशा माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे .
  2. महत्वाचे सर्दी व फ्लू मध्ये ही अशीच लक्षणे दिसतात म्हणून घाबरून जाऊ नये याच्या पासून बचाव करण्यासाठी 

काळजी 

  1. अल्कोहल आधारित हॅन्ड रब वापरू शकतात.
  2.  साबणाने हात स्वच्छ धुणे
  3.  शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर वापरलेला किशोर पेपर कुठेही फेकू नये कचरापेटीत टाकावा
  4. डोळे तोंड यांना हात लावू नये
  5. मासाहार सहसा टाळावा 
  6. जनावरांचा संपर्क टाळावा
  7.  ज्यांच्यामध्ये सर्दी फ्लूची लक्षणे दिसतात त्यांच्यापासून दूर राहा
  8.  मास्कचा वापर करा 

 सर्वात महत्त्वाचे


घरीच राहण्याचा प्रयत्न करा.


  मास्क संबंधी कोणती काळजी घ्यावी.


  1. मास्क लावताना दोन्ही हातांचा काळजीपूर्वक वापर करा एका हाताने मास्क बांधू किंवा घालू नका.
  2. मास्क ला समोरून बाहेरच्या बाजूने हात लावू नये व हात लागला तर लगेच स्वच्छ धुवावा.
  3. मास्क कशापद्धतीने घाला की नाक तोंड दाढीचा भाग झाकला गेला पाहिजे .
  4. चेहरा जास्तीत जास्त झाकला जाईल ते पहावे.
  5.  मास्क काढताना त्याच्या पट्ट्या धरून काढा इतरत्र धरून काढू नये .
  6. मास्कला वारंवार हात लावू नये .
  7. मास्क दररोज धुतलाच पाहिजे .
  8. एकमेकांचे मास्क वापरू नये .
  9. हातांना सॅनिटायझर लावा किंवा साबणाने नेहमी स्वच्छ करा.


विनंती 

      आत्ता भारतासह जगातील सुमारे दोनशे देशांमध्ये कोरोनाव्हायरस ने धुमाकूळ घातलेला आहे .अगदी याच पद्धतीने सुमारे अठरा वर्षांपूर्वी सार्स नावाचा  एक रोग भारतामध्ये आला होता . त्यावेळीही सुमारे सातशे लोकांनी आपले प्राण गमावले होते .देशाच्या आर्थिक प्रगतीवर तसेच सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर त्यामुळे फार मोठे परिणाम झाले होते ; परंतु तरीही माणसाने जगणे सोडले नाही अगदी तसेच आताही माणसांनी विचार करावा . कारण की अलीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीने आत्महत्या केल्याचे अनेक उदाहरणे बातम्यांमधून दिसून येतात. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही काळ कायमस्वरूपी राहत नाही तसेच हा कोरणा काळही निघून जाईल. इतक्या लवकर धीर सोडू नका संयमाने काम घ्या मग उद्याची सुंदर पहाट तुमचीच असेल.

 धन्यवाद


हे वाचायला विसरू नका 


चहा बोलू लागला तर निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

          

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने