मी कोरोना व्हायरस  बोलतोय मराठी निबंध  

|  Mi corona virus boltoy 


 निबंध लेखन :

         कु. कृष्णा दत्तात्रय  पगारे.


          हॅलो, माझ्यासोबत फ्रेंडशिप करता का ? म्हणजेच माझ्या हातात हात मिळवता का ? म्हणजे मी मरणापर्यंत तुमच्या सोबत राहील . तुम्ही विचार करत असणार की , मी नमस्कार का नाही केला ? कारण मला नमस्कार करायला आवडत नाही. नमस्कार केल्याने मी तुमच्यासोबत राहणार नाही आणि हे मला आवडणार नाही . यावरून तुम्हाला मी कोण हे समजून गेल असेल मी कोरोनाव्हायरस   बोलतोय 


मी कोरोना बोलतोय मराठी निबंध


         माझा जन्म खूप जुना आहे पण मी तेव्हा लोकांना त्रास देत नव्हतो . परंतु तुम्ही लोक पर्यावरणाचं संतुलन ठेवत नव्हती म्हणून निसर्गाने मला सांगितले की ,"जा,आणि शिकव धडा या लोकांना " .

         असा माझा हेतू काय वाईट नाही पण मी जेव्हा जातो तेव्हा लहान पोरं बोलतात , "कशाला आला हा कोरोना ? आम्हाला ना चॉकलेट खायला भेटते , ना बाहेर फिरायला जाता येत; आणि नेमके मी पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो . त्यामुळे पोर म्हणतात की," आम्हाला मामाच्या गावाला जायला भेटले नाही, ना आईस्क्रीम खायला भेटले" हे ऐकून मला वाईट वाटते.पण काय करू ?

            तुम्ही लोक मला हरवू शकतात. कसं सांगतो तुम्ही घरात राहून मला हरवु शकता, गरज असेल तरच बाहेर जाऊ शकतात आणि बाहेरून घरात आल्यावर हात धुऊन


मग बाकीच्या वस्तूंना हात लावायचा. सर्व शरीराची स्वच्छता ठेवायची.

त्यामुळे मी तुमच्या जवळ येणार नाही नाहीतर मी तुमच्या घरचा पाहुणा बनून येणार .

           मी खूपच छोटा आहे मी एक गटात असतो याचा अर्थ असा समजू नका की माझ्यात ताकद नाही, जे मोठे मोठे करू शकले नाही ते मी करून दाखवले. काय ते सांगू मी पूर्ण जग बंद करून .टाकलं मला सर्वात जास्त अडचणीत आणलं ते म्हणजे मोदी साहेबांनी ;पण मी काही कमी नाही. माझा सर्वात जास्त प्रसार अमेरिका ,इटली आणि इतर देशांमध्ये आहे. लोक म्हणतात की मी चीन च्या वुहान मधून आलो ,पण मी खूप जुना आहे माझा जन्म इसवी सन 1960 मध्ये झाला .तेव्हा मी फक्त कोंबड्यांना व्हायचो. तेव्हा माझे नाव ब्रोंकायटिस विषाणू असे होते. तेव्हा मी संसर्गजन्य रोग होतो आणि माणसांना जेव्हा मी व्हायचो. तेव्हा फक्त त्यांना सर्दी-खोकला व्हायचा .आता माझे नाव covid-19 असे आहे. त्याचा अर्थ असा आहे की co.-  corona

            Vi.- virus

             D.- disease

            19.- 2019.


 2019 म्हणजे मी आत्ता 2019 मध्ये आलो .

        माझ्यावर अजून कोणतेही औषध निघाले नाही; त्यामुळे लोक मला घाबरतात .मी भारतात पाहिले की दिनांक पाच मार्च ला पाच वाजेपासून पाच मिनिटे मोदी साहेबांनी लोकांना ताट, टाळ्या, शंकु घंटी, घंटा असे इतर वाद्य वाजवायला लावली. तेव्हा मला वाटले होते की भारतात माझं राहणं अशक्य आहे. पण काही लोक असे होते की त्यांनी रस्त्यावर गर्दी करून भांडे वाजवले, आणि तुम्हाला माहीत आहे की जिथे गर्दी तिथे कोरोना. म्हणून मी भारतात आलो. नंतर 9 मे ला दिवे लावले तेव्हा पण मला भीती वाटली; पण गर्दी हे भारतातलं माझं ब्रह्मस्त्र बनलं होतं. याच्यावर मला एक माझा डायलॉग आठवतो ,"यहा से बारा कोस पर जब कोई आदमी भीड करता हे तब, पोलीस उसे कहता है कि भीड मत करो वरना कोरोना आ जायेगा. आता मी जातो गर्दीकडे.

                    ।बाय।


लेखन: कृष्णा दत्तात्रय पगारे,

               इयत्ता, 7वी

                नवोदय विद्यालय, 

खेडगाव  नासिक 


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐      


 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

      कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

               खूप खूप धन्यवाद


आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने