www.upkarmarathi.com


           शिक्षण हे सध्याच्या काळाची गरज आहे ज्याचे शिक्षण जास्त त्याचा मान मोठा .काही लोकांना शिक्षणाची खूप आवड असते पण त्यांच्यापुढे एक मोठे संकट उभे असते ते म्हणजे पैसे. सध्याच्या काळात  शाळा व कॉलेज खोलने हा पैशाचा एक उत्तम मार्ग झाला आहे. शाळा व कॉलेजची फी महिने महिने वाढू राहिली . या वाढत्या फी मुळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा तोटा होऊन राहिला आहे . शिक्षण घेतल्यामुळे कित्येक आर्थिक अडचणी दूर होतात . शिक्षण घेणे हे आवश्यक आहे. शिक्षण न घेणे किती धोकादायक आहे ते मी तुम्हाला समजावून देतो . शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला लिहिता वाचता येणार नाही. लिहिता वाचता न आल्यामुळे आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा काहीही उपयोग नाही. कारण बँकेमध्ये वापरली जाणारी अधिकृत भाषा म्हणजे इंग्लिश.  शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला इंग्रजी येणार नाही.

|shikshnache mahatva speech in Marathi

         तसेच आपल्याला कोणीही फसवू शकते व शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला वाचता न आल्यामुळे आपण कुठेही सही करु व आपली वडिलोपार्जित संपत्ती स्वतःहून लुटवूण घेऊ. असे होण्यामागचे एकमेव कारण म्हणजे शिक्षण न घेणे. शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला कुठेही नोकरी मिळणार नाही. नोकरी न मिळाल्यामुळे आपल्याकडे पैसे राहणार नाही. पैसे नसल्यामुळे आपल्याला खायला अन्न देखील राहणार नाही . अन्न न मिळाल्यामुळे आपला मृत्यू देखील होऊन जाईल. आपल्या या भारत देशाला इतर सर्व देशांपेक्षा उत्तम व दर्जेदार बनवण्याकरिता देखील आपल्याला शिक्षण घ्यावे लागेल. आपला भारत देश शिक्षणाच्या शर्यतीत खूप मागे आहे त्याला नंबर एक वर आणण्याची जबाबदारी आपली आहे पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण शिक्षण घेऊ.
शिक्षणाचे महत्व |shikshnache mahatva |shikshnache mahatva speech in Marathi


           सध्याच्या काळात शिक्षण म्हणजेच पैसे. शिक्षण म्हणजेच मान .शिक्षण म्हणजे सन्मान होय .शिक्षण घेणे किती आवश्यक आहे हे तर तुम्हाला कळालेच असेल. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कडून कोणीही हिसकाउ शकत नाही, पण गेल्या काही वर्षात आपल्या भारत देशात खूप धक्कादायक बालकामगारांच्या घटना समोर आल्या आहेत .आपल्या कामात अथवा व्यवसायात बालमजूर ठेवणे हा एक खूप मोठा गुन्हा आहे. लहानपण हे फक्त खेळण्यात व शिक्षण घेण्यातच जायला हवे ,पण काही न काही कारणामुळे लहान मुलांना काम करण्यासाठी बाहेर पडावेच लागते आणि या घटना फक्त आणि फक्त आपल्या गावाकडेच पहायला मिळतात. शिक्षण हे सर्वांना समानच भेटले पाहिजे याकरिता भारत सरकारने अनेक उपक्रम राबवले. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे सर्व काही असतानाही शिक्षण न घेणे म्हणजे मूर्खपणाच.

            शिक्षण म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग होय. भविष्यातील आपले जे स्वप्न आहेत जसे की डॉक्टर ,शिक्षक ,सैनिक इत्यादी सर्व स्वप्न पूर्ण करायला देखील शिक्षणाची गरज आहे. भारत देश हा कलावान देश मानला जातो पण या सर्व कला शिकण्याकरता देखील शिक्षणाची गरज आहे. जुन्या काळात शिक्षणाला एवढी मान्यता नव्हती लोक अज्ञानी होते याचाच फायदा एखादा दृष्ट स्वभावाचा व्यक्ती घ्यायचा पण आता तसं नाही आता प्रत्येक घरापर्यंत शिक्षण पोचले आहे. जुन्या काळी मुलींना शिक्षण घेण्यास बंदी होती पण अशा  दुर्दैवी परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली  .शिक्षणाशिवाय माणूस अपूर्णच . आपल्या भारत देशात शिक्षणाला तीन टप्प्यात विभागले जाते. एक प्राथमिक दोन माध्यमिक व तीन उच्च माध्यमिक शिक्षण. शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे शिक्षण घेतल्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्याला एक ध्येय येते शिक्षण आपल्याला मजबूत बनवते शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला आयुष्यात हवे ते साध्य करता येते. जीवन सुखी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.

मित्रानो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते मला नक्की सांगा ,

हा लेख लोक खालील नावानेही शोधतात ;
|शिक्षणाचे महत्त्व मराठी
|shikshnache mahatva speech in Marathi
|Shikshanache prakar
|shikshnache fayde in Marathi
| shikshnache mahatva tipa liha

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने