www.upkarmarathi.com

How to improve CIBIL score in Marathi?|सिबिल स्कोर कसा वाढवायचा

   
      प्रिय वाचक मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सिबिल स्कोर कसा वाढवावा? सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय? सिबिल स्कोर वर परिणाम करणारे घटक कोणते? याविषयी सविस्तर माहिती बघूया.

How to improve CIBIL score in Marathi?|
How to improve CIBIL score in Marathi?|सिबिल स्कोर कसा वाढवायचा


|What is CIBIL score? |सिबिल स्कोर म्हणजे काय?


    CIBIL score म्हणजे एक तीन अंकी संख्या होय. ही संख्या 300 ते 900 यांच्या दरम्यान असते. एखाद्या व्यक्तीची कर्ज बाबत पात्रता किती आहे हे या सिबिल स्कोर द्वारे दर्शवले जाते. सिबिल स्कोर जितका चांगला तितके आपल्याला कर्ज पटकन मिळू शकते व सिबिल स्कोर जितका कमी तितके आपल्याला कर्ज मिळण्यात अडचणी येतात.
  
      अगदीच गावरान भाषेत सांगायचे झाले तर ज्याचं सिविल स्कोर चांगला तो कर्ज चांगल्या पद्धतीने फेडू शकतो.. त्याच्यावर विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि ज्याचा सिबिल स्कोर खराब किंवा कमी आहे तो व्यक्ती कर्ज फेडण्यात अडचणी निर्माण करतो असा याचा सरळ सरळ अर्थ सांगता येईल.
   
     याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे बघूया.

|CIBIL full form in Marathi |CIBIL long form in Marathi


Credit information bureau India limited
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड

  सिबिल स्कोर चे वारंवार निरीक्षण करणे आणि नियमितपणे तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सिबिल स्कोर जर 300 च्या जवळपास असेल तर तो वाईट सिबिल स्कोअर आहे असे म्हणतात ,तर 750 च्या पुढे सिबिल स्कोर हा चांगला आहे असे समजले जाते.

        How to improve CIBIL score?, तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअर वरून म्हणजेच क्रेडिट स्कोअर वरून तुमच्या आर्थिक स्थितीचा अगदी अचूक अंदाज लावता येतो. ज्यावेळी तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करायचा असतो त्यावेळी तुमचा हा क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज मिळेल किंवा नाही हे ठरवतो.

    वरील सर्व बाबी वाचून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की जर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे तर क्रेडिट(CIBIL) स्कोअर चे महत्व अननसाधारण आहे त्यामुळे हा क्रेडिट(CIBIL) स्कोअर उत्तम राखणे अत्यंत आवश्यक आहे उत्तम क्रेडिट स्कोअर मुळे आपण स्वस्त कर्ज मिळवू शकतो. क्रेडिट(CIBIL) स्कोअर चांगला नसेल तरी देखील घाबरून जाण्याचं कारण नाही कारण की तो सुधारता येऊ शकतो आणि तो कसा सुधरवायचा ते आपण पुढे बघणारच आहोत.

     ज्यावेळी आपला क्रेडिट(CIBIL) स्कोअर चांगला असतो त्या त्यावेळी अनेक बँका देखील आपल्याला स्वस्त कर्ज देतात. सर्व वित्तीय संस्था म्हणजेच बँका पतसंस्था किंवा इतर संस्था या सिबिल स्कोअर उत्तम असेल तर त्या आधारानेच आपल्याला कर्ज देतात. जर तुमचा सिबिल(CIBIL) स्कोअर चांगला असेल तर कर्जाच्या व्याजदरावर सूट देखील मिळू शकते.

    क्रेडिट(CIBIL) स्कोअर का महत्वाचा आहे|importance of credit score


1) आपल्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या परतफेडीचा इतिहास सिबिल स्कोअर करून ओळखला जातो.
2) अर्जदाराचे कर्जाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे हे समजते.
3) सर्वच वित्तीय संस्था अर्जदाराचा सिबिल स्कोअर नक्कीच पाहतात.
4) तुमचा सिव्हिल(CIBIL) स्कोअर जर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो चांगला स्कोअर मानला जातो.

|Criteria for CIBIL score|क्रेडिट स्कोअर चे परिणाम काय आहेत?


 1. 800-850 =उत्तम (wow)
 2. 740-799=खूप छान(great)
 3. 670-739=छान
 4. 580-669=बरा
 5. 300-579=वाईट

सिबिल(CIBIL) स्कोअर कमी असल्यास काय?


 1. तुम्हाला कर्ज घेण्यासाठी अडचण येईल.
 2. तुम्हाला वैयक्तिक किंवा व्यवसायिक कर्ज हवे असेल तर बँके कडून किंवा संस्थेकडून कर्ज मिळणे फारच कठीण होईल.
 3. तुमच्या कर्जाला मंजुरी मिळणे किंवा नकार मिळणे हे  क्रेडिट स्कोअर वर अवलंबून असते.
 4. समजा कर्ज मिळालेच तर ते कमी मिळते.


सिबिल स्कोअर कसा वाढवायचा|how to increase CIBIL score in Marathi


 1. क्रेडिट कार्डवर कर्ज घेण्याचे शक्यतो टाळा.
 2. घेतलेल्या कर्जाचे हप्ते (EMI) नियमित आणि वेळेवर भरा.
 3. तुमच्या गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचे टाळा.
 4. क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरा.
 5. क्रेडिट स्कोअर नियमित आणि वेळोवेळी तपासून घ्या.
 6. क्रेडिट स्कोअर योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करा.
 7. जुने क्रेडिट कार्ड असेल तर ते बंद करू नका.
 8. आपल्या क्रेडिट मर्यादा वाढवा.
 9. जास्त क्रेडिट कार्ड वापरणे बंद करा.
 10. क्रेडिट वापर मर्यादित करा.
 11. दीर्घ मुदतीचे कर्ज घ्या त्यामुळे आपला मासिक ईएमआय कमी होईल व ईएमआय देखील भरणे सोपे जाईल.


    FAQs

1) सिबिल स्कोअर ची गणना कशी केली जाते? CIBIL score calculation?


    CIBIL score ची गणना अनेक घटकांद्वारे केली जाते. जसे की तुम्ही आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली. एम आय वेळेत भरली किंवा नाही. कर्जपूर्ण खेडले की चुकवले या सर्व घटकांचा विचार करून सिबिल स्कोर ठरतो.

2) ऑनलाइन सिबिल स्कोर तपासणी सुरक्षित आहे का?

  तुम्ही क्रेडिट युनियन वेबसाईट किंवा one score सारख्या ॲपवरून तुमचा क्रेडिट स्कोर तपासून घेऊ शकता.

3) कर्जाची पात्रता तपासल्याने क्रेडिट स्कोर वर परिणाम होतो का?

नाही


   Conclusion


   प्रिय वाचक मित्रांनो आजचा आपला सिबिल स्कोर कसा वाढवावा |how to improve CIBIL score in Marathi. यामधून तुम्हाला सिबिल स्कोर म्हणजे काय तो वाढवण्यासाठी काय करावे लागेल इत्यादी गोष्टींची माहिती मिळाली असेलच.. 

    तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा . खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने