www.upkarmarathi.com

     Plastic pollution information in Marathi, मित्रांनो, निसर्ग माणसाची गरज भागवतो हाव नाही असे प्रसिद्ध वाक्य आहे. परंतु मनुष्य हा प्राणी असा आहे की त्याचे हाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ,आणि यामुळे त्याने अनेक संकटांवर मात केली असली तरी देखील भविष्यात उद्भवणाऱ्या मोठ्या संकटांचे बीजारोपण  तो करत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे प्लास्टिक प्रदूषण. आजच्या या लेखांमध्ये आपण प्लास्टिक प्रदूषण| plastic pollution याविषयी जराशी माहिती जाणून घेऊया.

|Plastic pollution information in marathi
 |Plastic pollution information in marathi  


प्लास्टिक प्रदूषण  |Plastic pollution information in marathi  

   |Plastic pollution information in marathi   ,संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे ज्या ठिकाणी इतक्या विविध प्रकारचे सौंदर्य आपल्याला बघायला मिळते. मनमोहक सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार पृथ्वीवर आपण राहतो याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटायला हवा. परंतु हे पृथ्वीचा सौंदर्य फार काळ टिकेल असे वाटत नाही .माणसाने प्रगती केली परंतु त्याच बरोबर नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पृथ्वीला इजा पोहोचवायला सुरुवात केली .अशा वेळी हा प्रश्न येतो आपल्या सर्वांची लाडकी  ही पृथ्वी अशीच सौंदर्याने नटलेली राहील का ? प्रगती बरोबरच अनेक प्रकारचे प्रदूषण होत गेले परंतु त्यामध्ये असे पण काही घटक आहेत ज्याचा पर्यावरणाला जास्त धोका आहे.
Plastic pollution information in marathi
Plastic pollution information in marathi  

प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? What is plastic pollution?


      आता आपल्या मनात प्रश्न येईल की प्रदूषण म्हणजे नेमके काय ? ज्या घटकांमुळे पर्यावरणाला धोका असतो असे घटक किंवा अशा घटकांचे परिणाम. प्रदूषण हा सध्या जागतिक विषय आहे .ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये प्रदूषण जास्त प्रमाणात पाहायला मिळते. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे ज्या भागांमध्ये मनुष्य रहात सुद्धा नाही अशा भागात सुद्धा प्रदूषणाचे परिणाम पाहायला मिळतात .

    थोडे इतिहासात डोकावले तर आपल्याला समजेल की सुरुवातीला फॉसिल पासून बनलेले प्लास्टिक वापरात होते. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक पद्धतीचे प्लास्टिक वापरात आणले गेले आणि आज प्लास्टिक पासून बनलेल्या पदार्थांची आणि वस्तूंची संख्या खूपच जास्त आहे. पॅसिफिक महासागरामध्ये स्थित अंटार्टिकाच्या बर्फांच्या थराखाली काही पेस्टिसाइड्स आणि काही प्लास्टिक सापडले आहे. त्याचबरोबर पॅसिफिक महासागरामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्मकण पाहायला मिळाले .ज्यांना आपण द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच  असे देखील म्हणतो.

   दरवर्षी 1.1 ते 8.8 दशलक्ष टन कचरा हा समुद्रामध्ये फेकला जातोय 2013 पर्यंत 86 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा हा समुद्रामध्ये टाकला गेला 2019 पर्यंत दरवर्षी 368 दशलक्ष टन प्लास्टिक तयार केले गेले त्यामध्ये 51% आशिया खंडामध्ये तयार झाले आहे. जगामध्ये चायना हा सर्वात जास्त प्लास्टिक उत्पादन करणारा देश आहे 1950 पासून 2018 पर्यंत अंदाजे 6.3 अब्ज टन प्लास्टिक जगभरामध्ये तयार झाले .
Plastic pollution information

   जसे की आपण सर्वजण जाणतोच की प्लास्टिक हा सर्वात जास्त काळ टिकणारा पदार्थ आहे तसेच त्याचे विघटन होत नाही त्यामुळे हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे 2010 च्या अहवालानुसार प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत हा बारावा देश आहे.

    2050 पर्यंत आपल्यापासून 56 अब्ज टन ग्रीन हाऊस गॅस तयार होईल जे निश्चितच खूप घातक आहे. प्लास्टिक मुळे मनुष्य प्राणी जीव जंतू पाण्यातील जीव जंतू याबरोबरच वनस्पती यांना देखील धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक देशाने याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात तर केली आहे. यामध्ये आपलाही काही हिस्सा आहे हे विसरून चालणार नाही. या प्लास्टिकच्या सैतानाच्या विळख्याला वेळीच आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे .नाहीतर मनुष्य याच सैतानाच्या विळख्यात येईल.

प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मितीची कारणे(plastic pollution causes)

  1. प्लास्टिक हे वापरण्यासाठी अत्यंत साधे व सोयीचे वाटते. 
  2. पाण्याचा प्लास्टिक वर प्रभाव फारच कमी प्रमाणात होत असल्यामुळे त्याच्या वापरावर सहाजिकच अधिक भर दिला जातो.
  3.  प्लास्टिक वापरण्यासाठी अत्यंत सोपे असते. 
  4. शिवाय वजनाने देखील अत्यंत हलके असते. हलके असूनही दीर्घकाळ टिकणारे असल्याने प्लास्टिकच्या वापराकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला.
  5. धातूच्या वस्तूंच्या मानाने प्लास्टिक वस्तूंची किंमत देखील कमी असते. 
  6. भांडी ,प्लास्टिकच्या पिशव्या, फर्निचर यांच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिकच्या कचऱ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे आणि या वाढीमुळेच प्लास्टिक प्रदूषणासारखी अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.

प्लास्टिक प्रदूषणाचा मनुष्य आणि प्राण्यांना होणारा धोका


          सध्या मानवाच्या जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की, प्लास्टिकचा वापर केल्याशिवाय माणसाचे जगणेच अवघड होऊन जाईल. अर्थात प्रयत्न केल्याने तेही शक्य होईल.
नियमितपणे निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे फुटलेले भांडे पिशव्या इत्यादींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे प्लास्टिकच्या पिशव्या व भांडे जलस्त्रोतांमध्ये वाहून जातात. बऱ्याचदा विविध जलचर प्लास्टिक खातात व मृत्युमुखी पडतात.

   पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उघड्यावर पडलेल्या अनेक प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये पाणी साचते या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या डासांची निर्मिती होते व त्यामुळे हिवताप आणि डेंग्यू  सारख्या रोगांची लागण होते.

   अशाप्रकारे येणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नद्या धरण येथील पाणी दूषित होते. प्लास्टिकचे अत्यंत छोटे छोटे पण पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जातात असे पाणी पिल्यामुळे अनेक आजार  उद्भवतात.

प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम (consequences of plastic pollution)


  1. नेहमीच्या कचऱ्यामध्ये आपण जर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या टाकल्या तर भटकेप्राणी ते खाऊन मृत्युमुखी पडू शकतात.
  2. ज्यावेळी प्लास्टिक उघड्यावर टाकले जाते आणि ते पाण्याच्या संपर्कात आल्याने अनेक घातक रसायने बनतात. हे पाणी मानवांनी पिल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात.
  3. रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा पावसाळ्याच्या दिवसात वाहून जलस्त्रोतांमध्ये जातो जलचर हे प्लास्टिक खाल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडतात.

निष्कर्ष  :-  मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये प्लास्टिक पोल्युशन म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण याची मराठीमध्ये माहिती बघितली ( |Plastic pollution information in marathi  ). मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .तसेच तुम्हाला अजून काही कल्पना सुचवायच्या असतील तर त्या देखील सुचवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयात माहिती हवी असेल तर तेही कळवा. धन्यवाद.
Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने