1001marathiessay.blogspot.com

Majurache manogat marathi nibandh
एका मजुराचे मनोगत 



मजुराचे मनोगत मराठी निबंध
 |Majurache manogat marathi nibandh

           प्रचंड वेदनेतूनच सुंदर महाकाव्य निर्माण होते. असे मी बऱ्याच दिवसांपूर्वी वाचले होते. ते आता प्रत्यक्ष अनुभवतो आहे. नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे रतन. मी एक मजूर आहे. मजुराच्या तोंडून इतके सुंदर तत्त्वज्ञान कसे बाहेर पडते? याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल.

           मी एका मध्यमवर्गीय चांगल्या घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे. एकेकाळी आमचे  छोटेसे हॉटेल होते. हॉटेल अगदी व्यवस्थित चालायचे. वडिलांनी मोठ्या कष्टाने हे वैभव उभे केलेले होते. मला मात्र त्याची अजिबात कदर नव्हती. वडिलांनी भरपूर समजावून सांगितले तरी देखील माझ्या वागण्या मध्ये काहीही बदल झाला नाही. धंदा मधील बारकावे शिकून घेण्यासाठी वडिलांनी मला बऱ्याच वेळा सांगितले परंतु मी ते अजिबात ऐकले नाही.

           एके दिवशी  एका अपघातामध्ये वडिलांना बराच मार लागला. ते हॉटेल सांभाळू शकत नव्हते. माझ्या वागण्यातील बेदरकारपणामुळे आमचे हॉटेल लवकरच बंद झाले आणि माझ्यावर मजुरी करण्याची वेळ आली. मोठ्या कष्टाने वडीलांनी उभे केलेले हॉटेल न राहिल्यामुळे वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांची प्रकृती अधिकच खालावली.
  1. हा निबंधही वाचा  एका शेतकऱ्याचे मनोगत
         अशा परिस्थितीत मजुरी करणे हाच पर्याय माझ्यासमोर उभा राहिला ,कारण इतर कोणतेही जीवनावश्यक कौशल्य मी शिकून घेतले नव्हते. आज मजुरी करण्यासाठी मी शहरामध्ये आलो आहे. आई-वडील गावाकडेच असतात. दिवसभर कष्ट करून मला शंभर दोनशे रुपये मजुरी मिळते. त्यामध्येच तिकडचा सगळा खर्च भागवून आई-वडिलांच्या दवाखान्यासाठी ही पैसा गोळा करावा लागतो.

         मिळणारे पैसे पुरेसे पडत नाही त्यामुळे मला इतर वेळी ही मिळेल ते काम करावे लागते. प्रचंड मेहनत घेऊन मिळणाऱ्या पैशांची किंमत आज मला कळते आहे. वडिलांनी कष्ट करून उभ्या केलेल्या हॉटेलला मी वाचवू शकलो नाही याची खंत आजही मला वाटते.

        आता मनात एक पक्की खूणगाठ बांधलेली आहे. काहीही झाले तरी हॉटेल पुन्हा उभे करायचे. पुन्हा प्रगती करून आई-वडिलांच्या चेहर्‍यावरचे ते हास्य फुलवायचे.

          एक गोष्ट मात्र प्रकर्षाने मी शिकलेलो आहे, ते म्हणजे तुम्ही कितीही शिकलेले असा, परंतु कोणते तरी व्यवसाय शिक्षण तुमच्याजवळ असलेच पाहिजे. एखादा छंद तरी माणसाने जोपासला पाहिजे. कारण की त्यामुळे एखादी कला आपल्या अंगी बनवली जाते आणि कला माणसाला जगवते.

          वडिलांच्या  अपघातामुळे माझ्यावर हॉटेल चालवण्याची जबाबदारी आली होती ती मी प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडली नाही. त्यावेळी जर मी मनापासून लक्ष देऊन आई-वडिलांचे बोलणे ऐकले असते तर आज माझ्यावर ही परिस्थिती आली नसती. त्यामुळे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की काहीही झाले तरी आई वडिलांच्या शब्दांचा मान राखा.

          या जगात आई-वडील आणि शाळा या तीन गोष्टी अशा आहेत ज्या प्रथम आपल्याला शिकवतात आणि नंतर अनुभव देतात. प्रत्यक्ष जगामध्ये मात्र याच्या उलट घडत असते जग पहिले अनुभव देते आणि मग आपण आपोआप शिकून जातो. अशी शिकण्याची वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध व्हा आणि आई-वडिलांचे आदेश पाळायला शिका.

        मलाही शहाणपण उशिरा का होईना परंतु मिळाले आहे. तुम्ही मात्र माझ्यासारखी चूक अजिबात करू नका.
     चला माझी कामावर जाण्याची वेळ झाली. तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आता मला वेळ नाही . मनातील थोडेसे दुःख हलके करावे असे वाटले, म्हणून तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त केले आणि तुम्ही ते ऐकून घेतले त्यामुळे खूप खूप धन्यवाद. चला ,आता येतो मी.

........ समाप्त.........

या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
  1. |मजुराची आत्मकथा|
  2. |मी मजूर बोलतो आहे|
  3. |मजुराची व्यथा मराठी निबंध|
  4. |मजुराचे मनोगत निबंध मराठी|
  5. |मजुराची कैफियत|
  6. |कल्पनात्मक निबंध|

   प्रिय मित्रांनो तुम्हाला " मजुराचे मनोगत" निबंध कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा.

हे निबंध वाचायला विसरू नका.
  1.  घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
  2.  मी वृक्ष बोलतोय 
  3. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  4. मी कोरोना वायरस बोलतोय.
  5. आमचे वनभोजन
  6. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  7. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  8. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  9. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  10. परीक्षा .. छान मराठी लेख.
  11. उपकार ...छान कथा वाचा.
  12.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  13. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
            तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचा निबंध हवा असेल तर तेही आम्हाला नक्की कळवा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
    या सर्वांबरोबर एक गोष्ट मात्र अजिबात विसरू नका कि, कुठलाही निबंध जसाच्या तसा लिहून वापरू नका तुम्ही तुमच्या कल्पना देखील त्यामध्ये टाका.  म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि तुमच्यातील निबंध लिहिण्याची क्षमता अजून चांगल्या पद्धतीने वाढत जाईल व लवकरच तुम्हाला ही कला आत्मसात होईल.

         

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने