1001marathiessay.blogspot.com


अति तिथे माती

अति तिथे माती मराठी निबंध

      अति तिथे माती ही मराठी भाषेतील फार जुनी म्हण आहे. म्हण जुनी असली तरीदेखील तिचा अर्थ मात्र आजपर्यंत असाच नित्यनूतन आणि आयुष्याला वळण देणारा आहे. जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान हे तीन शब्द सांगून जातात. अति तिथे माती याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर शेवटी सगळे व्यर्थ ठरते.
       स्वामी विवेकानंद म्हणतात की ,कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे विष होय. मग ती गोष्ट कोणतीही असो पैसा असू द्या, आराम असू द्या ,नाहीतर काम असू द्या . अति झाल म्हणजे ते सगळे व्यर्थ ठरते.
       सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये मनुष्य पैशामागे इतका धावतो, की त्याचे आरोग्याकडे लक्ष राहत नाही. एक दिवस  आरोग्य बिघडते आणि धावपळ करून कमावलेला सर्व पैसा आरोग्य सुधारण्यासाठी खर्च होतो. या सगळ्या धावपळीमध्ये आयुष्य जगायचं राहूनच जातं.
      आयुष्य जगताना कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावे म्हणजेच प्राधान्य ,ज्याला इंग्रजीमध्ये प्रायॉरिटी असे म्हणतात. ते आपल्याला हे तीन शब्द शिकवतात. ज्यावेळी एखादी गोष्ट करताना आपण अतिरेक करत असतो त्यावेळी हे शब्द आठवावे आणि मग ठरवावे की अतिरेक खरोखर आत्ता गरजेचा आहे का? या प्रश्नाचे उत्तर जर समाधान कारक मिळाले, तर करा प्रयत्न.

अति तिथे माती ATI tithe mati marathi nibandh
       हल्लीची तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनांच्या आहारी गेलेली दिसते. अगदी लहान लहान मुले देखील गुटख्याच्या पुड्या सर्रास रिकाम्या करताना दिसतात.एका वेळेला तोंडामध्ये 2-2 गुटख्याच्या पुड्या ओतणारे  महाभाग देखील दिसतात. याचा इतका अतिरेक होतो ी बर्‍याचदा जीव देखील गमवावा लागतो .तिथेही ही म्हण लागू पडते अति तिथे माती.
         पुराणांमध्ये देखील अशा अनेक कथा आहेत रावणाला ही आपल्या संपत्तीचा प्रचंड गर्व होता परंतु मृत्युसमयी स्वतःबरोबर एक कण देखील घेऊन जाता आला नाही. स्वभावातील हा अतिरेकी पणा व्यक्तीचा घात होण्याला कारणीभूत ठरतो. आपल्या सहकाऱ्यांवर किंवा इतरांवर संशय घेण्याची वृत्ती संपूर्ण काम बिघडवून टाकते. एकत्रित काम करण्याची वृत्तीच संपून जाते.
         राग , मोह, द्वेष ,असूया या माणसाच्या नैसर्गिक भावना आहेत. परंतु यापैकी कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला तर मनुष्याला त्या वाममार्गाकडे नेतात. प्रसिद्ध इंग्रजी नाटककार यांनी त्यांच्या ऑथेल्लो नावाच्या नाटकामध्ये या विषयी फार सुंदर वर्णन केलेले आहे.
      जी माणसे संपत्तीने समृद्ध आहेत अति संपत्तीमुळे त्यांनी कधी गैरसोय बघितलेली नाही. अडचणींना त्यांनी तोंड दिलेच नाही. अशी माणसे बऱ्याच वेळा गैरसोय झाली किंवा संकटे आलीत की आत्महत्या देखील करतात. या सर्वांवरून हेच कळते कि, अति तिथे माती.
       सर्वात शेवटी मला असेच म्हणावेसे वाटते की आयुष्य सुखाने समाधानाने जगायचे असेल तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. आता मी माझा निबंध लेखनाचा मोह येथे आवरतो .नाहीतर  अति लेखन करण्याच्या नादात तुम्ही हा निबंध वाचणारच नाही. म्हणजे परत तेच ,अति तिथे माती.       मित्रांनो ,तुम्हाला हा अति तिथे माती कल्पनाविस्तार मराठी निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.      
    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने