1001marathiessay.blogspot.com







प्रतिष्ठा मराठी निबंध  |  Essay on prestige in 200 words




 सन्मान
      
            तुम्हाला जर कोणी विचारले सन्मान कशात आहे ? तर मी खात्रीपूर्वक सांगतो प्रश्न विचारल्या बरोबर लगेचच तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून उत्तर मिळेलच असे नाही.
पण तुम्हाला जे जे उत्तरे मिळतील त्यामध्ये पैसा उत्तर नक्की मिळेल. 
     अर्थात काही अंशी बरोबरही आहे. पण फक्त पैशानेच सन्मान प्राप्त होतो असे म्हणणे फार धाडसाचे होईल. कारण या जगामध्ये असे अनेक व्यक्ती होऊन गेले की ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता परंतु तरीही आज अनेक वर्षांनंतर देखील त्यांच्याकडे लोक सन्मानाने आणि आदराने बघतात.
      सन्मान याला इंग्रजीमध्ये prestige असे म्हणतात. सन्मान मिळवण्यासाठी बऱ्याच जणांनी कष्टाचे डोंगर उपसलेले असतात. आणि बर्‍याच लोकांचा असा गैरसमज आहे , संपत्ती मिळाली म्हणजे प्रतिष्ठा मिळते. संपत्ती न मिळवताही अनेक लोकांनी समस्त मानव जातीच्या हृदयामध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेले आहे. याहीपुढे जाऊन मला असे म्हणावेसे वाटते की पैशामुळे मिळालेली प्रतिष्ठा पैसा आहे तोपर्यंतच टिकून राहील. पण चारित्र्या मुळे आणि कर्तृत्वामुळे मिळालेली प्रतिष्ठा आपण या जगात असो अथवा नसो ती तशीच टिकून राहते.
       स्वामी विवेकानंद , बाबा आमटे, प्रकाश आमटे, तात्याराव लहाने यांसारखी माणसे पुरेश्या पैशांच्या मागे न धावता लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजवत आहेत . राहिलेत, आणि आज देखील त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने आणि प्रतिष्ठेने घेतले जाते.
      आपल्या सगळ्यांनाच काही बाबा आमटे, विवेकानंद, मदर तेरेसा होता येणार नाही ,पण आहे त्या छोट्याशा जीवनात देखील आपण पण असे काम करावे ज्या यामुळे आपल्या बरोबरच दुसऱ्यांनाही आनंद मिळेल. या आनंदातच चेहऱ्यावरती समाधान झळकेल.
          आपल्या कला- कौशल्याचा , संपत्तीचा फक्त स्वतःच्या सुखासीन जीवनासाठी वापर करणे तसे चुकीचे नाही. परंतु अशा वागण्याने आनंद मिळू शकतो समाधान नाही. आणि प्रतिष्ठा तर नाहीच नाही....



       धन्यवाद..

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने