1001marathiessay.blogspot.com

मनोरंजनाची आधुनिक साधने | manoranjanachi aadhunik sadhane
मनोरंजनाची आधुनिक साधने | manoranjanachi aadhunik sadhane 
        
मनोरंजनाची आधुनिक साधने | manoranjanachi aadhunik sadhane 

        |manoranjanachi aadhunik sadhane ,जीवन जगताना सुख समाधान नको असे म्हणणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .जगात प्रत्येकाला सुख हवेच आहे. सुख मिळवण्यासाठी मनुष्य भरपूर कष्ट करतो पण कष्ट करत असताना कष्ट करण्याची ऊर्जा अंगात निर्माण होण्यासाठी वेळोवेळी विश्रांतीची देखील गरज असते. विश्रांती म्हणजे केवळ आराम  करणे शांत बसून राहणे झोपणे असे नाही.
अनेक  प्रकारची कष्टाची कामे केल्याने थकवा घालवण्यासाठी माणसाला थोड्या मनोरंजनाची गरज असते.
        प्रत्येकाला आपले जीवन सुखाने समाधानाने आणि आनंदाने जगायचे असेल तर त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोरंजन.मग हे मनोरंजन विविध प्रकारचे असू शकते प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींमधून मनोरंजन मिळते .आपल्या आवडीनुसार  छंदानुसार प्रत्येकाला मनोरंजन करून घेण्याचा अधिकारच आहे.

            आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या खासगी तसेच व्यवसायिक जीवनात  व्यस्त झालेला  आहे. काही लोक नोकरी करतात ,तर काही आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळतात .शेतकरी असो  सामान्य माणूस असो  कोणीही असो स्वतःच्या कामात माणूस एवढा गुरफटला गेला आहे की, त्याला कामे संपल्यानंतर मनोरंजनासाठी काही न काही करावेच  लागते .
           काही लोक मनोरंजनासाठी पुस्तके वाचतात फिरायला जातात ,गायन करतात, काही तर गिर्यारोहणासाठी ही जातात, वाद्य वाजवतात .आपला वेळ घालवण्यासाठी काही लोक बागेमध्ये फिरायलाही जातात, घरांमध्ये आपल्या मुलांना शिकवताना, त्यांच्याबरोबर खेळतात. इत्यादी अनेक गोष्टी करतात.
 
            सांगायची गोष्ट अशी की मनोरंजनासाठी काहीना काही करावेच  लागते . आजच्या काळात आधुनिक मनोरंजनाची साधने यांचा शोध लागलेला आहे. 

मनोरंजनाची आधुनिक साधने 

           इंटरनेटच्या माध्यमातून  मनोरंजनाचे मोठे दालनच उघडे झाले आहे. सेल्युलर डेटाचे दर खूप कमी असल्याने तसेच सहजासहजी स्वस्तात स्मार्टफोन मिळत असल्याने लोक युट्युब किंवा ऑनलाइन पिक्चर , ऑनलाइन मालिका बघायला लागलेली आहेत. चित्रपटगृहांमध्ये  मूव्हीज आल्यानंतर ते बघण्यासाठी लागणारा वेळ आता  फारच कमी झाला आहे. सर्व चित्रपट आता सहजासहजी ऑनलाइन बघायला मिळून जातात.  मनोरंजन करण्यासाठी कम्प्युटरआणि लॅपटॉपचा शोध लागल्यामुळे माणूस आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे गेम्स खेळतात .मनोरंजनाचे आधुनिक साधने खालील प्रकारे सांगता येतील.मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडटॅबलेट , कम्प्युटर.
          मोबाईल मुळे तर मनोरंजनासाठी उपलब्ध असलेले रेडिओ टेप रेकॉर्डर व काही अंशी कम्प्युटर  यांची गरज बऱ्याच प्रमाणात मर्यादित झालेली आहे.मोबाईलवर विविध प्रकारचे गाणे ऐकता येतात सिनेमे बघता येतात. युट्युब, फेसबूक,व्हाट्सअप, ट्विटर सोशल ॲप्समुळे तर मनोरंजनाचा तरुण वर्गाचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेला आहे.
     ज्या माणसांना मोबाईल वरती हे सर्व ॲप्स वापरता येत नाही ते माणसे मात्र व्हिडिओ नक्की बघतात किंवा गाणे ऐकू शकतात आपल्या घरातील लहान मुलांचे मोठ्या माणसांचे फोटो आणि व्हिडिओ काढणे मध्ये त्यांना वेगळीच मजा  मिळते. 
    पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी विविध मैदानी खेळ जसे लपाछपी, लंगडी लगोरी इत्यादी खेळ खेळले जायचे. परंतु आता तर मैदानेच उरलेली नाहीत. या समस्येवर पर्याय म्हणजे मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप कम्प्युटर मध्ये सर्व प्रकारचे खेळ आपल्याला एका ठिकाणी बसूनच खेळता येतात म्हणजे गंमत बघा ना , मैदानी खेळ सुद्धा मोबाईल मध्ये एका ठिकाणी बसून खेळता येतात. इतकी या मनोरंजनाच्या आधुनिक साधनांमध्ये ताकद आहे.


         

  1. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  2. सुंदर विचार
  3. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  4. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  5. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  6. पर्यावरणाचे महत्व..  environment
  7. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  8. पैंजण

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने