1001marathiessay.blogspot.com




स्वामी दयानंद सरस्वती,swami Dayanand Saraswati  information in marathi,
Mpsc,upsc, competitive exams, combine exams
………………………………………




                स्वामी दयानंद सरस्वती
                इसवीसन १८२४ ते १८८३
  •          स्वामी दयानंद सरस्वती यांचे संपूर्ण नाव मूलशंकर अंबाशंकर तिवारी असे होते .
  • त्यांचा जन्म इसवी सन 1824 मध्ये झाला .
  • त्यांचे  जन्मस्थान गुजरात मधील टंकारा हे होय. ते मोरवी संस्थान मध्ये येते .
  • त्यांच्या आईचे नाव अमृतबाई होते.
  • ज्या स्वामी दयानंद सरस्वती यांचे इतिहासामध्ये इतके नाव आहे त्यांना शालेय शिक्षणापासून मात्र वंचित रहावे लागले होते.
  •  ते आजीवन अविवाहित राहिले त्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या
  • एकदा शिवरात्री होती वडील म्हणाले मुलशंकर आज सर्वांनी उपवास करायचा. रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची. हे एकूण मुलशंकरने उपवास केला. दिवस संपला .रात्र झाली. शंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले .त्यांनी पूजा केली. पिंडीवर फुले वाहिले .तांदळाच्या अक्षता वा. रात्रीचे बारा वाजले वडिलांना झोप येऊ लागली पण मुलशंकर जागा राहिला .आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही. देवळातल्या बिळातून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडी भोवती फिरू लागले. ते पिंडी वरच्या अक्षता खाऊ लागले .हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरा पासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही ती भक्तांचे संकटापासून रक्षण कशी काय करू शकेल. मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते. तेव्हा मूर्तिपूजेला  काही अर्थ नाही. अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.
  •  त्यावेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाले . परमेश्वराचे शाश्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली .
  • एकदा  टंकारा नगरांमध्ये कॉलराची साथ आली. त्या साथीमध्ये मुलशंकरची 14 वर्षांची बहीण मरण पावली. या घटनेनंतर तीन वर्षांनी मूल शंकर च्या आवडत्या काकांचा ही कॉलरा मुळे मृत्यू झाला मुलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला जणू काही त्याचे जीवन सर्वस्वच हरवले
     कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा अशी मुल शंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली जीवन काय आहे ?मृत्यू काय आहे? या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्मा कडून समजावून घ्यावेत असे त्यांना वाटत होते.
  •  या ध्येय प्राप्ती करता वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले .त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाचा चालवलेला विचार हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते .भौतिक सुखाचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
  • गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद ,बडोदा ,हरिद्वार ,काशी, कानपूर या ठिकाणी गुरूंच्या शोधार्थ जंगलातून व पहाडातून सुद्धा प्रवास करीत राहिले परंतु त्यांना योग्य गुरु मिळाला नाही. याच सुमारास त्या काळाचे प्रकार पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकराची भेट झाली.त्यांचे शिष्यत्व पत्करून मूलशंकरने संन्यास धर्माचा स्वीकार केला.
  •  संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्यावर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यावरून स्वामी दयानंद मथुरेस येऊन पोहोचले . 
  • त्याठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्मग्रंथांचे ज्ञान घेतले.
  • स्वामी दयानंद यांना वेद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. मुख्य म्हणजे वेदांमध्ये मूर्ती पूजा नव्हती किंवा उच्च-नीच  भाव नव्हता . 
  • वेदातील ज्ञान हे खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे पवित्र ज्ञान आहे आणि समाजाकरिता ते अत्यंत उपयुक्त आहे .अशी दयानंद त्यांची श्रद्धा होती म्हणूनच त्यांनी "वेदांकडे परत जा " अशी भारतीयांना शिकवण दिली.
  •  आपल्या अस्खलित प्रवचन द्वारे ते मूर्तिपूजा ,जन्मजात उच्चनीचता , जातिभेद ,घातक रूढी,यज्ञांमध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.
  • इसवी सन 1869 मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडितांशी  शास्त्र अर्थावर वाद-विवाद केला त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले.
  •  स्वामी दयानंद सरस्वती यांचे स्वातंत्र्यावर अतिशय प्रेम होते . 
  • इसवीसन 1857 च्या उठावातून आलेल्या असफलतेपासून तर काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्य प्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या अनेक महापुरुषांनी केले त्या महापुरुषांपैकी स्वामी दयानंद सरस्वती हे एक होते.
  •  भारतातून ब्रिटिशांना हाकलून देण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे अशी स्वामी दयानंद त्यांची पक्की खात्री होती .
  • आर्य समाज आणि गुरुकुल यामध्ये राष्ट्र भक्तांना सशस्त्र क्रांती करिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे. 
  • ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याकरिता उघडपणे लढणारे नेते आर्य समाजाचे होते. त्यामधील काही नावे अशी सांगता येतील .
  • स्वामी श्रद्धानंद 
  • लाला लजपत राय आणि 
  • लाला हरदयाळ इत्यादी
  •  स्वामी दयानंदांनी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले.
  •  समाजाच्या सर्व घटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती .
  • त्यातच हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे असे त्यांचे ठाम मत होते .
  • स्वामी दयानंद सरस्वती ने धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा ब्राम्हो समाजाकडून घेतली होती.
  •  प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकार्यानेच धर्म प्रचाराचे व धर्म सुधारणेचे कार्य करीत .तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरवले .
  • त्यानुसार त्यांनी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली.
  •  आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांचा बरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या.
  •  वेदांचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय, तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा निर्माण होईल, असे स्वामी दयानंद यांना वाटत होते.
  •  उत्तर भारतात त्यांनी चालविलेले शिक्षण प्रसाराचे कार्य तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरले 
  • आर्य समाजाने लाहोर येथे दयानंद अँग्लोवैदिक कॉलेज सुरू केले .
  • तसेच गुरुकुल संस्थेची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालय देशाच्या विविध भागात उघडली.
    स्वामी दयानंद यांचे मौलिक विचार खालीलप्रमाणे सांगता येतील

  1. स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे.
  2.  स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्याने तिला तिचे अधिकार मिळाले पाहिजेत .
  3. स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही त्यांना अज्ञानात ठेवले जाते हे भारताच्या अध:पतनाचे एक कारण आहे .
  4. ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही ज्याप्रमाणे जोपर्यंत श्रिया पडदा पद्धती सारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे .
  5. त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या ते त्यांच्या सतीत्त्वामुळे आणि सदगुणांमुळे त्यांच्या पडद्यामुळे नाही
  6. सर्व मानव एक ,सर्वांचे देव एक,  सर्वांचा धर्म एक ,पृथ्वी माता एक हीच जीवनाची चतुःसूत्री आहे.
   स्वामी दयानंद यांनी जे ग्रंथ लिहिले त्यातील सत्यार्थप्रकाश हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंद यांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय.
 या ग्रंथांमध्ये 15 अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे म्हणून या ग्रंथाला सत्यार्थप्रकाश म्हटले आहे.
 हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे. वेदभाष्य ,संस्कार निधी ,व्यवहार भानू इत्यादी ग्रंथ हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले
    इसवीसन 1883 मध्ये स्वामी दयानंद यांचे विष प्रयोगामुळे निधन झाले.
        प्रत्येक राष्ट्राची अस्मिता त्या राष्ट्रात घडलेल्या विविधांगी इतिहासाने घडत असते ही अस्मिता सतत जागी राहिली तरच राष्ट्राचे मन तरुण राहते त्याचे कर्तृत्व फुलते त्याचा उत्साह आणि महत्त्वाकांक्षा कधीही मंदावत नाहीत प्राण नसेल तर देशाचे काय होईल अस्मिता नसेल तर राष्ट्राचे काय होईल अस्मिता जागी ठेवण्यासाठी राष्ट्राच्या इतिहासातील विद्वान कर्तुत्वाचा समाजसुधारकांचा संतांच्या महानतेचा अभिमान बाळगला पाहिजे.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने