व्यक्तिमत्व विकास भाग-1 मध्ये आपण काही युक्त्या बघितल्या भाग-2 मध्येही मी तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहे त्या दैनंदिन वापरामध्ये तुम्ही स्वतःच्या आयुष्यात वापरू शकता त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये निश्चितच बदल होईल याची मला खात्री आहे त्यामुळे ा टीप्‍स वाचा आणि त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा मग बघा चमत्कार चला तर मग बघुया व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित काही टिप्स.
  1. कोणाचेही उधार घेतलेले पैसे न विसरता परत करा.

  2. आपण जे पेराल तेच उगवेल म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा मग भरभरून प्रेम मिळेल.




  3. तुमच्या वेळेची योजनाबद्ध पद्धतीने आखणी करा.
  1.  कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपला दृष्टिकोन सुधारा.
  2. दूरध्वनीवर बोलताना उत्साहाने आणि आनंदी वृत्तीने बोला.
  • जेव्हा तुम्हाला मदतीची गरज वाटते त्या क्षणी मदत मागा, विलंब करू नका.

  • दुसऱ्याने तुमच्याशी कसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही दुसऱ्याशी वागा.

  • वाढदिवसाच्या दिवशी एक तरी रोप लावा.

  • ज्यांच्यावर तुमचा जीव आहे त्यांना अनपेक्षित भेट देऊन चकित करा.

  • स्वतःवर जबाबदाऱ्या घ्या, दुसऱ्याला दोष देऊ नका.

  • स्वतःची चूक त्वरित कबूल करा.

  • संधी कधीच वाया जात नाही, तुम्ही ती उचलली नाही तर दुसरा उचलतो.

  • सरळ आणि साधे बोला ,उपरोधिकपणे बोलू नका.

  • व्यापारामध्ये आणि कुटुंबात जपण्यासारखी गोष्ट म्हणजे विश्वास होय विश्वास कधीही गमवू नका.

  • जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते प्रेम, ज्ञान व शक्ती.

  • रोज एक मैल पायी चालावे त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.

  • कुणालाही कधीही फसवून नका प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळा फसत नाही.

  • विचार आभाळाएवढे मोठे करा पण छोटे आनंद हृदयात जपून ठेवा.

  • हसतमुख राहा .हसायला पैसे लागत नाहीत हास्यही जीवनाची अमुल्य चीज आहे.

  • रानावनातील फुले, झाडे आणि पक्षी नावासहीत ओळखायला शिका.

  • दिवसातून थोडे तरी लिहा. लिहिणे म्हणजे मनुष्य म्हणून जगणे होय.

  • लक्षपूर्वक ऐकायला शिका. संधी काहीवेळा त्यातूनच दार ठोठावत असते.

  • जेव्हा तुम्ही लहान मुलांशी खेळतात तेव्हा त्यांना जिंकू देत जा.

  • नकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहा. त्यांच्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता कमी होते.

  • जे काम तुम्हाला करायचे आहे ते कधीही अर्ध्यात सोडू नका.

  • ज्या कागदावर तुमच्या सहीची गरज आहे तो कागद काळजीपूर्वक वाचा.

  • रागाच्या भरात कोणतीही कृती करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.

  • दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय पहिली नोकरी सोडू नका.

  • उत्तम आरोग्यासाठी साखर आणि मीठ कमी खा.

  • निळे आकाश हिरवे गवत आणि कोवळी उन्हे हे आपल्या डोळ्यांचे रोजचे अन्न आहे.

  • वक्तृत्व कलेचा विकास करा चांगले वक्तृत्व आत्म्याला भुरळ पाडणारे जादू आहे.

  • मोठी मोठी कामे शक्तीने केली जात नाहीत तर ती सहनशक्तीने केली जातात.

  • सर्व जीवसृष्टी बद्दल आदर बाळगा.

  • छोटे पंख लावून कधीही गरूडासारखे उडायची करता येत नाही.

  • काम लहान की मोठे याचा विचार न करता ते पूर्ण करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे.

  • नोकरी करता-करता छोटा उद्योगही करा.

  • भाषणा अगोदर काहीही खाऊ नका.

  • किरकोळ छोट्या गोष्टी स्वतः करण्याचा सराव ठेवावा.

  • कोणतेही काम अनेक हातांनी हलके होते त्यातले दोन हात तुमचे असू द्या.

  • रोजच्या हिशोबाची वही ठेवा.

  • स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करत चला.

  • ज्यांना खूप गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते म्हणून समाधानी राहायला शिका.

  • सु संधीची वाट पहावी लागते आणि शांतपणे वाट पाहणाऱ्या चे कधीही नुकसान होत नाही. जुन्या चुका 

  • उगाळत बसू नका त्यांच्या पासून बोध घ्या आणि त्या पुन्हा करू नका.

  • तुमच्या मुलांना पैशाचे आणि बचतीचे महत्त्व सांगा.

  • विनोद हा संभाषणाची चव वाढविणारे मीठ आहे पूर्ण अन्न नव्हे म्हणून तो मर्यादितच करा.

  • तुमचा मोठेपणा तुमचे काम प्रामाणिकपणे करण्यात आहे.

  • काम पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नका.

  • युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरण्याची तयारी ठेवा.

  • काम करत असताना खर्च झालेला वेळ कधीच वाया जात नाही म्हणून भरपूर काम करा.

  • सतत कार्यमग्न रहाणे ही मानवी जीवनाची अटळ अवस्था आहे.

  • दुसऱ्याच्या वेळेची कदर करा.

  • छोट्या गोष्टींना फार मोठे महत्त्व देऊ नका.

  • कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिची खरी किंमत कळत नाही.
  • जे कराल ते मनापासून करा मनःपूर्वक केलेली गोष्ट दुसऱ्याच्या मनाला जाऊन भिडतेच.

  • तुम्ही दिलेला शब्द प्रयत्नपूर्वक पाळा.

  • कॉम्प्युटर शिकून घ्या ती काळाची गरज आहे.

  • प्रेम आणि क्षमा या दोन शक्तींना कमी समजू नका.

  • मित्राला पैसे देताना दहा वेळा विचार करा कालांतराने तुम्ही दोन्ही गमावून बसाल.

  • उद्धट आणि दुर्लक्ष करणाऱ्या सेवकाला टीप देऊ नका.

  • कामावर वेळेपूर्वी हजर राहा आणि वेळेनंतर ऑफिस सोडा.

  • लक्षात ठेवा एका रात्रीत यश मिळवण्यासाठी वर्षे जातात.

  • सुखासाठी फक्त पैशाचीच आवश्यकता असते हे अगदी चूक आहे .

  • समाधान पैशाने विकत मिळत नाही.

  • श्रम करून थकल्या शिवाय ईश्वर प्रसन्न होत नाही नाही.

  • जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांची काळजी घ्या.

  • रोज आपल्या कुटुंबाशी चार गोड शब्द बोला.

  • आपल्या परंपरेला महत्त्व द्या.

  •  तुमच्याकडे चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच म्हणा.

  • जे धागे नाजूकपणे सोडविता येतात ते चटकन तोडू नका विचार करा.

  • तुमच्या आई वडिलांच्या आठवणी आणि शब्द टेप करायला विसरू नका.

  • तुमच्यातला पुरुषार्थ मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांना मारुन दाखवू नका. कामातून दाखवा.

  • नम्रतापूर्वक नकार देण्याचे धैर्य असू द्या.

  • तुमच्या उद्योगाचा उत्पादन खर्च कमीत कमी ठेवा आणि सेवा अधिकाधिक देत चला.

  • दुःख आणि नैराश्य हे आयुष्याचे दोन घटक आहेत याची जाणीव ठेवा. त्यामुळे तुम्हाला संकटांना सामोरे 

  • जायला शक्ती मिळेल.

  • तुमचे यश कसे मोजाल? सुख ,शांती आणि समाधान.

  • पत्ते खेळण्यात वेळ व्यर्थ गमावू नका त्यापेक्षा इतर शारीरिक व्यायामाचे खेळ खेळा.

  • कुणाचाही हेवा करु नका हेवा हे स्वतःला दुःखी करुन घेण्याचे मूळ कारण आहे.

  • मोठी कामे करण्यासाठी वेळ नसेल तेव्हा छोटी छोटी कामे उरकून घ्या.

  • स्वतःजवळ उत्तम शब्दकोश ठेवा.

  • एखाद्या वस्तूची जास्त किंमत म्हणजे तिचा दर्जा चांगला असे अजिबात समजू नका.

  • कधी बोलावे हे शिका आणि कधी बोलू नये हे नक्की शिका.

  • स्वतःच्या वेळेची किंमत ठरवा विनाकारण कुणाकडेही जाऊ नका.

  • प्रेमाचे संबंध आवर्जून जोपासा परंतु अतिरेक करू नका.








Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने