आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन 

School Annual Gathering Essay


*आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन *

   

                   प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या-वाईट अशा अनेक आठवणी असतात . त्यातील बऱ्याचशा आपल्या मनाच्या फार जवळ असतात ; आणि त्यातच शाळेमधील आठवणी तर आजन्म आपल्या लक्षात राहतात . शाळेमध्ये भेेेटलेले मित्र-मैत्रिणी , शाळेत झालेले विविध कार्यक्रम , अनेक घटना , प्रसंग आपल्या मनात जसेच्यातसे कोरले जातात . मग ते शाळेचे शिक्षक असो शाळेची इमारत असून किंवा इतर काही असो , या सगळ्यांमध्येच मला आठवते ते म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेत होणारे वार्षिक स्नेहसंमेलन.


School Annual Gathering Essay

वार्षिक स्नेहसंमेलन

          शाळेशी संबंधित ज्या अनेक गोड आठवणी असतात त्यातील एक महत्त्वाची आठवण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन . दर वर्षाच्या शेवटी वार्षिक स्नेहसंमेलन होत असते . आमचे वार्षिक स्नेहसंमेलन दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नंतर होत असे . या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . आणि या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्यातरी स्पर्धेत भाग घ्यायचाच असा एक नियम असतो . म्हणून या स्नेह संमेलनामध्ये सर्वच विद्यार्थी भाग घेतात .

           विविध स्पर्धांचे आयोजन नीट पार पडावे यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार केलेले असतात;  व त्यांना जबाबदारी वाटून दिलेली असते . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपली जबाबदारी अचूक पार पाडण्यासाठी धावपळ दिसून येते , कारण चांगली जबाबदारी पार पाडणाऱ्या ला गटाला संमेलनामध्ये शेवटी बक्षीस दिले जाते. पण बक्षीसापेक्षा काम करताना आलेला अनुभव आणि आनंद फार महत्त्वाचा वाटतो.

            सांस्कृतिक स्पर्धा चालू असताना तर खूपच मजा येते. त्यामध्ये नाटक स्पर्धा ,गायन स्पर्धा , भाषण स्पर्धा यामध्ये विविध विद्यार्थी खूप तयारी करून सादरीकरण करतात . नाटक स्पर्धेत तर बऱ्याचदा काहीजण संवादच विसरून जातात . तेव्हा खूप मजा येते ;कारण बाकीचे विद्यार्थी त्याला 'बोल ना ,बोल ना '   'म्हणून सारखं सांगत असतात पण तो मात्र गप्प बसतो.

         स्नेहसंमेलनाचे आयोजन असते त्यावेळेला शाळेची स्वच्छता केली जाते. संपूर्ण शाळा व आजूबाजूच्या परिसराची सजावट केली जाते . काही विद्यार्थी व्यासपीठ सजवण्यासाठी शाळेतल्या कला शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात . त्यानंतर सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्याध्यापक येतात व तयारी बघून जी शाबासकी देतात तेव्हा मात्र सगळा थकवा निघून जातो.

        सर्व स्पर्धा संपल्यानंतर शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो . त्यावेळी पालकांनाही आमंत्रण दिलेले असते . आपल्या मुलांना बक्षीस मिळताना बघून पालकांना फारच छान वाटते. त्यावेळेसच कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन भरलेले असते . तसेच वर्षभरात मुलांनी केलेले प्रकल्प, त्यांचे कलात्मक काम याचीही मांडणी करण्यात आलेली असते. या सर्व साहित्याची माहितीही मुलंच  पालकांना सांगतात.

           बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आवडणारा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे भोजनाचा कार्यक्रम ह्या दिवशी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छान छान पदार्थ बनवलेले असतात . आम्ही स्वच्छ हात घेऊन अन्नपूर्णा मातेचा भरपुर आशीर्वाद घेतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर आयुष्यभराच्या  आठवणींचा खजिना घेऊन घरी जातो.

                  

      धन्यवाद 


 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.














                                             तुम्हाला आमच्याशी तुमच्या कल्पना शेअर करायच्या असतील काही सुचवायचे असेल तर  contact us या बटणावर क्लिक करा आणि तेथे माहिती भरा. तुमच्या सर्वांच्या सूचनांमुळे  आम्हाला खूप मार्गदर्शन मिळते.

                 कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

                           खूप खूप धन्यवाद.


       आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.

4 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. खूप धन्यवाद, तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मूल्यवान आहे

    उत्तर द्याहटवा
  2. 𝒌𝒉𝒖𝒑𝒂𝒄𝒉 𝒄𝒉𝒂𝒂𝒏
    𝒎𝒂𝒏𝒂𝒍𝒂 𝒎𝒐𝒉𝒖𝒏 𝒕𝒂𝒌𝒗𝒏𝒂𝒓𝒊 𝒃𝒉𝒂𝒔𝒂
    𝒂𝒑𝒓𝒂𝒕𝒊𝒎 𝒔𝒉𝒆𝒗𝒕
    𝒂𝒎𝒄𝒉 𝒌𝒂𝒎 𝒔𝒐𝒑𝒑𝒆 𝒌𝒆𝒍𝒆𝒕
    𝒕𝒉𝒂𝒏𝒌 𝒚𝒐𝒖

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने