1001marathiessay.blogspot.com

|Beautiful house importance in Marathi |


     माझे  घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi. 

          मित्रांनो आज आपण एक छानसा माझे घर मराठी निबंध बघणार आहोत.तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच निबंधाला सुरुवात करूया.घर हा शब्द जरी दोन अक्षरांचा छोटा शब्द वाटत असला तरीदेखील त्या शब्दाच्या मागे भावनिक आधार फार मोठा आहे. प्रत्येकाला आपले घर आवडत असते. तसेच मला हे माझे घर खूपच आवडते. त्यावर आधारितच छानसा निबंध बघूया "माझे घर".
 
    माझे घर मराठी निबंध |Marathi essay on my home




     घर ही अशी जागा असते की ज्या ठिकाणी आपण आपल्या प्रिय व्यक्तींसह आनंदाने राहत असतो.घर आणि घरातील व्यक्तींमुळे म्हणजे आपल्या कुटुंबामुळे आपल्या सामाजिक व भावनिक गरजा भागवल्या जातात. घर म्हणजे केवळ सिमेंट विटांची किंवा माती आणि दगड यांची चार भिंतींची खोली नव्हे. घरामध्ये प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून तर असे म्हणतात की,
 "घर असावे घरासारखे 
नकोत नुसत्या भिंती
 तिथे असावा प्रेम जिव्हाळा
 नकोत नुसती नाती"
      माझे घर म्हणजे असेच प्रेमाने भरलेला सागर आहे. माझे घर आकाराने खूप मोठे ही नाही आणि छोटे की नाही. आम्ही आमच्या कुटुंबातील सहा जण अगदी आनंदाने राहू शकू एवढे ते मोठे आहे.
        माझे घर अगदी छोटेसे टुमदार घर आहे. घराच्या अवतीभोवती सुंदर बाग केलेली आहे. त्या बागेमध्ये तुळशी, हिरडा ,बेहडा, पानफुटी, अडुळसा अशा औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. तुळशीची भरपूर झाडे आमच्या घराच्या अवतीभोवती लावलेली आहेत. त्यामुळे घरामध्ये भरपूर शुद्ध हवा येत असते. तुळशीची भरपूर झाडे लावलेली असल्यामुळे मी त्याला "ऑक्सीजन पार्क" असे म्हणतो.
        माझ्या घरासमोर छान अंगण आहे. या अंगणामध्ये आई दररोज सडा टाकते आणि छान रांगोळी काढते. माझी ताई कधीतरी आईला रांगोळी काढणे मध्ये मदत करते व रांगोळीत सुंदर रंग भरते. आमचे घर दुमजली आहे.
      वरच्या मजल्यावर अभ्यासासाठी खोली आहे. आमच्या घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे घरामध्ये देवांचे भरपूर फोटो लावलेले आहेत. यासर्व फोटोंची वडील नियमितपणे स्वच्छता करत असतात. देवपूजेसाठी नेहमी फुले लागतात त्यामुळे आमच्या घराच्या अंगणामध्ये सदाफुली ,मोगरा , गुलाब, जास्वंद अशा छान फुलांची भरपूर झाडे लावलेली आहेत. जाई जुई चे वेलही आहेत ते खूप पसरलेले आहेत त्यामुळे त्यांचा मंद सुगंध दूरपर्यंत येतो.
      आमच्या घराच्या अंगणातच सुंदरसे तुळशीचे वृंदावन बांधलेले आहे .या वृंदावना भोवती घरातील प्रत्येक जण सकाळी फेरी मारतो. घराच्या अवतीभोवती मोकळी जागा असल्यामुळे आणि प्रत्येक खोलीत साठी एक स्वतंत्र मोठी खिडकी असल्यामुळे घरात भरपूर हवा येते.त्यामुळे घरातील वातावरण फारच प्रसन्न वाटते.
       माझे घर पूर्वमुखी असल्यामुळे सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे कोवळे ऊन घरात शेवटपर्यंत पडते . हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोवळ्या उन्हाचा आनंद फारच मजेशीर वाटतो. आमच्या घराच्या भिंतींना फिकट पिवळा आणि केशरी रंग दिलेला आहे. ज्यावेळी सूर्यप्रकाश या भिंतींवर पडतो तेव्हा संपूर्ण घर दिव्या सारख्या प्रकाशाने उजळून निघते.
        घरातील प्रत्येक भिंतीवर आकर्षक सजावट केलेली आहे. आमच्या घरातील फरशी देखील अगदी साधी लाकडासारखे दिसणारी आहे. असे हे साधे सुंदर माझे घर मला खूप आवडते.


... माझे घर निबंध क्र.1 समाप्त...


माझे घर निबंध क्रमांक 2
|Essay on my house  |

       माझे घर मला जीवापाड आवडते. आमचे घर फक्त तीन खोल्यांचे आहे. त्यातील एका खोलीमध्ये किचन बनवलेला आहे. किचन म्हणजे अगदी साधे आहे. एक छोटासा सहा फूट लांबी चा टेबल ठेवलेला आहे . त्याचाच वापर जेवण करण्यासाठी करते.
        घरामध्ये आम्ही तीनच व्यक्ती राहतो. आई-वडील आणि मी . आमचे घर आम्हाला पुरेसे आहे. आम्ही तिघेही याठिकाणी अगदी आनंदात आणि मजेत राहतो.
         घराच्या सर्व भिंतींना सुंदर रंग दिलेला आहे. भिंतींवर आईने तयार केलेले विविध सजावटीचे साहित्य छान पद्धतीने लावलेले आहे. घरामध्ये आजोबांसाठी छान छान आराम खुर्ची आहे. आजोबा जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा खुर्चीत बसून टीव्ही बघतात.
       आमच्या घरासमोर छोटेसे अंगण आहे. आई अंगण फार स्वच्छ ठेवते. तिथे दररोज छान रांगोळी काढते. रांगोळीत रंग ही सुंदर भरते. अंगणातील तुळशीची आई दररोज न चुकता पूजा करते आणि तुळशी भोवती फेरी मारते.
       मी आणि  सगळे घर फारच सुंदर आणि स्वच्छ ठेवतो. असे हे माझे घर मला खूप आवडते.

    ... माझे घर निबंध क्र.२ समाप्त...



       माझे घर निबंध क्रमांक 3

|माझ्या स्वप्नातील घर मराठी निबंध|
        
        स्वतःचे एक छान घर असावे असे प्रत्येकालाच वाटते.सर्वांप्रमाणे एक सुंदर घर हवेहवेसे वाटते. कुणाला भव्य दिव्य मोठ्या जागेत बांधलेले घर आवडते. कुणाला दोन मजली ,तीन मजली घर आवडते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात.
      मला मात्र माझ्या स्वप्नातील घर बांधायचे आहे. माझ्या स्वप्नातील घर कसे असेल ते मी तुम्हाला सांगतो. मला खूप मोठे घर असावे असे अजिबात वाटत नाही. याउलट छोटेसेच पण आकर्षक घर असावे असे माझे स्वप्न आहे.
        मी छोट्याशा खेड्यात शेतामध्ये राहतो. त्यामुळे मला मोठमोठ्या सिमेंटच्या घरांचे अजिबात आकर्षण नाही. कधीतरी मामाच्या गावी गेल्यानंतर त्या घरामध्ये राहण्याचा आनंदही मी घेतलेला आहे. परंतु शेतातल्या साध्या घरांमध्ये जो आनंद मिळतो तो नैसर्गिक आनंद कुठेही मिळत नाही.
        माझ्या स्वप्नातील घरासमोर एक छान अंगण असेल. त्या अंगणाच्या तिन्ही बाजूने तुळशीचे सुंदर कुंपण केलेले असेल. समोरच्या बाजूला बांबू पासून बनवले याला आकर्षक दरवाजा असेल. बांबूच्या गेटच्या दोन्ही बाजू गुलाबाची छान रोपे असतील.
       तुळशीच्या कुंपणात अधून मधून मोगऱ्याची आणि जाई जुई ची वेल वाढ होऊन त्यांची सुंदर कमान तयार केलेली असेल. मोगर्‍याचा आणि जाईजुईच्या फुलांचा सुंदर वास घरात येईल आणि फारच आनंद मिळेल.
      बांबूच्या गेटमधून आत आल्यानंतर समोर माझ्या घराला तोरण बांधलेले सुंदर दार दिसेल. दाराच्या उजव्या बाजुलाच चार-पाच फुटावर तुळशीचे वृंदावन असेल. या वृंदावना मध्ये दिवा ठेवण्यासाठी छोटासा खोपा देखील तयार करून घेईन.
        घरातून आत शिरतानाच बाजूला सुंदर देवघर तयार करेन. देवघरात सुंदर सुवासिक अगरबत्त्या आणि रांगोळ्यांनी सजावट केलेली असेल. अगरबत्ती यांच्या सुगंधा बरोबरच ाई जुई आणि गुलाबाचा सुगंध वार्‍याच्या झुळकीबरोबर घरातून आतील तेव्हा संपूर्ण घर सुगंधाने न्हाऊन निघेल.
           तिथून पुढे लगेचच बैठकीची मोठी खोली असेन . या खोलीत लाकडापासून बनवलेले सुंदर आसन ठेवलेले असतील व समोर बांबू  पासून बनवलेला छोटासा स्टूल आणि त्यावर काच बसवलेली असेन. बैठकीच्या खोलीतुनच जाता येईल असे दोन छोटे रूम असतील. झोपण्यासाठी .
      बैठकीच्या रूम मधून पुढे गेल्यानंतर स्वयंपाक घर असेल. घराच्या बाहेर थोड्या अंतरावर संडास बांधलेला असेन. स्वयंपाक घराच्या समोर अंघोळीसाठी  खोली असेल .
       माझ्या आवडत्या गाईसाठी सुंदर असा गोठा मी घराच्या मागच्या बाजूला बांधेन. ज्या गाईच्या दुधाने माझे शरीर पुष्ट झाले आहे त्या गाईची मी खूप मनापासून काळजी घेईन.
     असेच छान सुंदर माझ्या स्वप्नातील घर मी लवकरच बांधेन. मग या तुम्ही मला भेटण्यासाठी माझ्या स्वप्नातील सुंदर घरामध्ये.
      
   ... माझे घर निबंध क्र.३ समाप्त...
     



" | what is  a home?"
      Home is not just building made up of cement and bricks. It is the bonding between the brain and hearts of the members living in that building.
     

घर समानार्थी शब्द.
 सदन ,गृह, निवासस्थान


      प्रिय मित्रांनो तुम्हाला माझे घर मराठी निबंध तसेच माझ्या स्वप्नातील घर हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या स्वप्नातील घराबद्दल तुमचे काय विचार आहेत ते देखील मला नक्की कळवा .तुमचे विचार ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी मला खूपच आनंद मिळेल.
      तुम्हाला या विषयावर आधारित अजून निबंध हवे असतील तर ते नक्की सांगा. या विषयावर आधारित अजून भरपूर निबंध तुम्हाला अभ्यासासाठी लिहून देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने