1001marathiessay.blogspot.com

      शालेय जीवनामध्ये विविध प्रकारचे निबंध लेखन करावे लागते. निबंध लेखनामुळे परीक्षार्थी मध्ये कल्पनात्मक विचार करण्याची क्षमता किती आहे ? तो प्रसंगांचे लेखन कशा पद्धतीने करू शकतो ? या सर्व गोष्टी तपासल्या जातात . त्यामुळेच निबंध लेखनाला विशेष महत्व आहे.

        आरशाचे आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे आपल्याला तर माहीतच आहे ,पण समजा असेच राहिले नसते तर ,काय गंमत झाली असती हे आपण या छान छान निबंधांमध्ये बघूया.

आरसा नसता तर ...!
Aarsa nasta tar Marathi nibandh

      सध्याच्या काळामध्ये जीवन जगत असताना आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या साधनांची गरज असते या सर्वांमध्ये आरश्याचा देखील समावेश करावा लागेल. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असा एकही दिवस जात नाही की आपण एकदा तरी आरशात बघितले नाही .
        आरशाचा वापर मनुष्य कधीपासून करू लागला हे सांगणे तसे फारच अवघड आहे परंतु विविध पौराणिक कथा जसे की, रामायण, महाभारत देखील आरशाचा उल्लेख आलेला दिसतो. आरशाचे महत्व हे पुरातन काळापासूनच असल्याचे आपल्या निदर्शनास येते.
       सकाळी उठल्या बरोबरच मनुष्य सर्वप्रथम आरशाकडे जातो आणि आपले केस विंचरणे व चेहरा, कपडे ठीक करणे ह्या गोष्टी उरकून घेतो. आपण कसे दिसतो हे आरसाच आपल्याला स्पष्टपणे सांगतो. हल्लीच्या काळात तर मनुष्य कसा आहे हे बघण्यापेक्षा मनुष्य कसा दिसतो यावरच आपण लोकांची पारख करतो. अर्थात यामध्ये आरशाचा काहीच दोष नाही. आरसा माणसाला दोषही दाखवत नाही आणि गुणही दाखवत नाही.

आरशाचे महत्व मराठी निबंध

          जे सत्य आहे ते जसेच्या तसे समोर मांडणे हे आरशाचे काम आहे. सुंदर व्यक्तीला सुंदर दाखवणे तर खूप व्यक्तीला कुरूप दाखवणे हे काम अगदी प्रामाणिकपणे करतो.
          आरश्याकडून कडून एक गोष्ट मात्र शिकण्यासारखे आहे , ती म्हणजे स्वच्छ व नितळपणा. मनात कोणताही दुजाभाव न ठेवता सर्वांशी समभावाने वागणे , हा आरशाचा गुण मला फारच आवडतो. तो गुण माझ्या अंगी बा मी नक्कीच प्रयत्नशील आहे आणि राहिल.
         आरसा फक्त स्त्रीयाच जास्त वापरतात असे काही नाही. पुरूषांनाही आरशाची गरज तेवढ्याच प्रमाणात असते. हा पुरुषांपेक्षा स्त्रिया आरशाचा थोडा जास्त वापर करतात ही गोष्ट हे विसरून चालणार नाही किंवा नाकारता येणार नाही.
          स्त्रिया तसेच महाविद्यालयीन तरुणी यांच्या बटव्यामध्ये  पैसे, मोबाईल ,सौंदर्यप्रसाधने यांच्याबरोबरच आरसाही असतोच.स्त्रियांच्या बटव्यामध्ये आरशाला मानाचे स्थान प्राप्त झालेले असते , कारण की त्यांच्या सौंदर्य फुलवण्याच्या साधनांचा वापर चांगला झाला आहे की नाही हे त्यांना आरसाच तर स्पष्टपणे सांगतो.

मानवी जीवनामध्ये आरशाचे उपयोग
         आपल्या जीवना मधून तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये फारसा जर काढून टाकला तर आपल्याला फारच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना सामोरे जावे लागेल. विशेषता वाहनांना लावलेले आरसे दळणवळणाच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आरसे नसले तर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील.
        विविध कारखान्यांमध्ये ही अनेक उपकरणांमध्ये आरशांचा उपयोग केला जातो. हल्लीच्या काळात तर आरशांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात त्यातीलच हसवणारे आरसे हा प्रकार तर फारच भन्नाट आहे एकाच माणसाची विविध प्रकारचे प्रतिबिंब आरशामध्ये बघायला मिळतात व हसून-हसून पोट दुखायची पंचायत होते.
        
         लग्न प्रसंगांमध्ये तर आरशाची गरज वेळोवेळी लागत असते. नवरदेव नवरी नवरी सोबत असलेल्या कळवल्या आणि नवरदेवाचे मित्र मंडळ या सर्वांना आरशामध्ये बघून स्वतःचा नट्टापट्टा करण्यातून वेळच मिळत नाही. सर्वांचे आनंदी आणि हसरे चेहरे बघून असा देखील सुखावून जातो तरीदेखील मात्र जे सत्य आहे तसे दाखवण्याचा त्याचा नियम तो अजिबात मोडत नाही.

या निबंधांचे खालील ही नावे असू शकतात;
  1. आरशाचे उपयोग.
  2. माणूस आणि आरसा संबंध.
  3. माणसाच्या जीवनात आरशाचे महत्व.
  4. आरशाचे महत्व.
  5. मानवी जीवन व आरसा.
  6. दैनंदिन जीवनात आरशाचे उपयोग आणि महत्त्व.

प्रिय मित्रांनो निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा
       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने