1001marathiessay.blogspot.com
Unity in diversity essay in Marathi.
Unity in diversity essay in Marathi.
      

     एकात्मतेची भावना  प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. राष्ट्रीय एकात्मतेचे मुळेच कोणतेही राष्ट्र एकात्मिक प्रगती साधू शकते. आपल्या भारतात हे राष्ट्रीय एकात्मता खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्यावर आधारितच एक छानसा निबंध आपण आता बघूया.
    हा निबंध class 5,6,7,8,9,10 साठी तसेच विविध परीक्षांमध्ये लेखनासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतो.
   आपल्या घरातील, कुटुंबातील तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना निबंध वाचण्यासाठी प्रेरित करा.
    

  विविधतेत एकता , राष्ट्राची एकात्मता मराठी निबंध
Unity in diversity essay in Marathi.
      
         समाज या शब्दाची व्याख्या करताना इंग्रजीमध्ये असे म्हटले जाते की,society is not only the group of people it is the system of relationship that exist between the individual of that group. याचा अर्थ असा की समाज म्हणजे केवळ लोकांचा समूह नव्हे तर समूहातील प्रत्येक व्यक्तीचा आपसातील असलेला संबंध म्हणजे समाज होय. ज्यावेळी विविध मानवसमाज एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात. त्यावेळी त्या ठिकाणी सुख नांदत राहते.
        विविधतेत एकता हा फक्त एक वाक्प्रचार नाही तर भारताच्या एकातेची ही जणू व्याख्याच आहे.अनेक वर्षांपासून भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंद्याने राहत आहेत. ज्याप्रमाणे विविध रंगांचे धागे एकत्र आल्यानंतर एक छान रंगीत वस्त्र तयार होते अगदी त्याचप्रमाणे मध्ये अनेक जाती धर्माचे विविध रंगी लोक एकत्र मिळून मिसळून राहतात.
          राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण द्यायचे झाले तर भारता इतके प्रभावी उदाहरण शोधूनही सापडणार नाही.सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्राभिमान या गोष्टी भारतीयांच्या रक्तातच वाहतात. मातेच्या कुशीत जन्माला आलेले विविध जातींचे धर्मांचे संत, महंत, मौलवी यांनी आपल्या विचारांनी भारतीय माणसांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे भावना दृढ केलेली आहे.
      आपल्यासोबत राहणाऱ्या प्रत्येकाचा धर्म श्रेष्ठच आहे. ही भावना सतत मनामध्ये दिव्या सारखी तेवत राहिली पाहिजे. आपला स्वतःचा धर्म श्रेष्ठ , माननीय व इतर धर्मांचा आदर राखणे यालाच सहिष्णुता असे म्हणतात.
     भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाली.त्यानंतर प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा अस्तित्वात आली. भाषेबरोबरच प्रत्येक प्रांतातील, राज्यातील सण , समारंभ,धार्मिक कार्य यामध्ये देखील विविधता निर्माण झालेली तर आहेच. दीपावली, पोंगल ,गरबा, यांसारखे भव्यदिव्य सण भरत नाट्यम , रास , कथक यासारखे नृत्य प्रकार आपल्याला बघायला मिळतात.
      हे असे विविध प्रकारचे सण-उत्सव नृत्य प्रकार खेळ असले तरीदेखील कोणत्याही राज्यातील खेळाडू किंवा व्यक्ती इतर कोणत्याही राज्यातील सण-समारंभ खेळ नृत्यप्रकार अगदी आनंदाने खेळताना व साजरे करताना दिसतात. हेदेखील राष्ट्रीय एकतेचे उदाहरण म्हणता येईल.
     कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक स्वार्थपेक्षा राष्ट्राचे महत्व अधिक आहे आणि स्वार्थ नेहमीच दुर्लक्षित केला जातो. ही भारतीयांची एक शक्तीच आहे.
    भारत देशाच्या वर्ण साठी मला काही काव्यपंक्ती आठवतात त्या अशा,

विविधतेतून ऐक्याचा दे जगा नवा संदेश 
असा आगळा जगावेगळ माझा भारत देश
         



      समाज या विषयाच्या दृष्टीने खालील प्रकारचे प्रश्न विचारात घेता येतील.
१) समाज म्हणजे काय?
    व्यक्ती व्यक्ती मध्ये असणारे  मैत्रीत्वाचे संबंध आपुलकी असा व्यापक अर्थ या संकल्पने मागे आहे परंतु बऱ्याचदा समाज या शब्दाचा अर्थ एखाद्या विशिष्ट जाती धर्म किंवा जनसमुदाय यासाठी वापरला जातो. उदाहरण सांगायचे झाले तर आर्य समाज,  हिंदू समाज, भारत समाज इत्यादी.

२) समाज माध्यम म्हणजे काय?
३) बहुजन समाज?
४) समाज प्रबोधन म्हणजे काय?
५) सामाजिक म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय?
६) समाजकार्य म्हणजे काय?
७) समाज कसा तयार होतो?
८ ) माणसाला समाजाची गरज का वाटली?
९) माणसातील समाजशीलता?
१०) एकात्म मानव दर्शन.

राष्ट्रीय एकात्मता किंवा विविधतेत एकता हा चिंतनात्मक निबंध तुम्हाला कसा वाटला ? ते नक्की सांगा. तसेच तुमच्याही भारताविषयी काही भावना असतील कल्पना असतील तर, कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्हाला ते वाचायला खूपच आवडेल.
 धन्यवाद
प्रिय मित्रांनो निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा

   

     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने