1001marathiessay.blogspot.com



झाडाचे मनोगत मराठी निबंध
|झाड बोलू लागले तर|
Zadache atmvrutt Marathi nibandh


     तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार.  मी एक झाड बोलत आहे . बर्‍याच दिवसांपासून तुमच्याशी बोलावे आणि मन थोडेसे हलके करावे असे माझ्या मनात आहे.
    सर्व सजीव आणि निसर्ग यांचे फारच जवळचे नाते आहे . किंबहुना सर्व सजीव हे निसर्गा मध्येच निर्माण होतात आणि निसर्गा मध्येच त्यांचा अंतही होतो.
     सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे आणि आम्ही झाडे तुम्हा सर्व सजीवांना ऑक्सिजन पुरवतो . ऑक्सीजन शिवाय मनुष्य पाच मिनिटे ही जिवंत राहू शकत नाही . असा हा मौल्यवान  प्राणवायू  आम्ही झाडे तुम्हाला फुकट देऊन टाकतो. पण याची जाणीव फारच थोड्या माणसांना असते.
      विविध प्रकारचे पशुपक्षी आमच्या फांद्यांवर आपली घरटी बांधतात. त्यामध्ये आपल्या पिलांना जन्म देतात .अंडी घालतात . आम्ही झाडे आईच्या मायेने त्या सर्वांची काळजी घेतो. तुम्ही माणसे घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतात . वृक्षतोड करताना झाडावरच्या पशुपक्ष्यांची घरेही तुम्ही तोडून टाकतात. त्यांच्या अस्तित्वाचा तुम्ही विचार कधी करणार ? जर झाडेच राहिले नाहीत तर तुम्ही बांधलेल्या घरांमध्ये कसे राहणार? तुम्ही तयार केलेल्या मोठमोठाल्या रस्त्यांवरून जाण्यासाठी सजीवच उरणार नाहीत. तुम्ही ह्या पशुपक्ष्यांची घरी तोडतात आणि मग हे पशुपक्षी तुम्ही बांधलेल्या गल्ल्यांमध्ये ; गावांमध्ये शिरतात त्या प्राण्यांना देखील तुम्ही पकडून ठेवतात .किंवा मारून टाकतात. सर्व पशुपक्षी मानव यांच्यामुळे अन्नसाखळी टिकून आहे, हे तुम्हाला कळत नाही का ? तरीदेखील तुम्ही असे वागता वेळेत स्वतःला बदला नाहीतर वेळ तुम्हाला बदलून टाकेल हे लक्षात ठेवा.
    वर्षातून अनेक वेळा तुम्ही सहलीला जातात . त्यावेळी सुंदर निसर्गरम्य भरपूर हिरवळ असलेली क्षेत्रे किंवा जागा तुम्ही निवडतात. आमच्या अधिकाधिक सहवासामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते . आरोग्य चांगले राहते. शुद्ध हवा मिळते . मनुष्य सुखावून जातो.
   प्रगतीच्या नावाखाली माणसाने दळणवळणासाठी मोठ मोठाले रस्ते तयार केले . त्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची कत्तल करण्यात आली. हे बघून माझे हृदय हेलावून जाते.
   तुम्हाला जशा भावना असतात तशा आम्हाला देखील भावना असतात , परंतु आमच्या भावनांचा विचार करायला तुमच्याजवळ वेळ आहे का? पण तुम्ही असेच वागत राहिला तर ,  अशी परिस्थिती निर्माण होईल की नंतर विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाही . तुम्ही स्वतः तुमचा विनाश ओढवून घेत आहात.

एका झाडाचे मनोगत , आत्मवृत्त मराठी निबंध, भाषण, लेख.

     ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत तेथील जमीनही सुपीक असते . झाडांची मुळे जमिनी घट्ट धरून ठेवतात . त्यामुळे पावसामुळे किंवा वाहणाऱ्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते . जमिनीवर मातीचा दिड ते दोन इंचाचा थर तयार होण्यासाठी सुमारे आठशे ते हजार वर्षे लागतात आणि इतकी मौल्यवान माती झाडे तोडल्यामुळे पाण्याबरोबर वाहून जाते. जमिनीचा पोत चांगला राहिला नाही तर त्यात पीक कसे घेणार . आणि खाणार काय आहे?  म्हणून म्हणतो सावध व्हा समजदारपणाने वागा.
     
     हल्ली तर तुम्ही घरात अंगणामध्ये गॅलरी वरती देखाव्याची झाडे लावण्यावर फारच भर दिलेला दिसतो. देखाव्याच्या झाडांपेक्षा पर्यावरणाला पूरक झाडे लावण्यावर भर द्या. एका गोष्टीचे निरीक्षण करा देखाव्यासाठी लावलेल्या झाडांवरती कोणत्याही प्रकारचे पशुपक्षी घरटी बांधत नाहीत किंवा त्या झाडांवर राहत नाहीत . यावरून तुम्हाला समजून येईल देशी झाडांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे.
      आम्ही झाडे तुम्हाला ला लाकडे , फुले , फळे , डिंक , वनौषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो . तेही कोणताही भेदभाव न करता . मग तुम्ही देखील आमच्यामध्ये भेदभाव का करतात ?सर्वांशी समानतेने वागणे हा आमचा गुणधर्म तुम्ही शिकून घ्या ना.
      वृक्षतोडीमुळे किंवा झाडांच्या नाशामुळे पर्यावरणावर कसे दुष्परिणाम होतात हे सगळे तुम्हाला कळते. तितके तुम्ही जाणकार आहात . कारण आताच्या विज्ञानयुगातील तुम्ही नागरिक . मग हे सगळं कळत असून देखील वागणे मध्ये बदल का करत नाही ? आता मात्र फार कठीण काळ आलेला आहे. सावध व्हा, आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा.  एक मूल एक झाड झाड किंवा एक मनुष्य एक झाड झाड असे म्हणण्याचे दिवस आता राहिले नाही.  तर एक मनुष्य चार चार झाडे लावण्याची गरज आता निर्माण झालेली आहे.
     ही झाडे लावण्याची गरज आज निर्माण होण्यामागे जबाबदारही माणूसच आहे. कारण की निसर्ग माणसाची गरज भागवतो हाव नाही. हे आपण सर्व विसरून गेलेले आहात .आणि तीच आठवण करून देण्यासाठी आज मी तुमच्या समोर माझे मन मोकळे करत आहे . बाकी तुम्ही सर्वजण कसे आहात ? काळजी घ्या .  आनंदात रहा . सुखात राहा हीच माझी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.

झाडाचे आत्मवृत्त मराठी निबंध ,Manogat of a tree

   नमस्कार मी झाड बोलते आहे. मी आज तुमच्यासमोर माझे मनोगत म्हणजेच माझे आत्मवृत्त सांगणार आहे. तुमच्या पूर्वजांपासून  आमचे महत्व अनेक वेळा तुम्ही ऐकले असेल. ग्रंथांमध्ये तर असे म्हटले गेले आहे की,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
 पक्षीही सुस्वरे आळविती
    झाडे बोलू शकत नाहीत म्हणजे ते निर्जीव आहेत असे नाही. आम्ही देखील सजीव आहोत. आमचे आयुष्य म्हणजे परोपकार. इतर सजीवांना आमच्या मुळे होणारे फायदे जर तुम्ही बघितले तर आमची पुर्ण आयुष्य ही इतरांसाठी वाहिलेल असत.
    आम्ही तुम्हाला पाहणे फुले औषधे लाकूड इत्यादी देतो आणि तुम्ही आम्हाला घाव देतात हे बघून वाईट तर वाटणारच ना!
    तुमच्या बालपणापासून आम्ही तुमची सोबत करत असतो. बालपणा मध्ये आमच्या लाकडापासून बनवलेल्या पाळण्यामध्येच तुम्ही झोपत असतात. त्यानंतर तारुण्यामध्ये लाकडापासून बनवलेल्या पलंगावर झोपत असतात. आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस मृत्यूल आपण प्राप्त होतो तेव्हा नश्वर शरीर जाळण्यासाठी देखील आमच्या लाकडांचा उपयोग होतो. म्हणजेच तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मृत्युनंतरही तुमची सोबत करणारे आम्ही तुमचे सगेसोयरे आहोत .तरीदेखील आमच्याशी इतक्या निर्दयतेने तुम्ही का वागता?


झाडाचे मनोगत सांगणारा अजून एक छान निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

लोक हा निबंध खालील नावानेही शोधतात.

  • |एका झाडाचे मनोगत 
  • |झाडाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • |झडाचे आत्मकथा भाषण, लेख. 
  • |Manogat of a tree
  • |autobiographical Marathi essay, speech, article.
  • |मी झाड बोलतोय मराठी निबंध
  • |Mi zad boltoy marathi nibandh
  • |झाडाची आत्मकथा  दाखवा
  • |झाडाचे महत्व निबंध
  • पेड़ की आत्मकथा मराठी

सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा


  1. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा संदेश पाठवा .
  2. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  3. पर्यावरणाचे महत्व..  environment
  4. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  5. पैंजण
  6. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  7. सुंदर विचार
  8. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  9. यंत्र संपावर गेली तर..
  10. मी रोप बोलत आहे.

       जर तुम्हाला हा, एका झाडाचे मनोगत निबंध आवडला .तर आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे.
       तुम्हाला अजून एखाद्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने